रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना अटक करण्यात आली असून सध्या त्यांची रवानगी तळोजा येथील तुरुंगात करण्यात आली आहे.
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली.
आपली सुटका व्हावी म्हणून त्यांनी काल जामिन अर्ज केला होता,
मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला.सध्या तरी त्यांना तळोजा जेलमध्येच राहावं लागणार आहे.
दिनचर्या कशी असते?
अर्णब गोस्वामी तुरुंगात कसे दिवस काढणार? हा प्रश्न अर्णब च्या चाहत्यांना आणि विरोधकांना सुद्धा पडलेला आहे.त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता देखील आहे.तुरुंगात नेमकी कशी व्यवस्था असते? गुन्ह्याची शिक्षा भोगणारे कैदी नेमकं काय करतात? त्यांची दिनचर्या कशी असते? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील.सांगतायत कायद्याचे जाणकार आणि प्रसिद्ध वकील महेश पवार.
कच्चा कैदी / पक्का कैदी
‘कच्चा कैदी’ म्हणजे ज्याच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि ज्याची केस निकालासाठी न्यायालयात पेंडिंग आहे असा . उदाहरणार्थ ‘अर्णब गोस्वामी‘ नावाचा आरोपी . ‘पक्का कैदी’ म्हणजे ज्याच्या गुन्ह्यांवर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब होऊन त्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यात आली आहे असा ‘बंदिवान’. म्हणजे ‘अर्णब गोस्वामी ने ‘ जर गुन्हा केला आहे असे न्यायालयात सिद्ध झाले तर त्याचे ‘कच्चा कैदी ‘या भूषणातून मधून ‘ पक्का कैदी ‘ रूपांतर होऊ शकते . तर सामान्यतः कच्च्या कैद्याची जेलमधील दिनचर्या खालील प्रमाणे असते .
(१) न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सांगितल्यामुळे कैद्यांना पोलिसांच्या डब्यात इतर कैद्यांबरोबर कोंडून जेल मध्ये नेले जाते . सहसा कैद्यांमध्ये पाकीटमार , भुरटे चोर , मुलींना / स्त्रियांना छेडणारे , दारू पिऊन बायकोला मारहाण करणारे , हुंडा मागणारे , रस्त्यावर चोरी करणारे असे सद्गृहस्थ असतात .
(२) ९०% कैदी पान , मावा , गुटखा , बिडी , सिगरेट यांचे व्यसनाधीन असतात . ( मादक पदार्थांचे सेवन करणार्यांना सहसा जेल मध्ये न ठेवता इस्पितळात ठेवले जाते ) सिगारेट , गुटखा खाणाऱ्या कैद्याला प्रत्येकी दोन पाकिटे जेलच्या आत नेण्याची परवानगी असते . काही महाभाग ऍडिशनल माल घेऊन जातात त्याची इथे माहिती देणे संयुक्तिक होणार नाही .
(३) जेलच्या आवारात गेल्यानंतर सगळ्या कच्च्या कैद्यांना कोंबडा करून मोजणीसाठी बसवले जाते . त्यात वर्णभेद , जाती,धर्मभेद न करता समान ट्रीटमेंट दिली जाते.
सर्वांगाला मल – मूत्राचा दर्प
(४) न्यायालयाचे दिवसभराचे कामकाज संपल्यावर कैद्यांना जेल मध्ये नेण्यास रात्र होते आणि सगळे कायदेशीर सोपस्कार करेपर्यंत रात्रीचे दहा – अकरा वाजतात त्यामुळे नवीन आलेल्या कैद्यांना रात्रीचे जेवण मिळणे कठीण असते . जर कैद्यांची आधीच सेटिंग असेल तर मात्र त्यांचा सगळा इंतजाम आधीच केलेला असतो . म्हणजे जेवण काढून ठेवलेले असते , झोपण्याची जागा ,पांघरायला चादर, पिण्यासाठी पाणी इत्यादी लवाजमा ‘वॉर्डन ‘ आधीच तयार करून ठेवतो.’ अर्णब ‘ साठी एखाद्या राजकारण्याने अशी व्यवस्था करून ठेवली असेल तर ठीक आहे नाहीतर ‘अर्णब ‘ सारख्या कच्च्या कैद्याला रात्रीचे जेवणाचं काय तर झोपायला जागा देखील मिळत नाही.रात्रभर जिथे उभे राहायला मिळेल तिथे उभे राहायचे नाहीतर गुढघ्यांना मिठी मारून डुलक्या घ्याव्या लागतात.
(५) सकाळी बरोब्बर सहा वाजता ‘कोंडवाड्याचे ‘ दार उघडले जाते
आणि रात्रभर प्रेशर आलेले कच्चे कैदी डाउनलोड करण्यासाठी भरभर टॉयलेट्स च्या दिशेने पळतात.
भारतीय बैठक असलेले कमोड चकाचक असतात तर पाश्चात्य कमोड घाणीने बरबटलेले असतात.
‘ अर्णब ‘ सारख्या कैद्यांना पाश्चात्य कमोडची सवय असेल तर कठीण आहे.
सुमारे चाळीस पन्नास टॉयलेट्स असल्या तरीही कच्च्या कैद्यांची संख्या जास्त असली कि बाहेरून दरवाजा ठोकणे क्रमप्राप्त असते.
शिवाय कोंडवाड्यात पादत्राणे घालण्याची परवानगी नसल्याने सगळे व्यवहार अनवाणी पायांनी करावे लागतात.
तेच पाय घेऊन ‘कोंडवाड्यात ‘ गेल्यामुळे कोंडवाड्यात जमिनीला मल – मुत्राचा दर्प दिवसरात्र येत असतो
जो कितीही फिनेल टाकले तरीही जाऊ शकत नाही
आणि त्या लादीवर झोपण्यास मिळाले तर सर्वांगाला मल – मूत्राचा दर्प येत राहतो.
अंघोळ नाश्ता
(६) डाउनलोड केल्यानंतर चार ‘पक्के कैदी’ हातात ब्लेड्स घेऊन उभे असतात त्यांच्या समोर नव्या कच्च्या कैद्यांनी रांग लावून उभे राहायचे . ज्याचा नंबर येईल त्याची दाढी किंवा केस वाढलेले आहेत असे दिसले कि नुसत्या ब्लेडने त्या कैद्यांचा चमन गोटा आणि दाढी सफाचट केली जाते जेणेकरून इतर कायद्यामध्ये रोगराई , उवा वगैरे पसरू नये . अर्थात प्रत्येक कैद्यांसाठी नविन ब्लेड वापरले जाते .
(७) दाढी – केस कापून झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या चार नळांवर सगळ्यांबरोबर नागव्याने थंड पाण्याने अंघोळ करावी लागते . ज्या कैद्यांनी आपला टॉवेल बरोबर आणला असतो ते त्याचा वापर करू शकतात . ज्यांच्याकडे टॉवेल नसतो ते इतर कैद्यांचा वापरलेला टॉवेल वापरू शकतात . ‘ अर्णब ‘ च्या ‘शामो’ ने टॉवेल दिला असेल तर ठीक आहे नाहीतर …
(८) दाढी-अंघोळ झाल्यानंतर सातच्या सुमारास प्रत्येक कैद्याला एक स्टीलचा पेला भरून दूध आणि उकडलेले अंडे दिले जाते . कैदी शाकाहारी असेल पाव आणि दूध मिळते . पक्क्या कैद्यांमधील एक जण स्टीलच्या बादलीत हे दूध घेऊन येतो आणि रांग लावून दूध व एक अंडे घ्यायचे . ( आतमध्ये सेटिंग असेल तर दोन तीन अंडी देखील आदराने मिळतात )
जेवण
(९) सकाळी बरोब्बर ९ वाजता जेलचा मुख्य जेलर रोलकॉल साठी इतर जेलर्स बरोबर येतो
तेव्हा सगळ्या कैद्यांनी कोंडवाड्यात पुन्हा कोंबडा बनून बसायचे
व ज्याचे नाव पुकारले जाईल त्याने उभे राहून पुढे जेलर कडे जाऊन
स्वतःवर कोणते गुन्हे दाखल झाले आहेत याची माहिती द्यायची असते.
ती माहिती आणि रजिस्टरमध्ये झालेली नोंद याची पडताळणी झाली
कि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन कोंबडा होऊन बसायचे असते.
(१०) त्यानंतर सकाळी १० वाजता दुपारचे जेवण येते . जेलच्या भाषेत त्याला ‘ भत्ता ‘ म्हणतात . ( होय दहा वाजता दुपारचे जेवण येते .) ज्यामध्ये कोंडा न काढलेल्या गव्हाच्या पौष्टिक , जाडजूड चपात्या , तेल व तिखट नसलेली बटाटा किंवा तोंडलीची भाजी (आलटून पालटून सहसा याच भाज्या असतात ) असंख्य खडे असलेला भात , आणि तेल व तिखट नसलेले वरण असा सात्विक आहार असतो . काही कैदी फक्त फुकट जेवायला मिळते म्हणून भुरटे गुन्हे करून जेवणासाठीच येतात आणि त्यांचा आहार तगडा असतो . जरी अनलिमिटेड अन्न असले तरीही कमी पडल्यास ते पुन्हा येण्यास उशीर लागतो म्हणून जे मिळेल ते खाऊन घ्यावे लागते . (अर्णुला काय जमेल ते सांगता येत नाही )
(११) दुपारचे जेवण दहा वाजता झाल्यानंतर आपापली ताट वाटी धुवून परत देऊन कैद्यांना थोडासा मोकळा वेळ मिळतो ज्यात ते एकमेकांची विचारपूस करून धीर देण्याचा प्रयत्न करतात. काही सराईत कैदी नव्या कैद्यांना ‘कायदेशीर सल्ले ‘ देतात .
(११) सकाळी ११ वाजता जेलच्या दरवाजाला लावलेली पत्र पेटी उघडली जाते. आदल्या दिवशी ज्या कैद्यांचे बेल मंजूर झालेले असतात आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर न्यायालयाकडून रिट येते ज्यामध्ये कैद्याच्या सुटकेचे आदेश असतात . ज्या कैद्यांचे रिट आलेले असते त्याचे नाव लाऊड स्पीकरवर पुकारले जाते मग त्या कैद्याने सगळ्यांची गाठ भेट , गळाभेट घेत बाहेर पडण्याची तयारी करायची असते . या सगळ्या प्रोसेसला सुमारे तीन-चार तास लागतात.
संध्याकाळी ५ वाजता रात्रीचे जेवण
(१२) इतर कैद्यांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन ची एकमेव वृत्तवाहिनी आणि स्पोर्ट्स चॅनल कोंडवाड्यात दाखवला जातो . ‘रिपब्लिक ‘ सारखे टुकार पत्रकारिता असणारे खासगी चॅनेल्स अजिबात दाखवले जात नाहीत .
(१३) संध्याकाळी ५ वाजता रात्रीचे जेवण म्हणजे भत्ता येतो . त्याच वेळेस पुनः एकदा पत्र पेटी उघडून नविन रिट उघडले जातात आणि बेल मिळालेल्या कैद्यांचे नाव पुकारले जाते . भत्ता खातानाच बेल मिळाल्याचे समजले तरीही भरल्या ताटावरून उठून जायचे नाही असा जेल मध्ये एक रिवाज असतो . जो कैदी समोर आलेला ‘भत्ता’ पूर्ण संपवत नाही त्या कैद्याला तो ‘ भत्ता ‘ पुन्हा जेलमध्ये बोलावतो आणि सगळा भत्ता पुन्हा खायला लावतो असा समज असल्यामुळे कोणीही कैदी भत्ता पूर्ण खाल्ल्याशिवाय ताटावरून उठत नाही.
मेरा नंबर कब आयेगा ?
(१४) संध्याकाळी ज्यांचे नाव पुकारले जाते ते सुमारे ७ ते ८ च्या सुमारास जेलच्या बाहेर पडतात. जर एखादा सेलिब्रिटी असेल तर बाहेर वाहिन्यांचे वार्ताहर बाईट घेण्यासाठी सज्ज असतात .
(१५) आतले कैदी मात्र ‘ मेरा नंबर कब आयेगा ?’ असे म्हणत आपल्या कर्माला दोष देत रडत बसतात.जे निर्ढावलेले असतात ते इतरांना सांत्वना देतात . ( मुद्दाम टोळीयुद्ध आणि नव्या कैद्यांवर होणारे शारीरिक,
मानसिक अत्याचार यांची माहिती देत नाहीये. ती माहिती अर्णब बाहेर आल्यावर तिखट-मीठ लावून देईलच. )
(१६) रात्री ९ वाजता बराक नामा कोंडवाड्यातील एक दिवा सोडून सगळे दिवे विझवले जातात
आणि कच्चे कैदी डोळे मिटून पडून राहतात
आणि पुन्हा दुसरे नवीन कच्चे कैदी भरती होतात आणि हा खेळ रोज चालू राहतो.
( महत्वाचे सांगायचे राहिले. जेलमध्ये येताच कैद्यांची मेडिकल टेस्ट होते . एखाद्या कैद्याने जेलमध्ये अंमली पदार्थ आणला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी त्या कैद्याच्या गुदद्वारात बोटे घालून नीट तपासणी केली जाते आणि ही तपासणी त्या कैद्याच्या जेलमधील राहण्याच्या कालावधीत रोज किंवा कधीही केली जाऊ शकते )
ता .क . – अर्णबला दिवाळी संपल्यानंतर बाहेर काढला तर बरे होईल कारण अनेक समाजसेवी संस्था कैद्यांसाठी दिवाळी फराळ जेलमध्ये पाठवतात ज्याची टेस्ट अर्णबला करता येईल आणि त्याचे जिरेटोपात अजून एक फेदर खोचता येईल !
हिंदू स्त्रियांच्या मालमत्ता संदर्भात ; हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 2
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)