महाराष्ट्र/छत्तीसगड: नक्षलवादाला संपवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, छत्तीसगडमधील चकमकीत मोस्ट वाँटेड माओवादी नेता चलपती ठार झाला आहे. चलपतीवर एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. या चकमकीत एकूण 10 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले असून, यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.
छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्हा आणि इतर नक्षलप्रभावित भागांत सध्या सुरक्षा दलांनी मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली, ज्यात नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
मोस्ट वाँटेड चलपती ठार ; ऑपरेशनचा यशस्वी अंमल
चलपती हा ओडिशा राज्यातील नक्षल संघटनेचा प्रमुख होता आणि जवळपास 30 वर्षे माओवादी चळवळीत सक्रीय होता. मोस्ट वाँटेड चलपतीला ठार केल्यानंतर चकमकीत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि स्फोटकसाहित्य जप्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये एसएलआर रायफल आणि अँबुंश स्फोटकांचा समावेश आहे.
सीमावर्ती भागांत नक्षलविरोधी मोहिमेचा जोर
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातही महाराष्ट्र आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या मोठे कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या लक्षवेधी योजनेअंतर्गत या भागातील नक्षलवाद संपवण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. गडचिरोलीतील पोलीस पथके आणि सीआरपीएफने जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहिम अधिक तीव्र केली आहे.
सुरक्षा दलांचे यश आणि पुढील रणनीती
सुरक्षा दलांच्या मोहिमेमुळे नक्षलवादी संघटनांचे प्रमुख कॅडर निष्क्रिय होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि गुप्त माहितीच्या आधारे ही रणनीती राबवली जात आहे.
बिजापूर, सुकमा, आणि तेलंगणा सीमावर्ती भागातही अशा मोहिमा सुरू असून, केंद्र सरकारने या मोहिमांवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
नक्षल चळवळीला मोठा फटका
गेल्या काही वर्षांत नक्षल चळवळीच्या विरोधात सुरक्षादलांनी आक्रमक पावले उचलली आहेत.
या मोहिमांमुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला असून, त्यांच्या प्रभावाखालील भाग हळूहळू नियंत्रणात येत आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 21,2024 | 12:45 PM
WebTitle – Naxal Movement Hit Hard: Most Wanted Chalapathi Killed, 10 Naxals Eliminated
#NaxalMovement #ChalapathiKilled #SecurityForcesSuccess #MaoistLeaderEliminated #CRPFOperations #AntiNaxalCampaign