अभिनेत्री रिचा चढ्ढा ही आपल्या धाडसी भूमिकांसाठी सुपरिचित आहे.गैंग्स ऑफ वासेपुर मध्ये लक्षवेधी भूमिका
साकारणारी रिचा चढ्ढा सोशल मिडियावर सुद्धा खूप अॅक्टिव असते,अनेकदा ती बोल्ड आणि धाडसी घेताना दिसते.
कोरोना महामारीत डॉक्टरांना वेतन दिले गेले नाही या प्रश्नावर तिने रान उठवले होते.
जेएनयू, एनआरसी,हाथरस केस असो ती अनेक मुद्यावर मुलतत्ववाद्यांना भिडत असते.
रिचा चढ्ढा
कोरोनाच्या महामारीत लॉक डाउन मध्ये अनेकांची उपासमार झाली.
अशा शेकडो लोकांच्या अन्नाची व्यवस्था ऋचा चड्ढा ने केली.अनेक गरजूंना मदत केली.
तिच्या याच सेवाभावी वृत्तीसाठी तिला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारतेवेळी तिने म्हटले “ज्याला कुणी गॉडफादर नाही अशासाठी हा सन्मान अनमोल आहे.”
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री खोशियरी जी यांच्या हस्ते मला भारतरत्न आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले याचा मला फार आनंद होत आहे! बाबासाहेबांशी माझी ओळख नुकतीच झाली होती, त्याआधी मी त्यांना फक्त भारतीय घटनेचा निर्माता म्हणूनच ओळखत होते … ज्याना भारतातील जात व्यवस्था समजून घेता येत नाही त्यांना भारत समजून घेता येणार नाही.मी स्वतःला भाग्यवान समजते की मला माझ्या आदर्शाच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला … फक्त मीच नाही , उलट या साथीच्या वेळी इतरांना मदत करणार्या बर्याच जणांचा सन्मान झाला आहे! या सन्मानाबद्दल मी मनापासून आभारी आहे! जय भीम जय हिंद!
अशा शब्दांत अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने आपले मनोगत व्यक्त केले.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)