बसपा सर्वेसर्वा मायावती यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. यावेळी पत्रकार परिषद घेताना मायावतींनी मोठी घोषणा केली आहे. त्यांचा पक्ष बसपा आगामी 2024 लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यावरही मायावतींनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सपा प्रमुखांनी सरड्यासारखे रंग बदलले आहेत.
2024 लोकसभा निवडणूक BSP, मायावती यांनी केली मोठी घोषणा
यावेळी बसपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मायावती म्हणाल्या.
बसपा कोणालाही फुकटचे समर्थन करणार नाही, निवडणुकीनंतर युतीबाबत विचार करणार असल्याचं मायावतींनी म्हटलं आहे.
पक्षाचा जनाधार वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
निवृत्तीबाबत मायावती म्हणाल्या की, मी सध्या असा काही निर्णय घेणार नाही.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे स्वागत
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत मायावती म्हणाल्या, “मला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. पण मी इतर काही कामात व्यस्त असल्याने मी कोणताही निर्णय घेतला नाही. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे आम्ही स्वागत करतो. बाबरी मशिदीबाबत भविष्यातील कोणत्याही कार्यक्रमाचेही आम्ही स्वागत करतो. सर्व धर्मांच्या समानतेच्या विचारसरणीवर आमचा विश्वास आहे.”
मायावतींनीही मोदी सरकारवर निशाणा साधला.त्या म्हणाल्या की ,
“मोफत रेशनचं आश्वासन देऊन देशाला गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला जातो आहे.“
येणाऱ्या निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. ईव्हीएमबद्दल लोकांची धारणा वेगळी बनली आहे.
आज धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. “सरकारची विचारसरणी जातीयवादी आणि संकुचित आहे.”
मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट यांनी अभिनंदन केले
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांनीही मायावतींना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय सीएम योगी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली “तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
बलात्कार पीडितेची ‘टू फिंगर टेस्ट’, हायकोर्टाने ठोठावला डॉक्टरांना मोठा दंड,जाणून घ्या कारण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 15,2024 | 15:38 PM
WebTitle – 2024 Lok Sabha elections BSP, Mayawati made a big announcement that they will fight on their own