मराठी सिरियल मध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त पोस्टमुळे सतत चर्चेत असते.ती तिचे विचार तिच्या पोस्टमधून बिनधास्तपणे मांडत असते. त्यामुळे तिने बऱ्याचदा लोकांचा रोषही ओढवून घेतला आहे.तिच्या पोस्टवरून लोक तिला ट्रोल करतात,आक्षेपार्ह भाषाही वापरतात, अशावेळी केतकी चितळे ने त्या ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. आता ट्रोलरला उत्तर देताना केतकी चितळे ने शिवी दिल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
केतकी चितळे ने काल नविन वर्षाचे जोरदार सेलिब्रेशन केलं.हे सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओ मध्ये केतकीने म्हटलंय “माफ करा पण कधीही विसरू नका… हॅप्पी न्यू इयर” असं म्हणत ती व्हिडिओ मध्ये दारू पिताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलंय की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”
यावर एका ट्रोल ने लिहिलं “हिंदू आहेस ना.. मग न्यू ईअर ला हिंदू देवाला हात जोडतात.. तू दारू पिताना व्हिडिओ का काढतेस .. खूप तरुण मुलं तुला फॉलो करत आहेत… काही चांगलं लोकांसमोर ठेव .. हीच अपेक्षा.. हॅप्पी न्यू ईअर “
Hindu aahesna.. Mag new year la hindu devala hat jodtat.. Tu daru pitana video ka kadhtes.. Khup tarun mul tula follow karat aahe.. Kahi changl lokan samor thev.. Hich apeksha.. Happy new year..
केतकी चितळे शिवी देत म्हणाली..
या कमेंट मुळे केतकी चितळे चा पारा चढला,तिने संतापून ट्रोलला थेट शिवीच दिली.केतकी चितळे शिवी देत म्हणाली की “यडझव्या इसमा,हे ग्रेगोरियन नववर्ष आहे. पंचांगानुसार नवीन वर्ष नाही. अर्थात तुमच्या पिढीला हा साधा फरक माहित असण्याची अपेक्षा ठेवणं हा माझा मूर्खपणा आहे.” त्यासोबतच तिने पुढे खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने हसण्याची चार इमोजीही टाकली. तिच्या या उत्तराने सर्वांचं या कमेंट कडे लक्ष वेधलं आहे.अनेकांनी तिला सपोर्ट सुद्धा केला आहे.

एका युजर ने त्या ट्रोलला म्हटलंय.. “घेतलीस ना स्वतः ची खुळ्यात काढून. काय गरज होती का ट्रोल करायची.
नाहीं पटत तर इग्नोर करायचा. नशीब तुझा फोटो नाहीं प्रोफाइल ला. नाहीतर जिथे राहतोस तिथे तोंड दाखवायला जागा राहिली नसती 😂”
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 01,2023 13:13 PM
WebTitle -Ketaki Chitale got angry Abusing the troller