Dalit Woman Attacked in patna बिहारची राजधानी पटना येथे शनिवारी रात्री एका पिता-पुत्राने एका दलित महिलेला विवस्त्र केले, तिच्यावर क्रूर हल्ला केला आणि तिला लघवी पिण्यास भाग पाडले. या लाजिरवाण्या घटनेमागे दलित महिलेने आरोपीचे कर्ज फेडूनही अधिक पैशाची मागणी मान्य करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पटना येथे आरोपींना घरातून बळजबरीने उचलून नेले दलित महिलेला विवस्त्र करून मारहाण
पटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद सिंग, त्याचा मुलगा अंशू आणि त्याचे अन्य चार सहकारी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास दलित महिलेच्या घरी गेले आणि तिला जबरदस्तीने त्यांच्या घरी उचलून नेले. जीव वाचवण्यासाठी महिलेने तिथून कसा तरी पळ काढला,सुरुवातीच्या वादानंतर आरोपीने महिलेवर अमानुषपणे हल्ला केला, तिला विवस्त्र केले आणि काठीने बेदम मारहाण केली. यानंतर प्रमोद सिंह यांनी आपल्या मुलाला महिलेच्या तोंडात लघवी करण्याचा आदेश दिला. मात्र, त्यावेळी पीडित महिला कशीबशी आपला जीव मुठीत घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिच्या घरी परतली.
व्याजासह रक्कम परत करूनही आरोपी महिलेकडे आणखी पैशांची मागणी करत होता
पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेने काही महिन्यांपूर्वी प्रमोद सिंग यांच्याकडून व्याजावर 1500 रुपये घेतले होते.
नंतर त्यांनी व्याजासह रक्कम परत केली होती मात्र आरोपी महिलेकडे तरीही पैशांची मागणी करतच होते.
महिलेने जास्त रक्कम देण्यास नकार दिला. यानंतर आरोपी प्रमोदने महिलेला धमकावले आणि सांगितले की,
जर आणखी पैसे दिले नाही तर संपूर्ण गावात तिची विवस्त्र परेड करू आणि तिला बेदम मारहाण करू.
महिलेने यापूर्वी पोलिसांना आरोपींकडून मिळणाऱ्या धमक्यांबाबत सांगितले होते.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा आरोप करण्यात आला आहे की पीडित महिलेने याआधी पोलिसांना आरोपींकडून मिळणाऱ्या धमक्यांची माहिती दिली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. पीडित महिलेसोबत घडलेल्या या लाजिरवाण्या अन गुन्हेगारी घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंब आणि दलित समाजाने केली आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.संबंधित आरोपींना लवकरच अटक केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची पोस्ट
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, पटना येथील एका महिलेने 1400 रुपयांचे कर्ज परत केल्यानंतरही तिच्याकडे अधिक पैसे मागितले गेले. पैसे न दिल्याने तीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर तीला लघवी प्यायला लावली. महिलेने यापूर्वीही पोलिसांत तक्रार केली होती, मात्र कारवाई झाली नाही. आता DCW ने हे प्रकरण गांभीर्याने घेत बिहार सरकार आणि तिथल्या पोलिसांकडे पीडितेला तातडीने सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 25,2023 | 21:15 PM
WebTitle – Patna Dalit Woman Assaulted and Humiliated Over Rs 1500 Dispute