नवी दिल्ली : राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथील सभेत असं वक्तव्य केलं होतं की “रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी खुद्द लोकमान्य टिळक यांनी बांधली आहे.” यावरून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक क्षेत्रातही प्रचंड गदारोळ सुरू झाला असून,राज ठाकरे यांच्या वक्तव्यास अनेकांनी चुकीचं ठरवत त्यांचे वक्तव्य चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.यावर आता थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असणाऱ्या छत्रपती संभाजी राजे भोसले यानीच स्पष्ट करत राज ठाकरे यांच्या वक्तव्याची हवा काढून घेतलीय.
काय म्हणाले होते राज ठाकरे ?
औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं होतं की “रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी बांधली? ती आमच्या लोकमान्य टिळक यांनी बांधली आहे.लोकमान्य टिळकांना आता आपण ब्राह्मण म्हणून बघणार का?
संभाजीराजे भोसले काय म्हणाले?
“कुणीही असेल आणि प्रामुख्याने एखादी जबाबदार व्यक्ती असेल त्यांनी इतिहास ज्यावेळी आपण मांडतो त्या इतिहासाला धरून बोलायचं असतं,आपल्याला इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात सुद्धा लावू नये,” “ज्यांनी कुणी (टिळकांनी) समाधी बांधली असं समोर आणलं आहे ते साफ चुकीचं आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. “छत्रपतींचा वंशज या नात्याने मी अधिकृतपणे सांगू इच्छितो की शिवरायांची ती समाधी लोकमान्य टिळक यांच्या हातून बांधली गेलेली नाही,”
समाधी शोधण्याचे श्रेय महात्मा जोतिराव फुले यांना
यावेळी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केलं की समाधी सर्वप्रथम महात्मा जोतिराव फुले यांनी शोधली,तिची पूजा सुरू केली,
तिथून ते सर्व सुरू झालं.आणि समाधी बांधण्याचे श्रेय हे सर्व शिव भक्तांचे आहे. कुणा एका व्यक्तीचे नाही.
खुद्द टिळकांचे वंशज म्हणतात आम्ही कधीही दावा केला नाही
लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक हे भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष आहेत. त्यांनी स्वत: सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं आहे की टिळकपरिवारातल्या कुठल्याच व्यक्तीनं रायगडावर टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली असा दावा कधीच केला नाही,पण राज ठाकरे यांच्या एका विधानामुळं जिथं आज सोशल मिडियावर, फेसबुकवर,ट्विटरवर,आणि समाज माध्यमांवर टिळकांच्या कामाचा जो काही अपमान होतोय किंवा टिळकांच्या नावाची खिल्ली उडवली जातेय,एका विधानामुळे एवढा हा ब्राह्मणद्वेष पुढे यावा,टिळकांच्या कार्याचा अपमान व्हावा हे बरोबर नाही.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो पत्नीचा मार खाऊनही…
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 03, 2022 14:30PM
WebTitle – Shivaji Maharaj’s Samadhi was not built by Lokmanya bal gangadhar Tilak