पटणा: नॉर्मलायझेशन च्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि सोशल मिडियात लोकप्रिय असणारे शिक्षक खान सर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खान सर यांना गर्दनीबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी त्याठिकाणी पोहोचले आहेत. विद्यार्थ्यांनी सरकार आणि बीपीएससीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
खान सर आज बीपीएससी कार्यालयाबाहेर नॉर्मलायझेशन च्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी यावेळी सांगितले की, “आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत आहोत. नॉर्मलायझेशन रद्द झाल्याशिवाय आम्ही इथून जाऊ शकत नाही.जोपर्यंत याबाबत नोटिफिकेशन जारी होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.”
त्यांच्यासोबत शिक्षक गुरु रहमानदेखील उपस्थित होते. गर्दनीबाग येथे हजारो विद्यार्थी जमले होते. या वेळी पोलिसांनी आंदोलन पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. मात्र, या सगळ्याच्या विरोधात आंदोलन सुरूच राहिले. यानंतर खान सर आणि गुरु रहमान यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
प्रथम खान सर, नंतर गुरु रहमान ताब्यात
खान सर जवळपास एका तासापर्यंत गर्दनीबाग पोलीस ठाण्यात होते. ठाण्याच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, ते आंदोलनावरून परतताना ठाण्यात आले होते. त्यांना बीपीएससीच्या सचिवांशी भेटायचे होते. पोलिसांनी कागदोपत्री त्यांना ताब्यात घेतल्याची स्पष्ट केले नाही. काही वेळानंतर गुरु रहमान यांनाही ताब्यात घेऊन गर्दनीबाग ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान, विद्यार्थी नेता दिलीप यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातून बाहेर पडल्यावर खान सर यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना योग्य ठरवले. त्यांनी सांगितले की, अर्ज प्रक्रियेच्या वेळीही विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या होत्या.
बीपीएससीचे स्पष्टीकरण
बीपीएससीचे अध्यक्ष रवि मनु भाई परमार यांनी याबाबत संध्याकाळी स्पष्टीकरण दिले की,
“नॉर्मलायझेशन लागू झालेच नाही, त्यामुळे त्याविरोधातील आंदोलन चुकीचे आहे. जाहिरातीत सर्व माहिती स्पष्ट देण्यात आली होती. परीक्षा तयारी सोडून असे आंदोलन करणे गैर आहे.”
बीपीएससी सचिव सत्य प्रकाश शर्मा यांनीही स्पष्ट केले की,
“नॉर्मलायझेशन लागू होणार नाही, याबाबत अफवा पसरवली जात आहे. आयोगाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
13 डिसेंबर रोजी बीपीएससीची परीक्षा
बिहार लोकसेवा आयोग (BPSC) यांनी यावेळी 2035 पदांसाठी परीक्षा आयोजित केली असून
या परीक्षेची प्रारंभिक फेरी 13 डिसेंबर रोजी होणार आहे. बिहारमधील 36 जिल्ह्यांमध्ये 925 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पटणामध्ये 60 हून अधिक परीक्षा केंद्र असतील. परीक्षा दुपारी 12 ते 2 या वेळेत होणार आहे.
या परीक्षेसाठी सुमारे 4 लाख 80 हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. परीक्षेच्या एक आठवड्यापूर्वी विद्यार्थ्यांना केंद्राविषयीची माहिती मिळेल.
BPSC 70वी संयुक्त स्पर्धा परीक्षेसाठीचे ई-प्रवेशपत्र आजपासून डाऊनलोड करता येणार आहे.
विद्यार्थी www.bpsc.bih.nic.in किंवा www.onlinebpsc.bihar.gov.in या वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 06,2024 | 21:25 PM
WebTitle –
#KhanSir #BPSCProtest #NormalizationIssue #BiharNews #StudentRights