कल्याण: कल्याण पश्चिमेतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून महात्मा फुले चौकासमोरील बनविण्यात आलेले “भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान” महात्मा फुले चौक रस्ता ते सुभाष चौक रस्ता रुंदीकरणाअंतर्गत बाधित होत आहे.या कारवाईचा निषेध करत कल्याणमधील संविधानप्रेमी आंबेडकरी जनतेने लोकशाही मार्गाने निदर्शन, उपोषणादी सैंविधानिक मार्गाने आपले आंदोलन चालु केले आहे.यातच एक 85 वर्षाच्या वयोवृद्ध आज्जी आहेत.त्यांनी थेट आमरण उपोषण करण्याचे हत्यार उपसल्याने आता या प्रश्नावर जनमत एकवटून हा लढा व्यापक होतान दिसून येत आहे.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान” हे ईतिहासजमा होणार?
कल्याण पश्चिमेतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून महात्मा फुले चौकासमोरील बनविण्यात आलेले “भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान” महात्मा फुले चौक रस्ता ते सुभाष चौक रस्ता रुंदीकरणाअंतर्गत बाधित होत आहे. या विकास प्रकल्पात कल्याण (पश्चिम व पूर्व ) येथील तमाम आंबेडकरी जनतेचे अस्मितेचे केंद्रबिंदु असलेले सदर “भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान” हे ईतिहासजमा होणार आहे.या प्रकारामुळे कल्याण परिसरातील तमाम आंबेडकरी जनता संताप व नाराजी व्यक्त करीत आहे.
85 वर्षाच्या वयोवृद्ध आज्जी ने त्यांनी थेट आमरण उपोषण करण्याचे हत्यार उपसले
आज दि. १९ नोव्हेंबर, २०२१ पासून “आयुष्यमानिनी लक्ष्मीबाई मारुती ससाणे” या वयोवृध्द मातेने “आमरण उपोषण” या मार्गाने या कामी स्थानिक प्रशासनाविरोधातील आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. आणि या प्रकरणी आंबेडकरी जनतेच्या अतिशय महत्त्वाच्या अस्मितेच्या या मुद्यावर तोडगा मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही.असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. सदर आमरण उपोषण आंदोलनाला समाजाच्या सर्व थरांतून व तमाम आंबेडकरी जनतेतून वाढता पाठिंबाही मिळू लागला आहे.
कल्याण मधील तमाम आंबेडकरी बंधु – भगिनींनो,
सदर आंदोलनाला आपण सर्वतर्हेचा पाठिंबा व प्रत्यक्ष सहकार्य करावे. ही नम्र विनंती येथिल आंदोलनकारी आंबेडकरी जनतेकडून येथे करीत आहोत.
आपला समाजबांधव
शेतकरी कायदे रद्द मात्र आंदोलन मागे घेणार नाही,राकेश टिकैत म्हणाले
समीर वानखेडे च्या शाळेच्या दाखल्यावर ते मुस्लिम – नवाब मलिक
भाजप माजी आमदाराने कंगना राणावत वर केला गुन्हा दाखल, म्हणाले..
जयभीम चित्रपट वाद: हीरो सूर्याला मारण्याची धमकी;पोलिस तैनात
पोचिराम कांबळे : एका नामांतर शहिदाची अस्वस्थ कहाणी..!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 19, 2021 14:21 PM
WebTitle – 85-year-old grandmother goes on hunger strike against demolition of Ambedkar memorial