वैशाली गिरीश कांबळे निर्मित आणि गिरीश गोपीचंद कांबळे दिग्दर्शित “Sid s Enlightenment” Hya लघुचित्रपटाची प्रतिष्ठित १६ व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल – २६ मधे Official Selection झाले आहे.

हा नामांकित फिल्म फेस्टिवल “Father of Indian Cinema” डॉ. दादासाहेब फाळके ह्यांच्या चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाची जाण ठेवून त्यांच्या जयंतीदिनी, ३० एप्रिल ला दिल्ली येथे आयोजित केलेला आहे. हा फिल्म फेस्टिवल भारतातील अतिशय प्रतिष्ठित समारोह असून त्यात जगातील 110 देशांतून येणाऱ्या चित्रपट, लघुचित्रपट, संगीतपट, ऍनिमेशनपट चे सादरीकरण होते.
निर्मिती इंजि. वैशाली गिरीश कांबळे आणि कथा, पटकथा, संवाद, छायांकन व दिग्दर्शक इंजि. गिरीश गोपीचंद कांबळे यांचा “Sid’s Enlightenment” हा प्रथमच लघुचित्रपट असून त्याचे ह्या नामांकित फेस्टिवल मधे Official Selection होणे हे खूपच अभिमानास्पद गौरव आहे.

ह्या आधी ‘Sid’s Enlightenment’ ह्या लघुचित्रपटाने ’10th Indian World Film Festival-26 हैदराबाद’ मध्ये “Special Festival Mention” चे अवॉर्ड पटकाविले आहे.
कोलकत्याच्या प्रसिद्ध Sundarban International film festival 26 मधे पण ह्या लघुचित्रपटाला “Best Short film” चे अवॉर्ड प्राप्त झाले आहे.
‘Sid’s Enlightenment’ ह्या लघुचित्रपटाने प्रसिद्ध
Buddha International Film Awards मध्ये सुद्धा एक अवॉर्ड पटकाविले असून तो अवॉर्ड 19 एप्रिल ला पुणे येथे आयोजित केलेला आहे.
मे महिन्यात होऊ घातलेल्या प्रसिद्ध ‘iDEAL International Film Festival’ मध्ये पण ह्या लघुचित्रपटाचे ‘Official Selection’ झालेले आहे.
ह्या फिल्म फेस्टिवल मध्ये अमेरिका, इंग्लंड, स्कॉटलंड, जपान, भारत, जर्मनी, इटली, दक्षिण कोरिया, स्पेन, फ्रान्स,
तैवान, थायलंड, ब्राझील, बल्गेरिया, थायलंड, बेल्जियम, अर्जेंटिना, रशिया, बेल्जियम इत्यादी देशांतून येणाऱ्या फिल्म्स चे प्रदर्शन करुन अवॉर्ड वितरित केल्या जातील.
Sid’s Enlightenment हा लघुचित्रपट सिद्धार्थ नावाच्या एका मुलावर आधारित आहे, जो इंग्लंडमधील प्रतिष्ठित शाळेतून पर्यावरणीय घटक शिकतो आणि निसर्गाबद्दल उत्सुकता निर्माण होते. सिद्धार्थला भारतातील दुष्काळी परिस्थिती समजते आणि त्याचे जिज्ञासू मन त्याबद्दल विचार करू लागते. भारत भेटीनंतर, सिद्धार्थ टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी शिकतो आणि त्या माहितीचा वापर अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने करतो आणि इतरांना अंमलात आणण्यास प्रेरित करतो.
तो कोणत्या पायऱ्या शिकतो? त्यावर तो कसा प्रतिक्रिया देतो? तो सर्व माहिती कशी जमा करतो? त्याला कोणती अनोखी कल्पना सुचते? या सर्व बाबी या लघूचित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. कथानक खुप उत्तम असून प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात आणि विचार करायला लावणारे आहे.
Sid’s Enlightenment हा लघुचित्रपट एक अतिशय अनोखा आणि सकारात्मक संदेश देतो.
या लघुचित्रपटाची 80% शुटिंग महाराष्ट्रातील यवतमाळ येथील प्रज्ञासुर्यविहार आणि अकोला येथे झालेली असुन
20% शुटिंग Crawley, England मध्ये झालेली आहे. ह्या लघुचित्रपटाची निर्मिती ‘Illumino Creations’ ने केलेली असून सहनिर्माते ‘Nirvana Events’ आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 10,2026 |10:30 AM
WebTitle – Sid’s Enlightenment short film























































