समीर वानखेडे ड्रग्ज प्रकरणी 25 कोटी खंडणी अन भाजप चे दोन मोहरे ? आर्यन खान या शाहरुख खानच्या मुलाची बदनामी करत कथितरीत्या ड्रग्ज प्रकरणात अडकवणाऱ्या रॅकेटचा हळूहळू पर्दाफाश होत आहे. सीबीआय ने खुलासा केला की समीर वानखेडे ने शाहरुख खान कडे 25 कोटींची मागणी केली होती.या केस मध्ये जो मुख्य साक्षीदार होता प्रभाकर साईल त्याचा हार्टअटॅक ने मृत्यू झाला होता,( आपल्याला मारलं जाईल ही भीती त्याला होतीच,मारण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग असतातच) प्रभाकरने समीर वानखेडेच्या विरोधात गंभीर माहिती देत खळबळ उडवून दिली होती.अनेकांनी शाहरुख खान चा मुलगा आर्यन खानची सोशल मिडियात बदनामी केली होती.
समीर वानखेडे ड्रग्ज प्रकरणी 25 कोटी खंडणी ची मागणी अन भाजप चे दोन मोहरे ?
या दरम्यान,आर्यन खान ला पकडून घेऊन जाणाऱ्या एनसीबी अधिकाऱ्याचा आर्यनसोबतचा एक सेल्फी प्रचंड व्हायरल झाला होता.
त्यानंतर एनसीबीनं अधिकृतरित्या प्रतिक्रिया देत संबंधित व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याचं म्हटलं होतं.
आर्यन खान याला पकडून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचं नाव किरण गोसावी.किरण गोसावी भाजपसाठी का करत असल्याचा आरोप त्यावेळी नवाब मलिक यांनी केला होता.के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता.
त्याचदिवशी रेड टाकल्यावर या गुप्त रेड मध्ये भाजपचा एक उपाध्यक्ष मनीष भानुशाली देखील होता,
अरबाज सेठ मर्चंट ला मनिष भानुशाली हा व्यक्ती घेऊन जाताना दिसत आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचा उपाध्यक्ष असा उल्लेख आहे.
त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देवेंद्र फडणवीस आशीष शेलार भाजपा अध्यक्ष नड्डा या भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. एनसीबीने सांगावं त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय?” असंही नवाब मलिक म्हणाले होते.
तो अरबाज सेठ मर्चंट ला घेऊन जाताना दिसतो,म्हणजे कारवाई करताना.
नवाब मलिक यांच्या मते हे सगळं प्रकरण गुजरातच्या अहमदाबाद मध्ये शिजलं,धाडी अगोदर किरण गोसावी आणि
मनीष भानुशाली दोघे अहमदाबादला होते.बॉलीवूडला बदनाम करण्यात गुजरातला एवढा रस का आहे?
सीसीटीव्ही फुटेज पोलिसाचा गोळीबार कैद;भारतीय ठार
दलित नवरदेव घोडी वर वरात; जातीयवाद्यांनी केली मारहाण
चर्मकार पोराने स्वतःच्या घरावर लावली बाबासाहेबांची सही
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on 15, MAY 2023, 18:40 PM
WebTitle – Sameer Wankhede demanded 25 crore ransom in aryan khan drug case