12 मे 2025 | बरेली: सोशल मीडियावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेट्स ठेवून व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या तरुणाची पोलिसांनी अटक केल्यानंतर मात्र चेहरामोहराच बदलून गेला. अटक झाल्यावर रडत खेद व्यक्त करत तो ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ ओरडताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे.त्याला चालताना त्रास देखिल होत असल्याचे दिसतेय. हा व्हिडिओ स्वतः पोलिसांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे जो व्हायरल होत आहे.
बरेली जिल्ह्यातील देवरनियां मधील गिरधरपुर गावाचा रहिवासी मोहम्मद साजिद याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला होता. यात काही तरुण पाकिस्तानचा झेंडा लावत पाकिस्तान च्या समर्थनात जिंदाबाद अशी नारेबाजी करताना दिसत होते. स्टेट्स ल ठेवलेला हा व्हिडिओ पाकिस्तान चा असल्याचे समजल्यावर लोकांमध्ये राग निर्माण झाला आणि त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर देवरनियां पोलिसांनी गुन्हा दाखल करून रविवार रात्री साजिदला अटक केली.

अटकेनंतर चुकीची जाणीव
सोमवारी जेव्हा साजिदला अटक करून तुरुंगात आणले, तेव्हा त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो रडत “पाकिस्तान मुर्दाबाद”चे नारे लावत होता. पोलिसांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितले की, “सायबर सेलची टीम सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सतत नजर ठेवते आहे. आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. समाजशांती भंग करणाऱ्यांशी पोलिस कठोरपणे वागतील.”
पाकिस्तान जिंदाबाद बोलणं पडलं महागात #IndiaPakistanConflict https://t.co/p0cxc5aAkz pic.twitter.com/JNuON5qwgQ
— Jaaglya bharat (@JaaglyaBharat) May 12, 2025
भ्रामक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशातील शाहजहांपुरमध्ये फेक सोशल मीडिया खात्यांतून भ्रामक आतंकवादी हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तीन व्यक्तींविरुद्ध
पोलिस स्टेशन आणि सायबर क्राइम अंतर्गत योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सोमवारी सांगितले की, “फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर या तीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कथित आतंकवादी हल्ल्याशी संबंधित एक भ्रामक आणि खोटा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता, ज्यामध्ये गोळीबाराच्या आवाजासोबत ‘शाहजहांपुरमध्ये आतंकवादी हल्ला झाला’ असे लिहिले होते.”
त्यांनी सांगितले की, “सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केल्यावर हा प्रकार खोटा ठरला.
यानंतर सायबर थान्यात इंस्टाग्राम खातेदार अंकित कुमार आणि थाना कोतवालीमध्ये फेसबुक युजर परविंदर यांच्याविरुद्ध
रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय एका अज्ञात व्यक्तीविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.”
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 12,2024 | 21:18 PM
WebTitle – Mohammad Sajid Posted ‘Pakistan Zindabad’ Video Arrested, Later Shouts ‘Pakistan Murdabad’