विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. हा आरोपी गेल्या महिनाभरापासून आग्रा तुरुंगात अनेक गुन्ह्यांमध्ये बंद आहे. आरोपी सोनूला गोरखपूरच्या कँट पोलिस वॉरंट ‘बी’ अंतर्गत अटक करून न्यायालयात हजर केले गेले. तेथून त्याची रवानगी गोरखपूर तुरुंगात करण्यात आली. धमकी देणारा आरोपी फिरोजाबादच्या सिरसागंज पोलिस स्टेशन हद्दीतील अहमदपूरचा रहिवासी असून भीम आर्मी चा नेता असल्याची माहिती समोर येत आहे.
यूपी विधानसभा निवडणुकीदरम्यान, 4 फेब्रुवारी 2022 रोजी, लेडी डॉन नावाच्या ट्विटर हँडलने मुख्यमंत्री योगी यांना बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी दिली होती. निवडणुकीपूर्वी सीएम योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, लेडी डॉन ट्विटर हँडल ट्रेस करत गोरखपूर पोलीस आरोपी सोनूपर्यंत पोहोचले. सोनूला महिनाभर आग्रा तुरुंगात ठेवण्यात आले होते, त्यानंतर गोरखपूरच्या कँट पोलिसांनी त्याला वॉरंट ‘बी’ अंतर्गत अटक करून गोरखुपर येथे आणले. येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.
बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी
आरोपी सोनू हा फिरोजाबादच्या सिरसागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहमदपूरचा रहिवासी आहे.
तो भीम आर्मीचा नेता असल्याचे सांगितले जात आहे.
भीम आर्मी चे प्रमुख चंद्रशेखर गोरखपूरमधून निवडणूक लढवत असल्याने आरोपींने सीएम योगी यांना बॉम्ब ने उडवून देण्याची
धमकी लेडी डॉन नावाच्या ट्विटर हँडलवर दिली होती,
असा अंदाज गोरखपूर पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत आरोपींविरुद्ध कँट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सीएम योगी यांना लेडी डॉन नावाच्या ट्विटर हँडलवरून धमकी देण्यात आली होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ट्विट करणाऱ्याने हापूर पोलिसांना देखील टॅग केले होते. या खात्यातून मेरठ आणि लखनऊमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या धमक्यांनंतर तपास पथक या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते. निवडणुकीदरम्यान केलेल्या या ट्विटमध्ये ओवेसी हे प्यादे आहेत, खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत, असे लिहिले होते. भाजप नेत्यांच्या वाहनांवर आरडीएक्स हल्ला करणार, तुमची टीम लावा. दिल्ली पाहू नका.असे म्हटले होते.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
अखेर एकनाथ शिंदे यांच्या नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 24, 2022, 15 :18 PM
WebTitle – Bhim Army leader arrested for threatening to blow up with bomb Yogi Adityanath