मुरादाबाद : उत्तर प्रदेश मधिल संभल येथील भाजप चे स्थानिक नेते अनुज चौधरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी ते घराबाहेर फिरत होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहिल्या गोळीनंतर अनुज जमिनीवर पडला. यानंतर हल्लेखोरांनी दुचाकीवरून खाली उतरून त्यांना घेरले आणि गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. यानंतर नातेवाईकांनी गंभीर जखमी अनुजला मुरादाबादच्या ब्राइटस्टार रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राजकीय वैमनस्यातून हत्या
हत्या झालेला 34 वर्षीय अनुज चौधरी हा उत्तर प्रदेश मधिल संभल चा स्थानिक भाजप च्या राजकारणात सक्रिय होता.त्याने संभलमधील असमोली ब्लॉकमधून ब्लॉक प्रमुखपदाची निवडणूक लढवली होती, मात्र त्याचा पराभव झाला होता. राजकीय वैमनस्यातून हा खून झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी हत्येमध्ये सहभागी असलेल्या दोघांची (अमित चौधरी आणि अनिकेत) नावे दिली आहेत. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोपींना पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली
मुरादाबाद पोलिसांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये परस्पर वैर होते. चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पाच तुकड्या तयार केल्याची माहिती मिळाली आहे, वॉन्टेड आरोपींना लवकरच अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
ब्लॉक प्रमुख पती आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध आयपीसीच्या कलम ३०२,३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी संभलच्या ब्लॉक प्रमुख पती प्रभाकर आणि तीचा मुलगा अनिकेत यांचीही आरोपी म्हणून नावे तक्रारीत दाखल केली आहेत.
याशिवाय अमित चौधरी, पुष्पेंद्र आणि अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एसएसपीच्या म्हणण्यानुसार, प्रथमदर्शनी या घटनेचे कारण अनुजचा अनेक लोकांशी झालेला वाद आहे.
आरोपींपैकी अमित चौधरी हा मोहित चौधरीचा भाऊ असून तो तुरुंगात आहे.
यासोबतच सध्या ब्लॉक प्रमुखाच्या पती आणि मुलाचीही नावे आहेत.
मृताचे या लोकांशी अनेक वाद झाले होते. ही घटना आरोपींनीच घडवून आणल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यात 3 गोळ्या झाडल्या गेल्या. घटनास्थळावरून 4 रिकामी काडतुसे सापडली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत हा देखील भाजपचा नेता आहे. 2021 मध्ये, असमोली ब्लॉकमधून ज्यामधून अनुज निवडणूक हरला, अनिकेतची आई निवडणूक जिंकल्यानंतर ब्लॉक प्रमुख बनली. तेव्हापासून दोघांमध्ये वैर होते. सूत्रांच्या माहितीनुसार,अनुज 25 ऑगस्ट रोजी विद्यमान असमोली ब्लॉक प्रमुखांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने बीडीसी सदस्यांची जमवाजमवही सुरू केली होती.या प्रकरणाचा लवकर खुलासा करण्यासाठी ५ तपास पथके तयार करण्यात आली आहेत.
भाजपचा अंतर्गत वाद असेल तर बुलडोजर चं काय?
भाजपच्या अंतर्गत वादात कुणाचा खून पडला,कायदा मोडला तर बुलडोजर चालवला जातो का याबद्दल माहिती मिळाली नाही.
त्यामुळे या प्रकरणी आरोपींच्या घरावर बुलडोजर चालणार की नाही हे समजू शकलेलं नाही.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती समितीतून CJI यांना हटवण्यासाठी सरकारने आणलं नवीन विधेयक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 11,2023 | 11:30 AM
WebTitle – Uttar Pradesh BJP leader Anuj Chaudhary shot dead outside his house in Moradabad