आजचे ध्येयवादी तरुण कॉलेजची पायरी चढताच आपल्याला भविष्यात काय बनायचे आहे हे निश्चित करून त्या दिशेने वाटचाल सुरू करतात. वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रकी क्षेत्र या कडे भारतीय तरुणांचा कल अधिक असतो पण हे क्षेत्र नाकरूनही काही वेगळे करू पाहणारे तरुण असतात त्यातील एक तरुण म्हणजे वैभव हंडोरे हा होय.
लहानपणापासूनच कला क्षेत्राची आवड असलेला हा तरूण कॉलेज जीवनात फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी ह्या क्षेत्राकडे वळाला. कॉलेज जीवनात काढलेले फोटो व बनविलेल्या शॉर्ट फिल्म गाजू लागल्या आणि त्याने ह्याच क्षेत्रात करियर करण्याचे निश्चित केले. कॉलेज मध्ये शिकत असतानांच फोटो ग्राफी शिकण्यासाठी त्याने मुंबईला NIP (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी) मध्ये प्रवेश घेतला तर सिनेमॅटोग्राफीसाठी अंधेरी , मुंबई येथील डिजिटल फिल्म अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवला.
दरम्यानच्या काळात मुंबई व संपूर्ण भारतात प्रतिष्ठेची समजली जाणारी 48-hr.शॉर्ट फिल्म स्पर्धेत त्याची शॉर्ट फिल्मची मुंबई मधून निवड झाली . ह्या स्पर्धेत शॉर्टफिल्म साठी एक विषय दिला जातो. विषय घोषित झालेल्या क्षणापासून 48 तासाच्या आत शॉर्टफिल्म बनवून स्पर्धेत पाठवायची असते. वास्तविक पाहता बॉलिवूड नगरी मुंबई मधील ह्या स्पर्धेत अनेक दिग्गज सिनेकलावंत , त्यांची मुले, नातेवाईक सहभागी झालेले असतात अशा मानाच्या, प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजयी होणे हे आत्मविश्वास वाढवायला महत्वाचे घटक ठरतात. ह्या क्षणापासून वैभवाचा आत्मविश्वास वाढला . डिजिटल फिल्म अकॅडमी मधील वर्षभराचा त्याचा डिप्लोमा पूर्ण झाला आणि पुढील स्पेशियालायजेशनसाठी कुठे प्रवेश घ्यायचा याची जुळवाजुळव सुरू झाली.
चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्यायचे ठरले. इन्स्टिट्यूटची शोधाशोध सुरू झाली आणि पुण्याची FTII ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) किंवा अमेरिकेतील एखादी चांगली इन्स्टिट्यूट जिथून हॉलिवूड मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल असे दोन पर्याय समोर उभे राहिले. निर्णय झाला अमेरिकेतील इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्यायचा. सर्व व्यवस्थित तयारी करून न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी मध्ये प्रवेश मिळाला.न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीच्या हॉलिवूड नगरी लॉस एंजीलस येथील इन्स्टिट्यूट, ब्रँच मध्ये प्रवेश घेतला. जगातील सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफर कडून त्याला शिक्षण घेण्याची शिकण्याची संधी मिळाली. शिक्षण चालू असताना जवळपास ५० शॉर्टफिल्म मध्ये वैभव हंडोरे ने सिनेमॅटोग्राफर म्हणून भूमिका निभावली. त्याने बनविलेल्या अनेक शॉर्ट फिल्म गाजल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्या खलिल शॉर्ट फिल्मला पारितोषिके मिळाली.
1.Mercy
2.Cross Words Together
शिवाय खालील शॉर्ट फिल्म बनविण्यात त्याचा मोलाचा वाटा होता
1. Letters for you
2. Over My Dead Body
3. Catch Sight of You
4. Echo
5. Slight And Ray
6. Written Words
7. Paper Boats
8. Ming
9. Nightingale
10. Symmetry
11. Black mail
बेस्ट सिनेमॅटोग्राफर ऑफ युरोप
शॉर्ट फिल्म स्पर्धांमध्ये त्याला
” बेस्ट सिनेमॅटोग्राफर ऑफ युरोप” “बेस्ट सिनेमॅटोग्राफर ऑफ आशिया” म्हणून त्याला नामांकने मिळाली
पुढे हॉलिवूड मध्ये त्याला कामे मिळू लागली. हॉलिवूडच्या The Last Conception ह्या विनोदी सिनेमान्वये त्याने हॉलीवूड मध्ये पदार्पण केले. पण अमेरीकेतील शिक्षण पूर्ण झाले होते. त्याला मायदेशी परतने भाग होते. तो भारतात परतला ते बॉलिवूड मध्ये करियर करण्याच्या उद्देशाने.
भारतीय फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड मध्ये प्रवेश मिळविणेही एवढी सहज सोपी गोष्ट नाही हे सर्वश्रुत आहे. त्यात ही गॉडफादर कुणी नाही म्हटल्यावर अधिकच काठीण काम पण त्याच्या प्रयत्नाला यश आले आणि मोठ्या बॅनरच्या वेबसिरीज त्याला मिळू लागल्या. एकता कपुरच्या ‘अल्ट बालाजी’ ( ALT BALAJI ) प्रोडक्शनची’ इट हॅप्पंड इन कलकट्टा ‘ ही वेब सिरीज मिळाली शिवाय ह्याच बॅनर ची फिचर फिल्म ही मिळाली.
त्याच दरम्यान अमिताभ बच्चन, इम्रान हश्मी यांची ‘ चेहरे ‘ ही फिल्म मिळाली. परदेशात स्लोविकिया येथे त्यांच्या सह काम करण्याची संधी त्याला प्राप्त झाली. सर्व सुरळीत होत आहे, कामे हळूहळू मिळत आहेत असं घडत असतांना देशात लॉक डाऊन लागला आणि फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली.
नव्या उमेदीने सुरवात केलेल्या कामावर विरजण पडले. फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवू पाहणाऱ्या तरुणांसाठी हा मानसिक धक्काच होता. खरं तर हा काळ नैराश्याच्या होता. वर्षा दिडवर्षानंतर हळूहळू फिल्म इंडस्ट्रीने कात टाकली . याच काळात भारतीय विख्यात विनोदी अभिनेता वीरदास याचा स्टँड अप शो साठी त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले.
हा शो वैभव हंडोरे ने नेटफ्लिक्स ( NET FLIX ) साठी केला. पुढे अल्ट बालाजी वर गाजलेल्या ‘ अपहरण ‘ वेबसिरीज च्या दुसऱ्या भागासाठी म्हणजे ‘ अपहरण 2’ साठी त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले ते ही ‘कोरोना’ काळात. प्रत्येक आठवड्याला कोरोनाची टेस्ट केली जायची. परदेशी युरोपियन कलाकारांसोबत व तंत्रज्ञा सोबत सरबीयात त्याने ‘ अपहरण 2 साठी यशस्वी रित्या काम केले.
अल्ट बालाजीची ‘ कार्टेल ‘ ही सुंदर वेबसिरीज ही त्याने केली.
वैभवने बॉलिवूडच्या तीन हिंदी फिचर फील्म मध्ये सेकंड युनिट डी. ओ. पी. म्हणून काम केले आहे
१. यू टर्न
२. सब मोह माया है
३. ब्लॅक आऊट
लवकरच ह्या फील्म रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. हॉलीवूड आणि बॉलीवूड च्या बिग बजेटच्या फिल्म मिळाव्यात या साठी सध्या तो प्रयत्नशील आहे.अल्प अवधीत सिनेक्षेत्रात स्वकर्तृत्वावर उभा राहणाऱ्या ह्या तरुणाकडून युवकांनी प्रेरणा घ्यायला हवी. प्रामाणिकपणे मेहनत घेतली, हार न मानता चिकाटीने प्रयत्न करीत राहिले तर यश मिळू शकते हे प्रत्येक तरूणाने लक्षात घ्यायला हवे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
RRR Box office collection पहिल्याच दिवशी 200 कोटींचा आकडा पार
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 14 2022 18 : 00 PM
WebTitle – Vaibhav Hondore is an idealist young man in the field of cinematography