LIC IPO Listing News Updates: मोस्ट अवेटेड ,अनेकांना ज्याची उत्सुकता होती त्या एलआयसी इंडिया म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC IPO Listing) ची आज सकाळी 10:00 वाजता लिस्टिंग झाली. भारतीय शेअर बाजारात LIC च्या समभागांची सूची (LIC Ipo Listing) 8% च्या सवलतीने केली गेली आहे. LIC चे शेअर्स सकाळी ₹872 वर व्यापारासाठी उघडले गेले आणि त्यानंतरच्या च्या ट्रेडिंग शेशन मध्ये ₹906 ते ₹911 च्या दरम्यान व्यवहार करताना दिसले. शेअर ₹916 चा हाय लावला मात्र नंतर सेलिंग प्रेशर मध्ये शेअर टिकू शकला नाही.ने NSC मध्ये LIC समभागांची सूची ₹ 872 च्या किमतीवर बंद केली गेली आहे.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी इंडिया चे शेअर मंगळवारी सकाळी लिस्ट करण्यापूर्वी किंवा
प्री-ओपनिंग व्यवसायात सहा टक्क्यांच्या सवलतीने व्यवहार करत होते.
शेअर बाजारात LIC चे शेअर्स लिस्ट झाल्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्म्सनी LIC च्या शेअर्सचे कव्हरेज सुरु केले आहे.
जर आपण ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीबद्दल बोललो, तर त्याने एलआयसीचे शेअर्स तटस्थ श्रेणीत ठेवले आहेत, तर त्यासाठीचे (target) लक्ष्य ₹ 1000 ठेवले आहे. ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की जर एखाद्या गुंतवणूकदाराला एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याने शेअर बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन त्यात गुंतवणूक करावी.शेअर बाजारात सध्या मोठ्याप्रमाणात उलथापालथ सुरू आहे.
नफा काढून घेण्याचा प्रयत्न फसला
एलआयसीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसीधारकांना आणि सामान्य गुंतवणूकदारांना अपेक्षा होती की एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करून, ते त्याच्या सूचीमध्ये लिस्टिंग झाल्यावर नफा मिळवू शकतील.
LIC ची शेअर बाजारात सूचीकरणाच्या वेळी, गुंतवणूकदारांना किमान 5% प्रीमियमची अपेक्षा होती.
LIC ची इश्यू किंमत ₹ 949 ठेवण्यात आली आहे आणि त्यानुसार, 5 टक्के प्रीमियमनंतरही,
तिचे लिस्टिंग हजार रुपये प्रति शेअर दराने होणे अपेक्षित होते.मात्र तसे झाले नाही.आणि गुंतवणूकदार अडकले.
ग्रे मार्केटने अगोदरच दिलेले संकेत
ग्रे मार्केटच्या प्रीमियमबद्दल बोलायचे झाले तर, मंगळवारी सकाळी LIC चे शेअर्स ₹ 28 च्या डिस्काउंटवर ट्रेडिंग करत होते.
त्यानुसार, LIC समभागांची सूची सुमारे ₹ 925 असण्याची शक्यता होती.मात्र तसे झाले नाही.
LIC चे शेअर्स सकाळी ₹872 वर व्यापारासाठी उघडले गेले.
एलआयसीच्या सूचीतून नफा कमावण्याची आशा असलेल्या आयपीओ गुंतवणूकदारांची निराशा होऊ शकते.
कोल इंडिया हा आतापर्यंतचा सर्वात मोठा PSU IPO होता
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) पूर्वी, नोव्हेंबर 2010 मध्ये कोल इंडियाचा IPO सर्वात मोठा PSU IPO मानला जात होता. कोल इंडियाच्या शेअर्सची इश्यू किंमत ₹ 245 ठेवण्यात आली होती. सध्या कोल इंडियाचे शेअर्स इश्यू किमतीच्या तुलनेत ४२% घसरणीसह व्यवहार करत आहेत. कोल इंडियाने नोव्हेंबर 2010 मध्ये आयपीओद्वारे 15,000 कोटी रुपये उभे केले.एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार ₹ 949 च्या इश्यू किमतीवर, LIC चे बाजार भांडवल ₹ 6,00,242 कोटी होते. सूचीबद्ध किंमतीनुसार, LIC चे मूल्यांकन ₹ 5,57,675 कोटींवर घसरले, परिणामी सुमारे ₹ 42,500 कोटींचे नुकसान झाले.
इंडेक्स पूल बॅक करताना दिसले
आज दिवसभरात निफ्टी आणि निफ्टी बँक हे दोन्ही इंडेस्क पूल बॅक मोडमध्ये दिसले.कालच्या डाउनफॉल नंतर आज बाजाराने चांगली रिकव्हरी केली असली तरी जाणकारांच्या मते हा केवळ पूल बॅक असल्याचे म्हटलेय.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य,शिक्षण मंडळाचा निर्णय
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 17, 2022 17:05 PM
WebTitle – LIC India share price down on first day Investors were not happy