वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले अयोध्येचे महंत परमहंस दास पुन्हा चर्चेत आले आहेत.ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचे नागरिकत्व समाप्त करून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा,अन्यथा मी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक 12:00 वाजता शरयू नदीत जलसमाधी घेणार आहे.अशी घोषणा महंत परमहंस दास यांनी करून मिडियाचे लक्ष वेधले होते.
महंत परमहंस दास ना हाऊसअरेस्ट
पोलिसांनी हाऊसअरेस्ट म्हणजे नजरकैदेत ठेवले आहे. आचार्य परमहंस यांनी 2 ऑक्टोबर रोजी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. त्यांनी असे म्हटले होते की जर हिंदु राष्ट्र घोषित केले नाही तर ते जल समाधी घेतील. 2 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज परमहंस आश्रमात हिंदू राष्ट्रासाठी यज्ञ करत आहेत.तेथे त्यांचे समर्थक उपस्थित आहेत जे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची मागणी करत घोषणा देत आहेत. अयोध्या चे डीएसपी राजेश राय यांनी सांगितले की, आचार्य परमहंसांना जल समाधीपासून रोखण्यासाठी, मोठ्या संख्येने पोलीस दलांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
“मैंने सरयू नदी का जल मंगवाकर रखा है, मैं इसी जल में नाक डूबा कर समाधी लूंगा”
महंत परमहंस दास ना हाऊसअरेस्ट केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी
पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमची जलसमाधी घेण्याची प्रतिज्ञा तर मोडताना दिसत आहे.आता तुम्ही काय करणार?
यावर महंत परमहंस दास म्हणाले “मी जी घोषणा केली की 2 ऑक्टोबर रोजी देशाला हिंदु राष्ट्र घोषित केले नाही तर मी जल समाधी घेईन,यामुळे प्रशासनाने मला हाऊस अरेस्ट केले आहे.मात्र आम्हीही हाऊस अरेस्ट होताच शरयू नदीतील जल आणून ठेवले आहे.ठीक 12:00 वाजता या पाण्यामध्ये नाक बुडवून आम्ही आमची प्रतिज्ञा पूर्ण करणार आहोत,जर देवाची कृपा राहिली तर मी माझी प्रतिज्ञा जरूर पूर्ण करेन.”
यापूर्वी हिंदु राष्ट्राच्या मुद्यावर 15 दिवसांचे उपोषण
यापूर्वी त्यांनी हिंदु राष्ट्राच्या मुद्यावर 15 दिवसांचे उपोषण केले होते
आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले होते.
महंत परमहंसांनी आपले जीवन संपवण्याच्या उद्देशाने दीर्घ उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता,
जो गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खंडित झाला.
चिता रचून आत्मदहन करण्याचीही केली होती घोषणा –
या अगोदर महंत परमहंस दास यांनी तपस्वी छावनी मंदिरात बाबर विचारधारा विध्वंस महायज्ञ करण्याचीही घोषणा केली होती.
ते 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजता आपली चिता तयार करून आत्मदहन करण्याच्या निर्णयावर ठाम होते.
राम मंदिर उभारणीच्या मागणीसंदर्भात कसल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने महंत परमहंस दास नाराज होते. मात्र, दोन दिवस आधीच परमहंस यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना, सीजीएम न्यायालयातही दाखल करण्यात आले होते. सीजीएम यांनी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.त्यांनी आत्मदहन अर्थातच केले नाही.
मोहन भागवत यांनीही केली होती हिंदु राष्ट्राची मागणी
यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी वारंवार हिंदु राष्ट्राबद्दल भर दिला आहे. ते असेही म्हणाले की हिंदुत्व हा एक शब्द आहे जो अध्यात्मावर आधारित परंपरा आणि भारताच्या भूमीतील मूल्य प्रणालींची संपूर्ण संपत्तीसह आपली ओळख व्यक्त करतो.म्हणूनच, हा शब्द सर्व 1.3 अब्ज लोकांना लागू होतो, भागवत यांनी 2020 मध्ये विजय दशमी भाषणादरम्यान टिप्पणी केली होती.
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 02, 2021 15:24 PM
WebTitle – What did Mahant Paramhans Das say on house arrest, Jalasamadhi?