इन्स्टंट जिलबी..
साहित्य
1 वाटी मैदा
4 टेबलस्पून दही
1 टीस्पून बेकिंग पावडर
1 टीस्पून कॉर्नफ्लोअर( ऑपशनल)
केसरी रंग खाण्याचा
पाक
2 वाट्या साखर
1 वाटी पाणी
अर्ध्या लिंबाचा रस
इलायची पावडर
कृती
सर्व प्रथम एका पातेल्यात 2 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी घालून पाक करून घ्यावा,
साखर विरघळून झाल्यानंतर 4 ते 5 मिनिटेच पाक होऊ द्यावा,
एकतरी पाक तयार होईल.(त्यात इलायची पावडर, आणि रंग ही घालू शकता)
पाकात अर्ध्या लिंबाचा रस घालावा जेणेकरून पाक नंतर क्रिस्टलाईज होणार नाही.
एका भांड्यात मैदा, दही, बेकिंग पावडर घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालत, भरपूर फेटून जीलाबीचे बॅटर तयार करून घ्यावे..
बॅटर फार पातळ नको, आणि घट्ट ही नको, साधारण इडली सारखे करावे.
आता त्यात खाण्याचा केसरी रंग घालून व्यवस्थित घोळ तयार करून घ्यावा.
( कुरकुरीत हव्या असल्यास यात एक चमचा कॉर्नफ्लोअर किंवा तांदूळ पिठी टाकू शकतो)
तळण्याकरता पसरट पॅन मध्ये तेल मध्यम तापवून घ्यावे.
सॉस बॉटल, किंवा पायपिंग
बॅग मध्ये मिश्रण भरून तेलात जिलब्या सोडाव्या.दोन्ही नसल्यास दुधाच्या पिशवीला तूर डाळी एवढं छिद्र करूनही वापरू शकता.
दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळल्यावर पाकात सोडाव्या.
कडक हव्या असल्या तर पाकातून 4,5 मिनिटात काढून घ्यावा, नरम हव्या असतील तर मुरू द्यावा. इन्स्टंट जिलबी
by Dr Amita
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)