यूपीएससी UPSC एमपीएससी MPSC म्हणजे लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यावरून आपण अनेक विनोद करतो आणि दुसरीकडे यातून अतिशय खडतर आयुष्य जगणारे तरुण मात्र दैदीप्यमान कामगिरी करत आपले एकूण आयुष्य अन परिवाराचे देखील जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात.जिद्द मेहनत कष्ट चिकाटी आणि मान मोडून अभ्यास करत तरुण वर्ग या परीक्षांची तयारी करत उत्तीर्ण होण्यासाठी धडपडत असतो. दोन वर्षानंतर सरकारने यू-टर्न घेत लॅटरल एन्ट्री चा निर्णय घेतला आहे.
याचं कारणही असेच आहे.या परीक्षा यशस्वी उत्तीर्ण झाल्यानंतर अशा उमेदवारांना जिल्हाधिकारी सनदी अधिकारी सचिव संचालक इत्यादी महत्वाच्या पदांवर नेमणूक केली जाते.त्यामुळे या परीक्षांचे आणि या पदांचे समाजात अनन्यसाधारण महत्व आहे.
परीक्षा न देताही आयएएस अधिकारी
मात्र गेल्या दोन वर्षात भाजप सरकारने हे चित्र बदलून टाकलं आहे.संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा न देताही आयएएस अधिकारी होण्याची संधी भाजप सरकारने निर्माण केली.केंद्रातील संयुक्त सचिव आणि संचालक अशा 30 पदासाठी त्यांनी बाहेरून अर्ज मागवले.म्हणजे खाजगी क्षेत्रात अगोदरच काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचा मार्ग मोकळा केला.
लॅटरल एन्ट्री चा निर्णय
विशेष बाब म्हणजे 2016 साली हा निर्णय घेण्याच्या हालचाली झाल्या तेव्हा त्यावर प्रचंड प्रमाणात विरोध करण्यात आला होता.त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी लोकसभेत अशी कोणतीही समिती नेमण्याचा विचार नसल्याचे सांगितले होते.नागरी सेवेत लॅटरल प्रवेश देण्याबाबत सरकारचा विचार नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते.मात्र दोन वर्षानंतर सरकारने यू-टर्न घेत लॅटरल एंट्रीचा निर्णय घेतला आहे.आणि राबवला देखील.
दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन
यामुळे यूपीएससी UPSC साठी जीवतोड मेहनत करून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याची तीव्र भावना आहे.
यातूनच आता या निर्णयास विरोध होत असल्याचे दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात आले.
लॅटरल एन्ट्री
या आंदोलनात प्रख्यात साहित्यिक मोहनदास नैमिशराय हे सुद्धा सहभागी झाले होते.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.
लॅटरल एन्ट्री, खाजगीकरण आणि शेतकरी आंदोलनास पाठिंबा असे या आंदोलनाचे स्वरूप होते,
यावेळी निमलष्करी दलास देखील पाचारण करण्यात आल्याचे दिसून येत आहे.निमलष्करी दलाचा मोठ्याप्रमाणावर बंदोबस्त दिसून आला.
मात्र प्रसार माध्यमांनी या आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेतल्याचे आढळून आले नाही.
जेष्ठ पत्रकार लेखक दिलीप मंडल यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा.. कपिल मिश्रा च्या टुलकिट ने खळबळ; हिंदू ईकोसिस्टम एक्सपोज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 16, 2021 16:00 pm