दिल्ली : 27 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केली,या नीट कृषी विधेयकांना जनतेकडून सडकून टीका करताना काळे कायदे अशी संभावना केली गेली.त्यानंतर प्रदीर्घ आंदोलन चालले.जवळपास वर्षभर हे आंदोलन सुरू होते.६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे बळी यात गेल्याची माहिती मिळतेय.सुरुवातीपासूनच भाजप सरकारचे शेतकरी आंदोलन आणि शेतकरी यांच्याप्रतीचे व्यवहार वागणे हे अपमानजनक राहिल्याचे दिसून आले.सरकारने थेट बोलणी करणे अनेकदा टाळले.शेतकऱ्यांच्या मागण्या स्वीकारण्यास नकार दिला.एवढेच नाहीतर अनेक मार्गाने हे आंदोलन चिरडण्याचा हरएक प्रकारे प्रयत्न करून पाहिला.परंतु ठाण मांडून बसलेले शेतकरी काही मागे हटायला तयार नव्हते त्यामुळे अखेर भाजप सरकारला नमते घेण्याची नामुष्की ओढवली.आज नरेंद्र मोदींना तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली आहे.शेतकरी कायदे रद्द करण्याची घोषणा झाली.
राकेश टिकैत यांची सावध भूमिका
तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेली असली तरी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते राकेश टिकैत यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली दिसतेय.कदाचित सरकारच्या नरेंद्र मोदींच्या शब्दांवर त्यांना अजूनही विश्वास ठेवावा असे वाटत नसावे त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की,आंदोलन तत्काळ मागे घेण्यात येणार नाही.आम्ही हे कायदे संसदेत जेव्हा संविधानिक प्रक्रियेअंतर्गत रद्द केले जातील तेव्हाच आंदोलन मागे घेतले जाईल.
हे जाहीर आहे की शेतकरी नेते हे मंझे हुए खिलाडी आहेत.ते सहजासहजी सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाहीत.त्यामुळे केवळ हे तीन कृषी कायदेच नाहीतर त्यांच्या MSP सोबतच्या आणखी इतर मागण्यावर देखिल चर्चा अपेक्षित आहे.त्यामुळे केवळ कायदे रद्द करण्याचे आश्वासन शेतकरी नेत्यांना समाधान कारक वाटत नसल्याचे दिसते आहे.
कायदे रद्द करताना नरेंद्र मोदी काय म्हणाले?
प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही तरी कमी राहिली असेल.ज्यामुळे दिव्याच्या ज्योती प्रमाणे असणारे सत्य काही शेतकऱ्यांना दिसले नाही.आम्ही गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.या महिन्याच्या शेवटी सुरू होणाऱ्या संसद सत्रात आम्ही या तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या संविधानिक प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत.
भाजप नेत्याने केली होती शेतकरी आंदोलनाची संभावना “तुकडे तुकडे गँग” सोबत
देशातील तुकडे तुकडे गँगचे लोक शेतकरी आंदोलनाला शाहीनबाग बनवू इच्छित आहेत. एका योजनाबद्ध पद्धतीनं देशाचं वातावरण बिघडवण्यासाठी हा कट रचला जातोय. त्यांना देशातील शांतता नकोय असं बेजबाबदार आणि शेतकऱ्यांचा अपमान करणारं विधान भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केले होते.
तीन कृषी कायदे नेमके काय होते जाणून घ्या
पहिला कायदा शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
दुसरा कायदा शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020
तिसरा कायदा – अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020
समीर वानखेडे च्या शाळेच्या दाखल्यावर ते मुस्लिम – नवाब मलिक
भाजप माजी आमदाराने कंगना राणावत वर केला गुन्हा दाखल, म्हणाले..
जयभीम चित्रपट वाद: हीरो सूर्याला मारण्याची धमकी;पोलिस तैनात
पोचिराम कांबळे : एका नामांतर शहिदाची अस्वस्थ कहाणी..!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 19, 2021 13:00 PM
WebTitle – However, the agitation will not withdraw the repeal of the law, said Rakesh Tikait