उल्हासनगर : ‘कायद्याने वागा लोकचळवळ‘च्या वतीने शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी उल्हासनगर पश्चिम येथील सिंधुभवन, सपना गार्डन येथे ‘फातिमाबी -सावित्री उत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांचे सशक्तीकरण, सामाजिक जागृती आणि प्रतिकूल परिस्थितीतून उभ्या राहिलेल्या महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाला सलाम करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी ऊर्जादायी ठरला.
फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि सामाजिक संघर्षाला मानवंदना देण्यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वाभिमान आणि सामूहिक संघर्षाच्या विचारांना उजाळा देण्यात आला. उपस्थितांनी “बाबासाहेब, तुम्हाला लाख लाख वेळा सॅल्यूट!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
कडुबाई खरात यांचा विशेष सन्मान
या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या सुप्रसिद्ध लोककलावंत कडुबाई खरात. त्यांना याप्रसंगी ‘फातिमाबाई-सावित्री विशेष सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. प्रसिद्ध संगीतकार आशुतोष वाघमारे यांनी कडुबाई यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यांच्या खडतर जीवनप्रवासावर आणि सांगीतिक वाटचालीवर आधारित हा प्रसंग अत्यंत प्रभावी ठरला. त्यानंतर झालेल्या भावपूर्ण गीत-सादरीकरणाने रसिक भारावून गेले. बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, “कातड्याचे जोडे करून शिवले तरी तुमचे उपकार फिटायचे नाहीत!” हे कडुबाईंचे शब्द उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेले.
यंदाचे फातिमाबी सावित्री उत्सव पुरस्कार मानकरी
समाजातील विविध स्तरांतून संघर्ष करत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या
५ कर्तृत्ववान महिलांना यंदा ‘फातिमाबाई-सावित्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले:

सुनीता भोसले
दीपा पवार
श्वेता सीमा विनोद
आयेशा शेख
ज्योती तायडे
“काम बाबासाहेबांसारखं हवं!” – राज असरोंडकर
दरम्यान फातिमाबी सावित्री उत्सवाच्या सांगता सोहळ्याविषयी बोलताना ‘कायद्याने वागा लोक चळवळ’चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत या सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “पुरस्कार म्हणजे काय? आपल्या कामाची दखल, कामाला पाठबळ; आम्हीही सोबत आहोत याची ग्वाही! कोषात जगणाऱ्यांना सभोवतालाचं वास्तव दाखवण्यासाठीची धडपड, विचारांची देवाणघेवाण, सकारात्मक विचार करणाऱ्यांचा मेळा, जमलंच तर हातात हात घेऊन पुढे एकत्र वाटचाल करण्याचा मानस…”
पुरस्कार म्हणजे संघर्षाला दिलेले पाठबळ
कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती, तर पैगंबर शेख यांची विशेष उपस्थिती लाभली.
“पुरस्कार म्हणजे फक्त सन्मान नव्हे, तर तुमच्या कामाची घेतलेली दखल आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत याची दिलेली ग्वाही आहे,”
अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
कोषात जगणाऱ्या समाजाला वास्तव दाखवणे, सकारात्मक विचारांचा मेळावा घडवून आणणे
आणि हातात हात घालून पुढे जाण्याचा मानस या उत्सवातून स्पष्ट झाला.
“कायद्याने वागा, न्यायासाठी एकत्र उभे राहा!” असा एकजुटीचा संदेश देत,
हा उत्सव महिलांच्या लढाईला आणि सामाजिक न्यायाला नवे बळ देऊन यशस्वीपणे पार पडला.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 08,2026 | 22:10 PM
WebTitle – Fatimabi Savitri Utsav Award list 2026























































