मणिपूर मध्ये दोन महिला ना नग्न अवस्थेत परेड केल्याचा दोन महिन्यांपूर्वीचा जुना व्हिडिओ समोर आल्यानंतर गुरुवारी चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, हेरादास (३२) असे मुख्य आरोपीला एका व्हायरल व्हिडिओच्या मदतीने थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली, ज्यामध्ये तो हिरवा टी-शर्ट घातलेला दिसत होता. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात आल्यानंतर देशात खळबळ उडाली.आणि अनेक दिवसांच्या मौना नंतर प्रधानमंत्री यावर बोलले.शिवाय पोलिसांना आरोपींवर कारवाई करत अटक करावी लागली.मग या गोष्टी अगोदर का झाल्या नाहीत असा मूलगामी प्रश्न इथं उपस्थित होतो. ईशान्येकडील राज्याच्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी सरकार गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेचा विचार करत आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून आरोपींना पकडण्यासाठी 12 पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी सुमारे 800 ते 1000 लोक अत्याधुनिक शस्त्रे घेऊन बी.फेनोम या गावात घुसून घरफोडी करून मालमत्तेची लूट केली आणि घरे जाळली.
एफआयआरनुसार, जमावाने एका पुरुषाची हत्या केली आणि तीन महिलांना कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यापैकी एक (21) वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला,तिच्या 19 वर्षीय भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा खून करण्यात आला.
एएनआय ने दिला मुस्लिम एंगल नंतर मागितली माफी
न्यूज एजन्सी एएनआय ने पोलिसांनी 4 आरोपी पकडल्यानंतर त्याला मुस्लिम एंगल देण्याचा प्रयत्न केला,त्यामुळे काहीकाळ भाजप प्रो आयटी सेल आणि इतर पत्रकार, यांच्या जीवात जीव आला आणि त्यांनी आनंदी होत जोर लावत मोठ्या ताकदीने यात मुस्लिम एंगल रेटला.मात्र दोन्ही घटना वेगळ्या आहेत.पोलिसांनी ज्या 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. का ते सांगायला नको,
मात्र पोलिसांनी दुसऱ्याच घटनेत पकडलेल्या इंफाळ शहरातील आरोपींची नावे मुस्लिम असल्याने जाहीर केली आहेत.
दोन गुन्हे घडलेले आहेत,मग नावे एकाच ठिकाणची का जाहीर झाली? आणि तीही एकाच वेळी दोन्ही घटना मधिल आरोपी का जाहीर केले गेले? पोलिसांनी सुद्धा इथं मोठी भूमिका निभावली आहे? सोशल मिडियात याबद्दल लोकही बोलत आहेत.
दोन महिलांना नग्न परेड करण्यात आली त्या घटनेचे ठिकाण हे मणीपुर मधिल बि फेनंम गाव आहे,
आणि मुस्लिम आरोपी पकडल्याचा दावा केला जातोय ते इंफाळ शहर आहे.
खालील नकाशा पाहिला तर दोन घटना कोणत्या ठिकाणी आणि किती अंतरावर घडल्या याचा सहज अंदाज येतो.
खैर,एएनआय नंतर मागितली माफी (परंपरेनुसार) मात्र तोपर्यंत रायता फैल गया था,जे साध्य करायचं ते करून झालं.
न्यूज एजन्सी ना घटनास्थळ माहिती असतं खासकरून जेव्हा देशात अशांतता आहे हिंसाचार घडत आहे.त्यावेळी विशेष लक्ष देणे गरजेचे. आम्ही फार छोटे माध्यम आहोत,पण आम्ही ती काळजी घेतो,जबाबदारी खूप मोठी असते.अनेकांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न असतो. आणि ही गोष्ट चुकून किंवा अनावधाने झालेली नाही,ही बेसिक गोष्ट जर आम्ही आमच्यासारखे फॉलो करतात तर एएनआय सारख्या मोठ्या न्यूज एजन्सीस तर करणारच,अन करतातही पण इथं जरा प्रकरण वेगळं होतं.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 21,2023 | 12:37 PM
WebTitle – 4 people arrested in Manipur women case, ANI apologized after Muslim angle