दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलचे दर आता सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत.अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून आता गाईच्या शेणापासून इंधन तयार करण्याचा सल्ला राष्ट्रीय कामधेनू आयोगाने दिला आहे. (national kamadhenu commission proposes to use cow dung cng on fuel price hike) आत्मनिर्भर भारत
आत्मनिर्भर भारत
वाढत्या इंधनदरांमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही हिरवा कंदील दर्शवण्यात आला आहे. रिक्षासाठी आता किमान २१ तर टॅक्सीसाठी किमान २५ रुपये भाडे आकारण्यात येईल. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गायीच्या शेणापासून बनलेल्या नॅच्युरल गॅस CNG चा उपयोग करण्याचा उपाय सुचवत गायीच्या शेणापासून बनणारा गॅस स्वस्त आणि मेड इन इंडिया आहे, असे कामधेनू आयोगाने म्हटले आहे.
दरम्यान, दोन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागले आहे.
आक्रसलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न अपु
२०२०-२१ या आर्थिक वर्षांत देशाचा जीडीपी ७.७ टक्क्याने घसरेल असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने व्यक्त केला आहे.
या अगोदर रिझर्व्ह बँकेने जीडीपी ७.५ टक्क्याने घसरेल असा अंदाज वर्तवलाच होता.
तर जागतिक बँकेने ९.६ टक्क्याने जीडीपी घसरेल असे सांगितले होते.
पण सरकारने गुरुवारी अधिकृतपणे जीडीपी घसरेल असे आता सांगितले आहे.
गेल्या ४० वर्षांतली सर्वांत मोठी ही घसरण आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत कृषी क्षेत्र वगळून अन्य सर्व क्षेत्रांमध्ये ही घसरण असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेचे म्हणणे आहे.२०२०-२१ या आर्थिक वर्षांत जीडीपी १२३.३९ लाख कोटी रु. राहील असा अंदाज होता. तर २०१९-२०मध्ये जीडीपी १३३.०१ लाख कोटी रु. इतका होता. ही आकडेवारी महत्त्वाची आहे कारण आता जीडीपी वाढण्याच्या अनुषंगाने सरकारला आपला आगामी अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे.
हेही वाचा .. आक्रसलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न अपुरे
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 24, 2021 12:50 pm
Web Title: Kamdhenu commission proposes use cow dung cng fuel price hike