24 डिसेंबर 2024 | लखनौ : लखनौच्या गोमतीनगर परिसरात शनिवारी रात्री SUV सवार गुंडांनी दहशत माजवली. विपुलखंड येथील नीरज चौकाजवळ या गुंडांनी औषध व्यावसायिक दांपत्याला थांबवून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कारवर दगडफेक करून नुकसान केले आणि त्यानंतर विटा फेकून दोघांचेही डोके फोडले. त्यांच्याकडील दागिने लुटून धमकावत तेथून पळ काढण्यास भाग पाडले. त्यानंतर फक्त 10 मिनिटांत 200 मीटर अंतरावर दयाल पॅराडाईज चौकाजवळ आणखी एका कारसह दोन व्यक्तींवर हल्ला करून त्यांनाही लुटले.
डालीगंजमधील रहिवासी अमर केसरी यांनी सांगितले की, शनिवारी उशिरा रात्री एका कौटुंबिक समारंभातून पत्नीसमवेत परतत असताना ही घटना घडली. रात्री साधारणपणे 1:20 वाजता लखनौ च्या विपुलखंड येथील नीरज चौकाजवळ SUV मधिल गुंडांनी त्यांच्या कारला ओव्हरटेक करून अडवले. त्यांनी काही समजायच्या आत SUV मधून पाच जण बाहेर येऊन शिवीगाळ करू लागले. त्यांनी काठीने कारच्या पुढील काच फोडली आणि नंतर दगडफेक करून खिडकीची काचही फोडली.
तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील
अमर यांनी विरोध केल्यावर गुंडांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर वीट मारली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
त्यानंतर त्यांनी अमर यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट आणि दोन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या.
त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन आणि कडेही हिसकावून घेतले. यानंतर गुंडांनी त्यांना धमकावत तिथून पळवून लावले. याबाबत तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा देण्यात आली. कसेबसे घर गाठून अमर यांनी रविवारी गोमतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलीस तपास सुरू
गोमतीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश त्रिपाठी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. आरोपी लवकरच अटकेत असतील.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 24,2024 | 11:48 AM
WebTitle – lucknow-suv-goons-attack-loot-families-violence