बंगरुळ : राजकारण्यांची अलिकडची भाषा ही वादग्रस्त होत चालली असली तरी लोकानी आता त्यांना फारसे गांभीर्याने घ्यायचे सोडून दिले आहे.काही वेळेस राजकारणी एवढे अतर्क्य बोलून जातात की लोकाना अशा गोष्टीवर विश्वास ठेवणेही कठीण होऊन जाते. भाजपच्या एका मंत्र्याने असेच एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि वन मंत्री उमेश कट्टी यांनी म्हटलंय की, पुढील लोकसभा निवडणुकीनंतर भारतात 50 नवीन राज्ये असतील.
उत्तर कर्नाटकासाठी वेगळ्या राज्याचे प्रखर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मंत्री उमेश कट्टी म्हणाले की, पुढील लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकचे विभाजन होईल आणि देशात 50 नवीन राज्ये निर्माण होतील. कट्टी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः या प्रश्नावर पुढाकार घेतील, असा दावाही त्यांनी केला.
बेळगावी बार असोसिएशनच्या एका कार्यक्रमात मंत्र्यांच्या या वक्तव्याची चर्चा आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
मंत्री म्हणाले की, सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की पुढील लोकसभा निवडणुकीनंतर देशात 50 हून अधिक राज्ये निर्माण होतील. संपूर्ण कर्नाटकात पसरलेल्या लोकसंख्येच्या आधारावर उत्तर कर्नाटकही वेगळे राज्य होणार हे निश्चित. 2024 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: नवीन राज्यांची स्थापना करतील. महाराष्ट्र तीन, कर्नाटक दोन आणि उत्तर प्रदेश चार अशी राज्ये होणार आहेत.
मंत्री म्हणाले की, बेंगळुरू शहरात गर्दी वाढत आहे. नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत काढावे लागत आहेत.
अनेक भागात पाणीपुरवठा टंचाई आहे. उत्तर कर्नाटक राज्याच्या मागणीसाठी जनतेने एकत्र यावे,
असे आवाहन करून ते म्हणाले की, उत्तर कर्नाटकात प्रचंड क्षमता आहे.
अगोदरही केलीय स्वतंत्र राज्याची मागणी
हुक्केरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कट्टी यांनी यापूर्वीही उत्तर कर्नाटकसाठी वेगळ्या राज्याची मागणी केली होती,
त्यामुळे सत्ताधारी भाजपला राजकीय अडचणीचा सामना करावा लागला होता.
2019 मध्ये, कट्टी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना उत्तर कर्नाटकला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची विनंती केली होती.
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्ये आल्याने महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
अखेर एकनाथ शिंदे यांच्या नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 24, 2022, 18 :32 PM
WebTitle – Maharashtra will be divided into three separate states – BJP leader Umesh Katti