मुंबई 16/03/2026 : राज्यात निर्माण झालेल्या Maharashtra gas shortage मुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना या परिस्थितीवर उपाय म्हणून राज्य सरकारने बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर मिळण्यात उशीर झाल्यास नागरिकांना पर्यायी इंधन म्हणून केरोसिनचा वापर करता येणार आहे.
या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री Chhagan Bhujbal यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, सध्याच्या Maharashtra gas shortage परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
केरोसिन चा पुरवठा वाढवण्याची राज्य सरकारची योजना
भुजबळ यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी त्यांनी पेट्रोलियम क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली.
यात Bharat Petroleum, Hindustan Petroleum आणि Indian Oil Corporation या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या चर्चेदरम्यान कंपन्यांनी राज्यातील घरगुती एलपीजीचे दैनंदिन उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील घरगुती गॅसचे उत्पादन दररोज सुमारे ९००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
तसेच एलपीजी उत्पादनातील अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू असल्याचेही कंपन्यांकडून सांगण्यात आले.
केरोसिन चा पुरवठा वाढवण्याची राज्य सरकारची योजना
सध्याच्या Maharashtra gas shortage परिस्थितीत घरगुती ग्राहकांना गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. घरगुती गरजा पूर्ण केल्यानंतर उरलेला गॅस अत्यावश्यक सेवांना उपलब्ध करून देण्यात येईल.
यामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि स्मशानभूमी यांना एलपीजी पुरवठ्यात १०० टक्के प्राधान्य दिले जाईल.
त्याचबरोबर औषध उद्योग तसेच संरक्षण क्षेत्रातील उपहारगृहांना एलपीजी वितरणात सुमारे ५० टक्के प्राधान्य दिले जाईल,असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील Maharashtra gas shortage लक्षात घेता नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी
केरोसिनचा पुरवठा वाढवण्याचा पर्याय सरकारकडून विचाराधीन आहे.
या निर्णयामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत सामान्य नागरिकांना स्वयंपाकासाठी पर्यायी इंधन उपलब्ध होऊ शकते,
अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 16,2026 | 20:03 PM
WebTitle – maharashtra-gas-shortage-kerosene-supply-plan-chhagan-bhujbal























































