4 डिसेंबर 2025 | धुळे : महाराष्ट्रातील महिलांना थेट आर्थिक सहाय्यता करणारी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर कोणी नियम डावलून या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. योजनेअंतर्गत दिलेले पैसे परत सरकारकडे जमा करावे लागतील.आता कारवाईची सुरुवात झाली असून पहिली केस धुळे जिल्ह्यातून समोर आली आहे.लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलेला दिलेले पैसे परत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या महिलेवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजना महिलेवर सरकारची कारवाई; परत घेतले पैसे
धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेने या योजनेचा लाभ नियमांनुसार न घेता दुबार अर्ज करून घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे त्या महिलेचे 5 महिन्यांचे एकूण साडे सात हजार रुपये परत घेण्यात आले आहेत.
महायुती सरकारचा निर्णय: अर्जांची तपासणी आणि कठोर कारवाई
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे अर्ज तपासण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या महिलांनी योजनेच्या निकषांचे उल्लंघन केले आहे, त्यांना अपात्र ठरवले जाईल.
अर्जांची सखोल चौकशी केली जात आहे, आणि अपात्र ठरलेल्या महिलांकडून दिलेले पैसे परत घेतले जातील.
धुळे जिल्ह्यातील प्रकरण हे पहिलंच नसून, अशा प्रकारच्या तक्रारी जळगाव, वर्धा, गडचिरोली आणि पालघर या जिल्ह्यांतूनही आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकषांचे पालन करणे आवश्यक आहे:
अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
कुटुंबातील सदस्य आमदार, खासदार किंवा करदाते असतील तर लाभ मिळणार नाही.
कुटुंबात चारचाकी वाहन असल्यास लाभ अपात्र ठरेल.
स्वतः महिला सरकारी नोकरीत असल्यास लाभ घेता येणार नाही.
नियम डावलून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत
मात्र काही लाभार्थींनी योजनेला फसवून लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
धुळे जिल्ह्यातील एका महिलेने निकष डावलून दुबार अर्ज केला होता, ज्यामुळे तिचे पैसे सरकारने परत घेतले.
भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता निकष पाळा, अन्यथा मिळालेल्या पैशांची परतफेड करावी लागेल.
जागल्याभारत कडून आम्हीही महिलांना आवाहन करत आहोत,ज्या पात्र आहेत,
खरंच आर्थिक मदतीची गरज आहे,अशाच लोकांनी योजनेचा लाभ घेतला पाहिजे.
पैशांचा मोह कुणालाही सोडवत नाही हे खरं आहे,मात्र अशा मोहाला बळी पडू नये,आपला आत्मसन्मान ही खूप मोठी अन मौल्यवान गोष्ट असते.
ती एकदा धुळीस मिळाली की पुन्हा मिळवता येत नाही.गरीब आर्थिक कमजोर लोकाना लाभ मिळणे हे देशासाठीही चांगले आहे.यातूनच देश घडत असतो.
ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा,तुमच्या मित्रांना अन लाडक्या बहिणीला पाठवा.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 04,2024 | 17:18 PM
WebTitle – ladki bahin yojna government action on fraud