२५ मे रोजी नेहरू सेंटर वरळी येथे संपन्न झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म पुरस्काराने रिश्ते शॉर्ट फिल्मला गौरवण्यात आले आहे.
या आधी रिश्ते शॉर्ट फिल्म ने दहा चित्रपट महोत्सवात भाग घेतला असून एकूण तीस पारितोषिके मिळवली आहेत, विशेष म्हणजे या फिल्मला आतापर्यंत सर्वच विभागात पारितोषिके मिळाली आहेत. परंतु दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार ऑफ इंडिया २०२४-२५ या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात तिला गौरवण्यात आल्याने रिश्ते चे दिग्दर्शक दिनेश मोरे आणि लेखक, निर्माते आनंद रामकृष्णन तसेच संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रिश्तेचे कथानक मैत्री, प्रेम, आपुलकी आणि नाते यांतील गुंतागुंतीला अधोरेखित करते. यात तीन मुख्य पात्र आहेत एक महत्वाकांक्षी मॉडेल रिया, दुसरी हॉटशॉट क्रिएटिव्ह डायरेक्टर जुही आणि तिसरा उत्कृष्ट छायाचित्रकार विकी यांच्या जीवनातील नातेसंबंधातील बारकावे आणि गुंतागुंत उलगडत हे कथानक पुढे सरकते. कथानक जसे जसे पुढे सरकते तसे प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते आणि क्लायमॅक्सच्या काही सेकंदापूर्वी नवा ट्विस्ट देते. हा ट्विस्ट प्रेक्षकांना आश्चर्यचकित वाटू शकतो किंवा दुसऱ्या कथानकाची सुरवात वाटू शकतो किंवा प्रेक्षकाला उलगडलेल्या विषयावर व्यक्त व्हायला प्रवृत्त करू शकतो. Love, Drama हा फिल्मचा जोनर आहे. या फिल्मचा कॅमेरा, एडिटिंग, आर्ट आणि कॉस्ट्यूम इतके सफाईदारपणे केले आहे कि प्रेक्षकांना हा एक वेब्सिरीजचा एपिसोड पाहिल्या सारखे वाटू शकते. त्यामुळे ‘पुढे काय?’ असा प्रश्न उपस्थित होऊन हि प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवणारी शॉर्ट फिल्म ठरत आहे हे युट्युब चॅनेलवरील प्रेक्षकांच्या कॉमेंट्स मधून जाणवत आहे. हि फिल्म २४ मे रोजी पॉकेटफिल्म्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.
रिश्ते शॉर्ट फिल्म साठी दिनेश मोरे यांचा बेस्ट डायरेक्टर म्हणून पाचवेळा गौरव
या फिल्मसाठी आनंद रामकृष्णन यांना बेस्ट स्क्रीनप्ले म्हणून दोन वेळा तर दिनेश मोरे यांना बेस्ट डायरेक्टर म्हणून पाच वेळा गौरवण्यात आले आहे.

तसेच या फिल्मसाठी बेस्ट DOP, बेस्ट एडिटर, बेस्ट म्युझिक, बेस्ट ऐक्ट्रेस आणि बेस्ट ऍक्टर अशा सर्वच विभागात पारितोषिके मिळाली आहेत.

हि फिल्म मैत्री, प्रेम, नाते या भावनांभोवती फिरत असली तरी लेखक दिग्दर्शकांना
यातून दडलेला नवा आशय समोर आणायचा होता हे कथानकाच्या शेवटी संशयितरित्या समोर येते
कारण यात उलगडलेल्या आशया बाबत फिल्ममध्ये कुठेही भाष्य केलेले दिसत नाही
परंतु काही अस्पष्ट सांकेतिक घटक पेरले आहेत, हे लेखक, दिग्दर्शकाने खुबीने मांडले असावे असे जाणवते.
दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार ऑफ इंडिया २०२४-२५ हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यावर मीडिया बाईट देताना आनंद रामकृष्णन यांनी ‘या फिल्म मध्ये ज्यांनी काम केले त्या प्रत्येकाचा हा पुरस्कार आहे’ असं म्हटले तर दिनेश मोरे यांनी ‘या प्रतिष्ठित पुरस्काराने आम्ही जितके खुश झाले आहोत तितक्याच आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत’ असे म्हटले. चित्रपट महोत्सवाच्या परीक्षकांकडून व आयोजकांकडून दिग्दर्शक म्हणून दिनेश मोरे यांचे विशेष कौतुक होत आहे, त्यांनी नवखे कलाकार घेऊन तसेच कमीत कमी संसाधन आणि तांत्रिक सहाय्याच्या मदतीने उत्तम शॉर्ट फिल्म निर्मिती केली आहे.
दिग्दर्शक दिनेश मोरे यांचा परिचय द्यायचा झाला तर ते जाहिरात क्षेत्रात कार्यरत असून उत्तम चित्रकार देखील आहेत,
या क्षेत्रातला अनुभव त्यांच्या कामातून दिसून आला आहे. शॉर्ट फिल्म म्हटले कि अनेक मर्यादा येतात, वेळ, पैसा, कलाकार इत्यादी.
शॉर्ट फिल्म या फॉरमॅट मध्ये आशयाबरोबरच तांत्रिक गोष्टी सुद्धा सफाईदारपणे करता येऊ शकतात हे त्यांच्या दिग्दर्शनातून जाणवते.
चित्रपट महोत्सवांत यश मिळवल्या नंतर रिश्ते फिल्म प्रेक्षकांना कोणत्याही subscription शिवाय सहज पहाता यावी याकरिता
PocketFilms या OTT वर रिलीज करण्यात आली आहे, ती आपल्याला PocketFilms YouTube चॅनेलवर पहाता येईल.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 29,2024 | 08:55 AM
WebTitle – RISHTEY short film dinesh more