25 डिसेंबर | मुंबई : महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे अधीक्षक यांनी केले आहे.
अल्पसंख्यांक विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी ही परदेश शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. यामध्ये राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती आणि लाभार्थी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
1) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2) विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा.पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व
पीएचडी साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असेल.
3) विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला
उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर
विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला
उमेदवाराने वडिलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे
आवश्यक आहे.)
4) परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीचा एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती
द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर
त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे
अधिकार निवड समितीला राहतील.
5) एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त
मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र
करून देणे बंधनकारक असेल.
6) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर
परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने
अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा.परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS
World University Rank) 200 च्या आत असावी.
अधिक माहितीसाठी:
अर्ज व इतर माहिती शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत भाग १, चौथा मजला, आरसी मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 25,2024 | 17:10 PM
WebTitle – minority-students-overseas-scholarship-2024
#Scholarship2024 #OverseasEducation #MinorityStudents #EducationForAll #PostgraduateStudies #PhDOpportunities #StudyAbroad #HigherEducation