Parliament Mansoon session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बुधवारी विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणणार आहेत. मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सातत्याने विस्कळीत होत आहे. काही मिनिटांच्या घोषणाबाजी आणि गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब केले जात आहे. मणिपूर मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभागृहात प्रधानमंत्री मोदींनीच उत्तर द्यावं यावर ठाम असल्याची भूमिका घेतलीय.विरोधक मोदी सरकारवर विरोधात अविश्वास ठराव मांडणार असल्याच माहिती मिळाली आहे.
विरोधी पक्ष मोदी सरकारवर विरोधात अविश्वास ठराव मांडणार
मंगळवारी चौथ्या दिवशी सभागृह सुरू झाले पण मणिपूरच्या मुद्द्यावरून अनेकवेळा तहकूब करावे लागले. मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी मणिपूरवरून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.तीन मिनिटांतच सभापतींनी लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केले. लोकसभेचं कामकाज 2 वाजता पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधक खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली. मणिपूरसाठी भारताचे पोस्टर्स दाखवले. सभापतींनी लोकसभेचे कामकाज पुन्हा ५ वाजेपर्यंत तहकूब केले.सायंकाळी ५ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा सहकारमंत्री, अमित शहा सरकारच्या कामगिरीवर बोलत राहिले मात्र, विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली आणि मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी लावून धरली.सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधक मणिपूर मुद्द्यावरून मोदी सरकारवर विरोधात अविश्वास ठराव मांडणार असल्याच माहिती मिळाली आहे.
राज्यसभेचीही तीच अवस्था होती.अगोदर सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत,त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.मणिपूर हिंसाचारावर काँग्रेस आणि आपने स्थगन प्रस्ताव आणला आहे. दुपारी 2 वाजता राज्यसभेचे कामकाज तिसऱ्यांदा सुरू झाले तेव्हा विरोधकांनी पुन्हा मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली.परंतु दोन तास चाललेल्या कामकाजात संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (पाचवी सुधारणा) विधेयक, 2022 मंजूर करण्यात आले. यानंतर सभागृह उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.
केंद्रीय मंत्री अमित शहा नी लिहिलं पत्र
दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहातील गोंधळ मिटवण्यासाठी विरोधकांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, सरकार मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे आणि सर्व पक्षांचे सहकार्य मागत आहे. हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्ष सहकार्य करतील अशी आशा आहे.
गदारोळात विधेयक मंजूर झाले
बहुराज्यीय सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक मंगळवारी सभागृहात प्रचंड गदारोळात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
विधेयक मांडताना विरोधी सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीत शहा म्हणाले की,
नारेबाजी करणाऱ्यांना ना सहकारात रस आहे, ना सहकारात, ना दलितांमध्ये, ना महिलांच्या कल्याणात.
विरोधी पक्षनेते खरगे यांचा माईक केला बंद
राज्यसभा सदस्य आणि तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन यांनी ट्विट केले की,
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचा माईक बंद करण्यात आला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, INDIA च्या सर्व घटक पक्षांनी या कृतीच्या निषेधार्थ सभात्याग केला.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 20,2023 | 21:02 PM
WebTitle – Parliament Mansoon session