प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण सशर्त स्विकारले आहे.त्यांनी एक खुले पत्र राहुल गांधी यांना पाठवले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा संदर्भ देत सामाजिक लोकशाहीची करून दिली आठवण
वंचित बहुजन आघाडीचा समावेश INDIA आणि मविआ मध्ये झाला तरच यात्रेत सहभागी होणार
प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेच्या संदर्भात पाठवलेल्या पत्राचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे
श्री. राहुल गांधी यांस,
आपण आपल्या भारत जोड़ो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले याबद्दल आपले आभार.
तथापि, मी या वस्तुस्थितीचा पुनरुच्चार करू इच्छितो की काँग्रेस अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही VBA ला अद्याप INDIA आघाडी अथवा मविआ मध्ये समाविष्ट करून घेतलेले नाही. यात विडंबन म्हणजे आपण पाठवलेल्या निमंत्रणात “आपण INDIA आघाडीचे महत्त्वाचे घटक आहात” असे म्हटले आहे.
भाजप आरएसएसच्या दुष्ट करावयांविरोधात लढ्याला टिकवून ठेवण्यासाठी गरजेचं
सध्याच्या धर्मांध, जातीय, विभाजनकारी वातावरणात मोदींच्या सरकारविरोधात असणाऱ्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, जे की संघटित शक्ती व कार्यक्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजप आरएसएसच्या दुष्ट करावयांविरोधात लढ्याला टिकवून ठेवण्यासाठी गरजेचं आहे.
VBA अविरतपणे भाजप आरएसएसशी लढत आहे. VBA हा पक्ष केवळ ६ वर्षांचा असला तरी माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा वैचारिक लढा हा काही नवीन नाही. हा लढा म्हणजे मनुस्मृतीने संहिताबद्ध आणि टिकवून ठेवलेल्या हिंदू जाती व्यवस्थेविरुद्ध एक बंड आहे. हा लढा आम्हाला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळालेला वारसा आहे, किंवा त्याहीपेक्षा त्यांनी दिलेली सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. या सर्वांचा विश्वास होता की धर्म हा माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो आणि त्यांनी विविध धार्मिक विचारांचा पुरस्कार केला. आज आम्ही मुस्लिम, ओबीसी, गरीब मराठा आणि अर्थातच दलीत, आदिवासी व इतर भेदभावग्रस्त, उपेक्षित लोकांसाठी लढतो व त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे.
संविधान सभेतील भाषण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या शेवटच्या भाषणातला काही भाग आपण इथे लक्षात घेतला पाहिजे.
बाबासाहेबांनी या नवीन गणराज्यासमोर येऊ शकणारी आव्हाने नमूद केली होती, आणि दुर्दैवाने ती भीती खरी होताना दिसत आहे.
“.. जर राजकीय पक्षांनी देशापेक्षा जातीला जास्त महत्त्व दिलं, तर देशाचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल, आणि कदाचित ते आपण कायमचं गमावून बसू. या परिणामापासून आपण सर्वांनी दृढनिश्चय करून बचाव केला पाहिजे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपले स्वातंत्र्य वाचवण्याची आपली तयारी असली पाहिजे.”
“आपली ही राजकीय लोकशाही आपल्याला सामाजिक लोकशाही सुद्धा करावी लागेल. सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तर अशी जीवन पद्धत जी स्वातंत्र्य, समता व बंधुता यांना जीवनाची तत्व म्हणून स्वीकार करेल. ही तत्व त्रिरत्नतील वेगवेगळी सूत्र मानली जाऊ नये.”
सवर्ण केंद्रित राजकारण सामाजिक लोकशाहीला हानिकारक
बाबासाहेबांचा संदेश, जो वारसा आम्हाला शिकवण म्हणून मिळाला आहे, तो अगदी सोपा आहे – सामाजिक लोकशाही,
जी स्वातंत्र्य, समता, बंधुतेला मान्य करेल. माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचेही तुम्हाला हेच सांगणे आहे.
जात, धर्म, पंथाला देशापेक्षा वर ठेवणाऱ्या भाजप आरएसएस शी आपल्याला लढायचे असेल,
तर काँग्रेसने सामाजिक लोकशाहीचा अजेंडा पुढे करावा. केवळ शब्दांनीच नव्हे कृती कार्यक्रमातूनही.
सवर्ण केंद्रित राजकारण सामाजिक लोकशाहीला हानिकारक आहे.
आपल्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण मी सशर्त स्वीकारत आहे. दीर्घ प्रतिक्षित INDIA आघाडी व मवीआ मध्ये समाविष्ट होण्याचे निमंत्रित येत नाही तोपर्यंत या यात्रेत सहभागी होणे माझ्यासाठी अवघड आहे. हे निमंत्रण नसताना तुमच्या यात्रेत सहभागी झाल्यास युती झाल्याचे अंदाज बांधले जाऊ लागतील, जी अजून झालेलीच नाही, आणि या सर्वाचे नकारात्मक परिणाम होतील. तथापि आपण VBA ला INDIA आघाडी तसेच मवीआ मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे असे आमचा आग्रह आहे.
आपला.
प्रकाश आंबेडकर
अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी
केंद्रसरकारचा नवा कायदा मसुदा ‘अस्पष्ट आणि अधिक हस्तक्षेप’ करणारा -एडिटर्स गिल्ड
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 17,2024 | 12:10 PM
WebTitle – Prakash Ambedkar conditionally accepted the invitation of Bharat Jodo Nyaya Yatra