चीन चा पाकिस्तान च्या लष्करासाठी नवीन बंकर ,चीन भारताविरुद्ध रणनिती अवलंबण्यापासून मागे हटत नाही.आता भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सरकारला माहिती दिली आहे की एका चीनी उत्पादन कंपनीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) आपले कार्यालय स्थापन केले आहे. यासोबतच ते मुझफ्फराबाद आणि अथमुकमला लागून असलेल्या भागात सुरू असलेल्या कामांवर नियंत्रण ठेवत आहेत.
चीन चा पाकिस्तान च्या लष्करासाठी नवीन बंकर
एजन्सींनी सांगितले की चीन ची एक कंपनी मे महिन्यापासून पाकिस्तान च्या लष्करासाठी नवीन बंकर बनवत आहे. चीनच्या कंपन्यांनी पीओकेमध्ये यापूर्वीही बांधकाम केले आहे, परंतु नियंत्रण रेषेजवळ असा प्रकल्प पहिल्यांदाच हाती घेण्यात आला आहे. पीओकेच्या नीलम व्हॅलीला लागून असलेल्या केल सेक्टरमध्ये हा भाग पाकिस्तानी लष्कराच्या ३२ विभागांतर्गत येतो.
बीजिंगने यापूर्वी राजस्थानमधील बिकानेरसमोर पाकिस्तानी भूमीवर आपले सैनिक आणि मशीन पाठवले होते.
येथे एक फॉरवर्ड एअरबेस अपग्रेड करण्यात आला आणि 350 हून अधिक दगडी बंकर आणि सीमा चौक्यांचे नूतनीकरण करण्यात आले.
पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीनने याआधीही अनेक वेळा पाकिस्तानला मदत केली आहे. पुढील वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये G-20 नेत्यांची बैठक घेण्याची भारताची योजना आहे. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानसह चीनने आक्षेप घेतला होता. संबंधित पक्षांनी या मुद्द्याचे राजकारण करण्यापासून दूर राहावे, असे सांगून ड्रॅगनने आपला जवळचा मित्र पाकिस्तानच्या सुरात सुर मिसळून बाजू घेतली होती.
भारतीय रेल्वेने चिनी कंपनीला 39000 ट्रेनची चाके बनवण्याचे टेंडर दिले
भारतीय रेल्वेने ट्रेनची चाके बनवण्यासाठी मे महिन्यात एका चिनी कंपनीला टेंडर दिले आहे, त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वत: तसे ट्विट करून हे सांगितलं. त्यांनी म्हटलं – रेल्वेने एका चिनी कंपनीला 39000 ट्रेनची चाके बनवण्याचे टेंडर दिले आहे. इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भात आपल्या वृत्तात लिहिले आहे की, रेल्वेने 39000 ट्रेनच्या चाकांचे टेंडर चायना टेंडर टीझेड हाँगकाँग इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला दिले आहे.
अहवालानुसार रेल्वेने या चिनी कंपनीला ट्रेनची चाके बनवण्यासाठी 170 कोटींचे टेंडर दिले आहे.
एप्रिलमध्ये ही निविदा काढण्यात आली होती, त्यानंतर 2 मे रोजी ही निविदा चिनी कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
वंदे भारत गाड्यांच्या चाकांसाठी ही निविदा काढण्यात आली होती.
गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक संघर्षानंतर
चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर आणि पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली होती.तसेच टिक टॉक एप बॅन करण्यात आलं.
संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटविण्याची माजी जदयू नेत्याची मागणी
आम्ही सावरकरांची अवलाद नाही,जेल जाण्यास घाबरत नाही-केजरीवाल
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 24, 2022, 11:29 AM
WebTitle – China is building bunkers for Pakistan Army, security agencies warn the indian government