दानोळी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एस.एम.जी. स्मृती प्रतिष्ठान संचलित बोधिसत्व युवा विचार मंच, गोठणे-दानोळी यांच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरणग्रस्त वसाहतीतील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेदरम्यान विविध गावांतील संघांनी सहभाग नोंदवून क्रीडाभाव, संघभावना व शिस्तबद्ध खेळाचे उत्कृष्ट दर्शन घडवले. प्राथमिक फेऱ्यांपासूनच सामने चुरशीचे झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
५ एप्रिल रोजी पार पडलेल्या उपांत्य व अंतिम सामन्यांनी विशेष रंगत आणली. रोमांचक ठरलेल्या अंतिम सामन्यात तिरुपती मांगले (सांगली) संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अजिंक्यतारा सांगाव (कोल्हापूर) संघ उपविजेता ठरला, तर वारणा स्पोर्ट्स, गोठणे-दानोळी संघाने तृतीय आणि विजय स्पोर्ट्स, अकिवाट संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रु. १५,०००/- उपविजेत्यास रु. १०,०००/
तृतीय क्रमांकास रु. ६,०००/- व चतुर्थ क्रमांकास रु. ५,०००/- अशी रोख पारितोषिके, ट्रॉफी व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये संतोष पाटील (अजिंक्यतारा वाडदे सांगाव) यांची उत्कृष्ट फलंदाज, ओंकार पाटील यांची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली.
वारणा स्पोर्ट्सचा नदीम चौगुले याने ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कार पटकावला.
तर अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ हा बहुमान राम वकटे (तिरुपती स्पोर्ट्स, मांगले) याला मिळाला.
स्पर्धेचे प्रमुख संयोजक दीपक गोठणेकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजातील खेळाडूंना दिलेल्या प्रोत्साहनाचा उल्लेख केला.

त्यांनी सांगितले की, क्रीडा ही शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सामाजिक ऐक्य वाढवणारी शक्ती असून,तरुणांनी शिक्षणासोबत खेळांकडेही लक्ष द्यावे.
या स्पर्धेला नजीर चौगुले, विकास घोलप, ऍड.सिद्धार्थ काकडे,दाऊद पटेल, भिकाजी केने,दत्ता पवार,सुवर्णा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन अजय कांबळे,रवी तांबे,शुभम घोलप,निलेश कांबळे,संदेश कांबळे,प्रशिक कांबळे, सम्यक गोठणेकर,जीवक गोठणेकर,
सचिन कांबळे,हेमंत कांबळे,विनोद कांबळे,प्रकाश कांबळे,सलीम चौगुले,संग्राम कांबळे,पियुष कांबळे,गिरीश कांबळे आदींनी केले.
प्रास्ताविक सुनील कांबळे यांनी केले, स्वागत रणधीर कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन विजय गोठणेकर यांनी केले.
या स्पर्धेमुळे धरणग्रस्त भागातील युवकांना एकत्र येऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून
सामाजिक ऐक्य दृढ करण्यास मदत झाली आहे.आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 10,2026 | 07:00 AM
WebTitle – Tennis Ball Cricket Tournament Held with Great Enthusiasm at Danoli on the Occasion of Dr. Ambedkar Jayanti























































