भारतातील जे महत्वाचे नाटककार आहेत त्यातील एक महत्वाचे नाटककार म्हणजे प्रेमानंद गज्वी हे होत. प्रेमानंद गज्वी हे केवळ नाटककार आहेत असे नव्हे तर त्यांनी कथा, कविता, कादंबरी, वैचारिक लेखन असे साहित्याच्या प्रांतात विविध साहित्य प्रकार लिलया हाताळले आहेत. त्यांच्या नाटक, एकांकिका, वैचारिक साहित्य याला राज्य पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक विद्यापीठात त्यांची नाटके अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांच्या नाटकावर ८/९ प्राध्यापक विध्यार्थ्यांनी पी.एच.डी. केली आहे. त्यांच्या नाटकांचे इंग्रजी, रशियन, हिंदी, कन्नड, बंगाली अशा विविध भाषेत भाषांतरे झाली आहेत.
त्यांच्या ‘तन माजोरी’ या नाटकात नाना पाटेकर, उदय म्हैसकर, सुनील तावडे, ‘ किरवंत ‘ मध्ये डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी, ‘जय जय रघुवीर समर्थ’ मध्ये प्रमोद पवार, ज्योती शेवडे, नंदू गाडगीळ, ‘गांधी आंबेडकर ‘ मध्ये भक्ती बर्वे इनामदार, किशोर कदम, मंगेश भिडे, शरद पोंक्षे, ‘शुद्ध बीजापोटी ‘ मध्ये डॉ. गिरीश ओक ‘ ड्याम इट अनू गोरे ‘ मध्ये शीतल क्षीरसागर अशा नाट्य सिने क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी कामे केली आहेत.
अशा चतुरस्त्र साहित्यिकाचा उचित गौरव होणे महत्वाचे आहे. त्यांच्या पंच्याहत्तरी च्या निमित्ताने
कल्याण मध्ये बोधी नाट्य परिषद कल्याण शाखा आणि प्रेमानंद गज्वी अमृत महोत्सव सोहळा संयोजन समिती यांच्या विद्दमाने
आचार्य अत्रे रंगमंदिर येथे प्रेमानंद गज्वी यांच्या अमृत महोत्सव सोहळा दिमाखदार पणे आयोजित होता.
आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दर्शनी भागात दारावर कमान होती. या कमानीवर प्रेमानंद गज्वी यांची प्रसन्न छबी
आणि त्यांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ. आनंद आणि चैतन्य भरणारे होते.
प्रेमानंद गज्वी यांची सुरेख रांगोळी लक्षवेधक आणि शोभा वाढवत होती. पांचाळ या कलावंताच्या कलेला सलाम.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार असं कार्यक्रमाचं स्वरूप .
यावेळी त्यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृती म्हणजे एकांकिका, नाटकातील निवडक प्रवेश अत्यंत दिमाखदार पणे सादर करण्यात आले.
अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट/ अभिनय कल्याण, यांनी ‘ तन माजोरी ‘ नाटकातील प्रवेश सादर केला. दिग्दर्शन अभिजित झुंजारराव यांनी केले तर कलाकार होते उज्ज्वल ताठे, रवी काळे, नेहा राऊत, नितेश हलगेकर, अजिंक्य टेकाळे, सागर घुमरे, स्वागत पोवार. चेतन पवार दिग्दर्शित ‘ कुणाचे ओझे ‘ मध्ये विक्रांत शिंदे व साक्षी नन्नवरे यांनी भूमिका केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा, यांनी ‘ महाब्राम्हण ‘ ह्या हिंदी नाटकातील नाट्य प्रवेश सादर केला. दिग्दर्शन प्रा. डॉ. प्रदीप सरवदे यांनी केले तर कलावंत होते शिवाजी शिंदे, रवींद्र सावंत, करुणा कातखडे, संजय गावडे, प्रकाश शिंदे व प्रा. डॉ. प्रदीप सरवदे. बोधी नाट्य परिषदेने ‘ हवे पंख नवे ‘ नाटकातील नाट्य प्रवेश सादर केला. दिग्दर्शन अशोक हंडोरे यांनी केले तर कलावंत होते विक्रांत शिंदे, प्रा. डॉ. अनुप्रिया खोब्रागडे, आकाश बनसोडे, प्रदीप कदम .तर या सर्व नाट्य प्रवेशांसाठी प्रकाश योजना चेतन पवार , रंगनाथ आदागळे, यांनी समर्थपणे सांभाळली. नाट्य प्रवेशातील कलावंतांचा अभिनय आणि जोश उत्साहवर्धक होता.
सुरेल संगीत आणि लेझिम पथक यांच्या पाठोपाठ रसिक प्रेक्षक यांच्या सोबत
प्रेमानंद गज्वी आणि उमा गज्वी यांचे रंगमंदिरात आगमन एकदम मस्त भारावलेले.
कल्याणकर मंडळींनी केलेला गज्वी उभयतांचा सत्कार एकदम हृदयस्पर्शी.
प्रेमानंद गज्वी यांच्या निवडक कविता ही सादर करण्यात आल्या. प्रा एकनाथ जाधव,
डॉ अलका पवार, डॉ प्रदीप सरवदे, आनंद जाधव, रवी सावंत, सुरेश पवार,
संबोधी बाळदकर, चेतन पवार आणि सुरेखा गावंडे यांनी कविता समजून, जोषपूर्ण सादर केल्या.
काही कवितांना मान. दत्ता जाधव यांनी सुरेल संगीत साज चढविला. वयाच्या अंशीव्या वर्षी दत्ताभाऊ चा उत्साह आणि तळमळ थक्क करणारी. सर्वच कलावंतांनी कविता आणि गाणी मस्त सादर केल्या. यातील सहभागी गायक कलावंत रवींद्र बागुल, गौतम सोनावणे, पुनम गाढे जाधव, नीलिमा अहिरे, तुषार पाटील आणि डॉ हर्षल गवई हे होते.
या कार्यक्रमात आनंद जाधव आणि विद्या बाळदकर यांचे सूत्र संचालन अभ्यासपूर्ण आणि कार्यक्रमाची उंची वाढवणारे होते.
या दिमाखदार सोहळ्यात लक्षणीय बाब म्हणजे त्याचे सुविहित आयोजन. अशोक हंडोरे, राज बाळदकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा चे पदाधिकारी, शिवाजी शिंदे, डॉ विठ्ठल शिंदे, डॉ प्रदीप सरवदे, आनंद जाधव आणि इतर अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्वांचा नामोल्लेख करता येत नाही त्याबद्दल क्षमस्व.
कोणताही भव्य कार्यक्रम करायचा म्हणजे आर्थिक भार व रसिक प्रेक्षकांशी संवाद महत्वाचा असतो ती जबाबदारी राज बाळदकर , शिवाजी शिंदे, रवींद्र सावंत, आनंद जाधव, चेतन पवार, प्रा. डॉ. प्रदीप सरवदे, प्रा. युवराज मेश्राम, ससाणे सर, सिद्धार्थ मोरे, उदय लोकरे, रमेश शेगोकर, राहुल वाघ, ए.आर. कांबळे, प्रा. डॉ. अनुप्रिया खोब्रागडे, डॉ. विकास जाधव यांनी यशस्वी रित्या पार पाडली. या सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन
ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यकार मान. प्रेमानंद गज्वी यांना नाट्यकर्मी आणि कलावंतांनी दिलेला मनाचा मुजरा.
यावेळी रसिक प्रेक्षक, वाचक आणि प्रेमानंद गज्वी यांचे चाहते यांची उपस्थिती नक्कीच सुखावणारी होती.
अमृत महोत्सवी वर्षात प्रेमानंद गज्वी यांचे अभिष्ट चिंतन. त्यांना उत्तम आरोग्य लाभो
आणि त्यांचेकडून उत्तमोत्तम साहित्य प्रकाराची निर्मिती होवो यासाठी मंगल कामना. अनेक हार्दिक शुभेच्छा.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
गुप्त बैठका, राज ठाकरे-शिंदे यांची चार वेळा चर्चा… शिवसेना बंडखोर मनसेत विलीन होणार का?
राज्यपाल कोश्यारी इज बॅक : येताच पत्र लिहून घेतला मोठा निर्णय
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 29, 2022, 20:24 PM
WebTitle – Amrut Mahotsav ceremony of senior writer playwright Premanand Gajvee concluded with enthusiasm