असं म्हणतात की प्रेमात आकंठ बुडालेली व्यक्ती काहीही करायला मागेपुढे पाहत नाही. पण ते प्रेम फक्त 20 दिवसांचे असेल तर काय म्हणाल. होय, काही दिवसांपूर्वी खुनाची अशी खळबळजनक घटना समोर आली होती, ज्याने पोलिसांनाही धक्का बसला होता. वास्तविक, एका मुलीने दोन लोकांची हत्या केली होती आणि जे दोन लोक मरण पावले ते दुसरे कोणी नसून त्या मुलीचे पालक होते. दुहेरी हत्याकांडाची ही घटना त्या मुलीच्या प्रियकराने घडवली होती, ज्याचे प्रेम केवळ 20 दिवसांचे होते.यासाठी मुलीने केला आई-वडिलांचा खून केला.
5 जुलै 2022 गुरुवार, कानपूर
त्या दिवशीची सकाळची वेळ,जेव्हा कानपूरच्या बर्रा परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने सगळेच हादरून गेले होते.पहाटेच्या सुमारास राहत्या घरात वृद्ध दाम्पत्याचा गळा चिरून खून केला गेला पण ही घटना जितकी भयंकर होती,त्यामागील कटाची कहाणीही तितकीच भयानक आहे.
धारदार शस्त्राने गळा चिरला
या हत्येची संपूर्ण कहाणी जाणून घेण्यापूर्वी या घटनेमागील कारस्थान समजून घेण्याचा प्रयत्न करूया. निवृत्त ऑर्डिनन्स कर्मचारी मुन्नालाल (६१) आणि त्यांची पत्नी राजदेवी (५५) हे त्यांची मुलगी कोमल आणि मुलगा अनुपसोबत कानपूर मधिल बर्रा येथील ईडब्ल्यूएस कॉलनीत राहत होते. मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती.तर मुलाचे त्याच्या पत्नीशी पटत नव्हते त्यामुळे त्याची पत्नी लग्नानंतर लगेचच आपल्या माहेरी निघून गेली होती. दरम्यान, 5 जुलै रोजी सकाळी वृद्ध दाम्पत्य आपापल्या बेडवर मृतावस्थेत आढळले. कोणीतरी धारदार शस्त्राने दोघांचे गळे चिरले होते.
रोहितने गुन्ह्याची कबुली दिली
या खळबळजनक घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांनी घटना घडली त्या परिसरातील,आजूबाजूच्या परिसरातील लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले गेले. ज्यामध्ये परिसरातील रहिवासी असलेल्या रोहित नावाच्या मुलाचे काही फुटेज त्यात आढळून आले. जो रात्री उशिरा संशयास्पदरित्या घटनास्थळी जाताना दिसला होता. त्या आधारे पोलिसांनी रोहितला अटक केली. पोलिसांनी रोहितची कडक चौकशी केली,त्याला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी रोहितने आपला गुन्हा कबूल केला.पण चौकशीत ज्या गोष्टी बाहेर आल्या त्या आणखीनच धक्कादायक होत्या वास्तविक रोहित हा कोमलचा दुसरा बॉयफ्रेंड होता, कोमल ही मृत्यू झालेल्या जोडप्याची मुलगी आहे, कोमलचा पहिला बॉयफ्रेंड रोहितचाच सख्खा भाऊ राहुल आहे, जो सैन्यात असून सध्या त्याची पोस्टिंग मुंबईत आहे.
कहाणीमध्ये ट्विस्ट
घटनेच्या २० दिवस आधी राहुलने त्याचा भाऊ रोहितला कोमलशी एकदा कॉन्फरन्स कॉलवर बोलायला लावले होते. पण हा एक कॉन्फरन्स कॉल भावासाठी आयुष्यातील सर्वात मोठी फसवणूक ठरला. त्या कॉन्फरन्स कॉलनंतर रोहित आणि कोमल दोघांची जवळीक वाढली,रोहित आता त्याचा भाऊ राहुलची मैत्रिण कोमलशी गुपचुप बोलू लागला,दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले, मात्र तिकडे मुंबईत बसलेला पहिला प्रियकर राहुल याला याची जाणीवही नव्हती.
प्रॉपर्टी आणि लग्नासाठी कोमलने उचललं धक्कादायक पाऊल
दोन्ही भावांशी संबंध ठेवून असलेली कोमल तिच्या आई-वडिलांवर नाराज असायची.खरंतर तिला रोहित किंवा राहुल या दोघांपैकी एकाशी लग्न करायचं होतं मात्र तिच्या घरचे लोक या लग्नासाठी तयार नव्हते. दुसरीकडे कोमलच्या भावाची घटस्फोटाची केस अजूनही चालू होती आणि भावाच्या घटस्फोटाच्या प्रकरणात आई-वडिलांची संपत्ती हातून जाण्याची भीती कोमलला वाटत होती. त्यामुळे तिने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा निर्णय घेतला.तिने आपल्या आई-वडिलांसोबतच भावाच्या हत्येचाही कट रचला आणि या कटात तिचा पहिला प्रियकर राहुलसोबतच त्याचा भाऊ आणि कोमलचा दुसरा प्रियकर रोहितही सामील झाला.
रोहितने केली दोघांची हत्या
5 जुलैच्या रात्री रोहितने कोमलसोबत मिळून तिच्या वृद्ध आई-वडिलांची हत्या केली, मात्र सुदैवाने कोमलच्या भावाचा जीव वाचला.
दुहेरी हत्याकांडानंतरच कानपूर पोलीस सतर्क होऊन तपासकामाला लागले होते. पोलीस या प्रकरणाचा शोध घेण्यात व्यस्त होते.
या कुटुंबातील चार लोकांपैकी दोन जणांची हत्या झाली होती, उर्वरित दोन लोक बाकी होते.
म्हणजे वृद्ध दाम्पत्याची मुलगी कोमल आणि मुलगा अनूप.
अनूप आणि त्याची बहिण आई-वडिलांचा खून झाला तरी अनभिज्ञ?
दरम्यान,काळ पुढे सरकत होता,आणि पोलिसांच्या तपासानेही वेग घेतला होता, पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याच्या मुलांची चौकशी सुरू केली. या घटनेबाबत मुलगा अनूप याने सांगितले की, मध्यरात्री त्याच्या आई-वडिलांचा नराधमांनी चॉपरने गळा चिरून खून केला असून, घटना घडली तेव्हा तो आपल्या खोलीत झोपला असल्याने त्याला काहीच कळले नाही. त्याची खोली पहिल्या मजल्यावर आहे तर खालच्या खोलीत त्याचे आई-बाबा राहतात,घटनेच्या दिवशी त्याची आई आणि बहीण आतल्या खोलीत सोबत झोपल्या होत्या. आणि पप्पा बाहेरच्या खोलीत झोपले होते, पहाटे, त्याच्या बहिणीने त्याला झोपेतून उठवले आणि सांगितले की कोणीतरी त्याच्या आई-वडिलांचा खून केला आहे.
तपासादरम्यान समोर आलेले महत्त्वाचे प्रश्न
पोलिसांच्या चौकशीत या स्टेटमेंटसोबतच मुलाने आणखी एक विशेष गोष्ट सांगितली,
ती म्हणजे काल रात्री त्याला चक्कर येत होती आणि त्याच्या जेवणात कोणीतरी काहीतरी मिसळले असल्याचा त्याला संशय आला.
मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे त्यादिवशी बाहेरून कोणीही त्यांच्या घरी आले नव्हते. मुलाच्या या वक्तव्यावरून दोन प्रश्न उपस्थित होत होते.
पहिली गोष्ट म्हणजे हत्येपूर्वी घरात कोणी बाहेरून आले नव्हते, तेव्हा त्याच्या जेवणात अमली पदार्थ कुणी मिसळले असतील?
आणि दुसरे म्हणजे, बहीण जेव्हा तिच्या आईसोबत झोपली होती, तेव्हा तिला तिच्या आईवर झालेल्या हल्ल्याची माहिती का झाली नाही?
कोमल ने भावाच्या मेव्हण्याचे नाव घेतलं
खरे तर या माहितीवरून पोलिसांना हे प्रकरण फारच विचित्र वाटत होतं. आता पोलिसांनी मुलीची चौकशी सुरू केली. कोमलनेही तिच्या भावाने जे स्टेटमेंट दिलं तशीच गोष्ट पोलिसांच्या चौकशीत सांगितली. म्हणजेच मध्यरात्री घरात घुसून मारेकऱ्यांनी आई-वडिलांचा खून केला आणि जोपर्यंत तिला जाग आली तोपर्यंत मारेकरी घरातून निघून जाण्यात यशस्वी झाले होते.हे सांगत असताना तिने एक नवीन गोष्ट सांगितली की तिने तीन मुखवटा घातलेल्या खुनींना घरातून पळताना पाहिले होते आणि त्यापैकी एक मयंक गुप्ता हा तिच्या भावाचा मेव्हणा (पत्नीचा भाऊ) असल्याची माहिती पोलिसांना दिली.आता पोलिसांनी पुन्हा एकदा मुलगा अनूपशी बोलायचं ठरवलं.
अनूपच्या सासरच्या मंडळींवर संशय
वास्तविक, अनूपचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला सुरू होता आणि त्याची पत्नी तेव्हापासूनच त्याच्यापासून वेगळी राहत होती. नुकसानभरपाई म्हणून पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी अनूप आणि त्याच्या कुटुंबीयांकडे 50 लाख रुपयांची मागणीही केली होती. अशा स्थितीत अनूप सांगत असलेल्या कथेनुसार त्याच्या आई-वडिलांची हत्या त्याच्या मेव्हण्यांनी केली असल्याचा संशय बळावला. म्हणजेच या दुहेरी हत्याकांडाचा पहिला संशय अनूपच्या मेव्हण्यांवर आणि सासरच्या मंडळींवरही आला होता. यासोबतच अनूप शेजारच्या एका दुकानदारावरही संशय व्यक्त करत होता. आणि या आरोपांनुसार पोलिसांनी अनूपच्या सासरच्या मंडळींचीही चौकशी सुरू केली होती.
तीन नव्हे, मुखवटा घातलेला मारेकरी एकच होता
साहजिकच, पोलिसांचा संशय तीन मुखवटाधारी मारेकर्यांवर होता, ज्यात अनूपच्या मेव्हण्यासोबत इतर दोन लोक मध्यरात्री घरात घुसले असावेत असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला, त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. पण फुटेजमध्ये वेगळीच कहाणी पाहायला मिळाली. फुटेजमध्ये तीन मास्क घातलेल्या मारेकर्यांऐवजी फक्त एक मुखवटा घातलेला माणूस रिकाम्या हाताने घराकडे जाताना दिसत होता.आणि जवळपास 1 तासानंतर तो परत पायी जाताना दिसला. पण परतताना त्याच्यासोबत एक बॅग दिसत होती. जेव्हा तीन मुखवटा घातलेल्या खुन्यांऐवजी हा एकटाच व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाला तेव्हा या व्यक्तीवर संशय येणे आणि त्यावरच तपासाची पुढची दिशा केंद्रित होणे साहजिक होते.
यासोबतच अशा तीन गोष्टी होत्या, ज्या शंका निर्माण करत होत्या-
1 क्लू क्रमांक-1 घरात घुसून खून झाला, मात्र घरातील कोणालाही हा प्रकार कळला नाही.
विशेषतः ती मुलगी जी स्वतः आईसोबत एकाच बेडवर झोपली होती.
2 क्लू क्रमांक-2 मुलीने सांगितले की तिने तीन मुखवटाधारी मारेकरी पळताना पाहिले होते,
मग तिने त्यावेळी आरडा ओरडा का केला नाही हा एक प्रश्न होता.
3 क्लू क्रमांक-3 खुनी इतक्या आरामात घरात कसा काय घुसला? कारण साधारणपणे लोक सहसा रात्री दरवाजा बंद करून झोपतात.
पोलिसी खाक्या दाखवल्यावर कोमल कबूल झाली
या तीन महत्त्वाच्या गोष्टी मुलगी कोमलला संशयाच्या भोवऱ्यात आणत होत्या.
आता पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली तेव्हा ती प्रश्नांची उत्तरे देताना अडखळायला लागली.
विशेषत: घराचे दार उघडे कसे काय होते? खुनी बघूनही ती गप्प का होती?
दोन-दोन खून होऊनही स्वत: बेजबाबदार राहण्याचे तीच्याकडे उत्तर नव्हते.तसेच तीच्या दोन्ही हातावर जखमेच्या खुणा होत्या.
अशा स्थितीत पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखल्यानंतर अखेर तिने प्रियकर रोहितसोबत मिळून मध्यरात्री घरातच आई-वडिलांची हत्या केल्याचे मान्य केले.
ज्यूस मध्ये विष मिसळून कुटुंबीयांना दिले
चौकशीत कोमलने सांगितलं की, तिने रोहितसोबत या हत्येचा कट रचला होता. तिला आई-वडिलांशिवाय तिचा भाऊ अनूपलाही त्यांना मारायचे होते. तिने काल रात्री आई-वडिलांना तसेच भावाला ज्यूस मध्ये विष मिसळून दिले होते, मात्र भावाने रस पूर्णपणे पिला नाही.तर त्याचे आई-वडील मात्र ज्यूस पिऊन झोपले होते. त्यावेळी त्यांचा खून करण्यात आला.खुनाच्या वेळी प्रियकराच्या हातून भावाचाही गळा चिरावा म्हणून तिने मध्यरात्री भाऊ अनूप याला उठवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गाढ झोपेत असलेल्या अनूपने दार उघडले नाही.तो सुदैवी ठरला.यामुळेच त्याचा जीव वाचला.त्यामुळे केवळ आई-वडीलांचा खून करून रोहित फरार झाला आणि प्लान बी नुसार कोमलने भावाला जागे केले आणि आई-वडिलांच्या हत्येचे नाटक सुरू केले.
कोमल दत्तक घेतलेली मुलगी होती
आता मुलगी कोमलवर पोलिसांची तपासाची दिशा पूर्णपणे घट्ट झाली होती. तिची सखोल चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना कळले की कोमलला मुन्नालाल आणि राजदेवी यांनी त्यांच्या एका नातेवाईकाकडून 24 वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. म्हणजेच त्यांना मुलगी नव्हती. यामुळेच त्यांनी कोमलला दत्तक घेऊन मोठ्या लाडाकोडात वाढवलं होतं. पण एक दिवस त्यांची हीच दत्तक मुलगी त्यांच्या हत्येचे कारण बनेल असं त्याना स्वप्नात देखील वाटलं नसेल.
मालमत्ता जाण्याची भीती कोमलला सतावत होती
कोमलचे त्याच वस्तीत राहणाऱ्या राहुल या मुलावर प्रेम होते आणि त्याच्याशी लग्न करायचे होते. राहुलचा भाऊ रोहितसोबतही आता कोमलचे चांगले संबंध बनले होते. पण कोमलच्या आई-वडिलांना हे नाते मान्य नव्हते. तर दुसरीकडे भाऊ अनूपचा पत्नी आणि सासरच्यांसोबत वाद सुरू होता. सासरचे लोक 50 लाख रुपये मागत होते आणि त्यामुळे तिचे वडील मुन्नालाल हे घर विकण्याचाही विचार करत होते. त्यामुळे कोमल चिंता करू लागली होती. वडिलांनी संपत्ती विकली तर आपल्याला काहीच मिळणार नाही असं तिला वाटू लागलं होतं.
असा वाचला अनुपचा जीव
अशातच वडिलांच्या संपत्तीची हाव आणि दुसरीकडे आपल्या प्रियकरासोबत ऐषोरामाची जिंदगी या लालसेतून कोमल ने हे भयानक षडयंत्र रचलं.ती भावाचाही खून करणार होती,त्यासाठी तिने त्याच्या ज्यूसमध्येही विष मिसळले होते, मात्र ज्यूसची चव खूपच कडवट असल्याचे लक्षात आल्यावर अनुपने ज्यूस अर्धाच पिऊन ठेवून दिला.त्यामुळे त्याचा जीव वाचला.तसच जेव्हा कोमल हाक मारत होती तेव्हाही त्याला जाग आली नाही,यामुळे तो सुदैवी ठरला.अन त्याचा जीव वाचला.
विष कुठून मागवलं होतं?
कोमल आणि रोहितसोबतच कोमलचा मुंबईत तैनात असलेला पहिला प्रियकर राहुल याचाही या हत्येत सहभाग असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. कोमलच्या आई-वडिलांच्या हत्येसाठी राहुलने विष पाजण्याचीही व्यवस्था केल्याचे तपासात उघड झाले आहे. आणि दुसरा प्लॅन म्हणून त्याने त्याचा भाऊ रोहित याला कोमलच्या घरी पाठवून कोमलला हत्येत मदत केली होती.मात्र, कोमलसह दोन्ही भावांना रिमांडवर घेऊन त्यांची चौकशी करूनही राहुलने हत्येसाठी विष कोठून आणले, याचा शोध पोलिसांना लागलेला नाही.
हत्येला आत्महत्या दाखवण्याचा कट
कटानुसार ज्यूस मध्ये विष मिसळून सर्वांची हत्या केल्यानंतर त्याला आत्महत्येचे स्वरूप देण्यात येणार होते. या उद्देशाने कोमलने आई-वडिलांच्या मोबाईलवरून आत्महत्येसारखा एक संदेशही स्वत:ला पाठवला होता. भावाच्या वैवाहिक वादातून तिला तिघांच्याही आत्महत्येचे स्वरूप द्यायचे होते.मात्र विषाने तिघांचाही जीव घेतला नाही, त्यामुळे कोमल आणि तिचा दुसरा प्रियकर रोहित यांनी आधी कोमलच्या आई-वडिलांचा गळा चिरून खून केला आणि नंतर भावाच्या सासरच्या मंडळींना मारेकरी ठरवून प्रकरण गुंतागुंतीचे केले. पण, त्याचा कट यशस्वी होण्याआधीच आई-वडिलांचा खून झालेल्या या दुहेरी हत्याकांडाचे गूढ उलगडून खुनी मुलीच्या गुन्ह्याचा उलगडा होऊन ती तुरुंगात पोहोचली.
हिंदू तरुणाला दाढी पाहून मारहाण; धर्म जाणून घेण्यासाठी अंतर्वस्त्रे काढली
28 तास लटकलेल्या अवस्थेत साधू चा मृतदेह; भाजप आमदारासह तिघांवर गुन्हा दाखल
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 10,2022, 21:35 PM
WebTitle – 20-days-of-love-with-boyfriends-brother-the-girl-killed-her-parents