कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एचपी संदेश यांनी आरोप केला आहे की उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) अधिकाऱ्याला फटकारल्यामुळे त्यांना बदलीची धमकी देण्यात आलीय. मात्र, जनतेच्या हितासाठी आपली बदली झाली तरी त्यासाठीही आपण तयार असल्याचे न्यायमूर्ती संदेश यांनी सांगितले.
नायब तहसीलदारावर ५ लाखांची लाच घेतल्याचा आरोप
बेंगळुरू शहराचे शहर उपायुक्त जे मंजुनाथ यांच्या कार्यकाळात नायब तहसीलदार पीएस महेश यांच्यावर ५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे, त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी महेशविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून महेशच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर ३० जून रोजी सुनावणी झाली. त्यावर महेश यांनी मंजुनाथने लाच घेण्यास सांगितले होते, असे निवेदनात म्हटले होते, परंतु न्यायमूर्ती संदेश यांच्या खंडपीठाने सांगितले की, एफआयआरमध्ये मंजुनाथचे नावही नाही.त्यानंतर न्यायमूर्ती संदेश यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना एसीबीला भ्रष्टाचाराचे केंद्र आणि संग्रह केंद्र म्हटले. त्याचवेळी, न्यायमूर्तींनी असेही म्हटले होते की एसीबी सध्या कलंकित एडीजीपी सीमांत कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. या प्रकरणी त्यांना आता धमकी देण्यात आली आहे.
न्यायाधीश बदली बद्दल म्हणाले – मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेती करायला तयार आहे
प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी कोर्टात पोहोचले, तेव्हा न्यायमूर्ती संदेश म्हणाले – जर बदली लोकांच्या हितासाठी केली असेल तर मी त्यासाठी तयार आहे. तुमचा एसीबी एडीजीपी एक शक्तिशाली व्यक्ती आहे असे दिसते. मला याबाबत एका न्यायाधीशाने सांगितले आहे की मला बदलीची धमकी दिली जाईल.
ते म्हणाले की, मी कोणाला घाबरत नाही. मी न्यायाधीश झाल्यानंतर कोणतीही मालमत्ता जमा केलेली नाही.
मला काही फरक पडत नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शेती करायला तयार आहे.
मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.अन मी कोणतीही राजकीय विचारधारा मानत नाही.
न्यायाधीशांचा प्रश्न- तुम्ही जनतेचे संरक्षण करत आहात की कलंकितांचे
‘बी’ अहवालावर दुसऱ्या खंडपीठात सुनावणी सुरू आहे, मग क्लोजर रिपोर्टची मागणी का केली जात आहे,असे एसीबीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायमूर्ती संदेश म्हणाले- ज्यांना रंगेहात पकडले गेले, त्यांचा बी-रिपोर्ट तुम्ही दाखल करत आहात. खंडपीठाला आधीच माहिती दिली असताना तुम्ही मला तपशील का देत नाही?
तसेच ACB एसीबी प्रकरणी सुनावताना न्यायाधीश म्हणाले,” तुम्ही जनतेचे संरक्षण करत आहात की कलंकित व्यक्तींचे?
काळा कोट भ्रष्टाचाऱ्यांच्या संरक्षणासाठी नाही. भ्रष्टाचार हा कर्करोग झाला आहे.
सर्च वॉरंटचा धाक दाखवून अधिकारी पैसे उकळत आहेत.
न्यायालयाने एसीबी एडीजीपींना सर्व रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याचवेळी न्यायालयाने पुढील सुनावणी ७ जुलै रोजी घेण्याचे आदेश दिले.
हा हायकोर्टाचा धमकी देणारा न्यायाधीश कोण हे मात्र समजू शकले नाही.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
नुपूर शर्मा प्रकरण:सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वैयक्तिक हल्ल्याने नारा
जम्मू मध्ये पकडलेला लष्करचा दहशतवादी भाजप चा आयटी सेल प्रमुख
Patna civil court Bomb Blast न्यायालयात पुरावा म्हणून आणला बॉम्ब, स्फोटात अधिकारी जखमी
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 05, 2022, 14:18 PM
WebTitle – Threats to transfer the judge at Karnataka : Judge says – not afraid