लोकसत्तामध्ये दर गुरुवारी येणाऱ्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशी निगडित ‘साखळीचे स्वातंत्र्य’ या लेखमालेत ५२ आठवड्यांचे ५२ लेख प्रकाशित झाले आहेत.
या ५२ लेखांना आपण पुढील ८ भागात मोडू शकतो:
भाग १: ब्लॉकचेनचा परिचय भाग
२: पैश्याचा इतिहास भाग
३: बँकिंग आणि बिटकॉइन भाग
४: सायफरपंक चळवळ आणि बिटकॉइनचा इतिहास भाग
५: ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील विविध संकल्पनांचा परिचय भाग
६: चला बिटकॉइन समजून घेऊया भाग
७: ब्लॉकचेनचे विविध प्रकार आणि उदाहरण भाग
८: विकेंद्रित, विश्वासार्ह, आणि पारदर्शक जगाकडे घेऊन जाणारे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे प्रयोग वा वापर
सर्व लेखांचे लिंक्स:
भाग १: ब्लॉकचेनचा परिचय १. आढावा घेणारा पहिला लेख: https://www.loksatta.com/…/article-about-technology…/
2. दुसऱ्या लेखात आपण ब्लॉकचेन आणि ‘अकौंटिंग’ यांचा थेट संबंध कसा बनतो ते इतिहासाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया: https://www.loksatta.com/…/article-about-blockchain-a…/
3. आजच्या तिसऱ्या लेखात ब्लॉकचेनच्या व्याख्येला समजून घ्यायचा प्रयत्न आपण करूया. जस की, ‘विकेंद्रीकरण’ हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला तो एकोणिसाव्या शतकात; ‘ब्लॉकचेन’च्या संदर्भात त्याचा अर्थ काय? पुढे वाचायला लिंक : https://www.loksatta.com/…/decentralization-in-terms…/भाग २: पैश्याचा इतिहास
4. आजच्या चौथ्या लेखात बिटकोईन किंवा ब्लॉकचेन ज्या पैश्याला किंवा चलनाला बाजूला सारू पाहते, त्या पैश्याचा नक्की इतिहास आणि उगम तरी काय हे पाहून घेऊया: वाचायला लिंक वर क्लिक करावे: https://www.loksatta.com/…/blockchain-technology…/
5. आजच्या पाचव्या लेखात , बिटकॉईन, पैसे आणि चलन यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी एका उदाहरण म्हणून यॅप बेटावरील प्राचीन दगडी पैश्याचा उपयोग केलाय: https://www.loksatta.com/…/blockchain-technology…/
बँकिंग आणि बिटकॉइन
6. आजच्या सहाव्या लेखात* कागदी चलन कसे सुरू झाले, आणि पैसे छापतो म्हणजे नक्की काय असतं याला ऐतिहासिक अनुषंगाने पाहूया: https://www.loksatta.com/…/article-on-marco-polo…भाग ३: बँकिंग आणि बिटकॉइन
7. ज्या बँकांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ‘बिटकॉइन’ सारखे चलन बाजूला सारू पाहते, त्यांच्या बद्दल थोडं आजच्या सातव्या लेखात आपण पाहूया: https://www.loksatta.com/…/blockchain-technology…/
8. आजच्या आठव्या लेखात बिटकॉईनच्या ब्लॉक”चेन” जी माहितीची साखळी आहे, त्यामधील पहिल्या माहितीच्या कडीकडे आपण पाहूया, आणि त्याचा आणि 2007-08 मध्ये आलेल्या जागतिक मंदीचा काय संबंध होता ते सुद्धा पाहूया: https://www.loksatta.com/author/gaurav-somvanshi/भाग ४: सायफरपंक चळवळ आणि बिटकॉइनचा इतिहास
सातोषी नाकोमोटो
9. आजच्या नवव्या लेखात आपण बिटकॉईन आणि त्यामागील ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे ज्या सायफरपंक चळवळीतून समोर आले त्याकडे पाहूया. . यामध्ये विकिलीक्सचा ज्युलियन असांज आणि बिटकोईनचा सातोषी नाकोमोटो यांच्यामध्ये काय साम्य आहे ते सुद्धा कळेल.. या लेखाला सायफरपंक चळवळीचा पहिला भाग समजावा https://www.loksatta.com/…/bitcoin-and-the-rise-of-the…/
10. आजच्या दहाव्या लेखात आपण बिटकोईनच्या मागील दडलेल्या वैचारिक उत्क्रांतिकडे पाहूया ज्याने हे नवीन जागतिक चलन घडवले. मागील लेखात जी सायफरपंक चळवळ पाहिली तिला अजून खोलवर जाऊन पाहूया: https://www.loksatta.com/…/evolution-of-a-revolution…/
11. आजच्या अकराव्या लेखात आपण सातोषी नाकोमोटोच्या अगोदर येऊन गेलेल्या दिग्गजांकडे पाहूया, ज्यांचं ब्लॉकचेन तंत्रज्ञान घडवून आणण्यात इतकं मोठं योगदान आहे की अनेक लोकांच्या मते सातोषी नाकोमोटो यांच्यापैकीच कोणी एक असला पाहिजे: https://www.loksatta.com/…/article-about-bitcoin…/
12. आजच्या बाराव्या लेखात आजपर्यंतच्या लेखांचा एक आढावा घेत, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आपण तांत्रिक बाजूने पुढे कसंसमजून घेणार आहोत यावर एक नजर टाकूया https://www.loksatta.com/…/article-about-features-of…भाग ५: ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील विविध संकल्पनांचा परिचय
13. आजच्या तेराव्या लेखापासून तांत्रिकदृष्ट्या ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी सुरुवात झाली असून, “हॅशिंग” बद्दल थोडं समजून घेऊया: https://www.loksatta.com/…/article-on-hashing-hashcash…/
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन
14. ‘करोनाच्या साथीतले होणारे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे उपयोग आणि प्रयोग…’ सध्या ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन , आपला अन्न-पुरवठा, आणि चायनाचे करोना साथीला टक्कर द्यायला आणलेले २० उपयोग, या सगळ्यांचा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशी असणारा संबंध, याकडे एक नजर टाकणं गरजेचं आहे.. या विषयाला धरून आजचा चौदावा लेख लिहिला आहे..आपल्या लेखमालेतील नेहमीचा प्रवाह या विशेष लेखासाठी खंडित केला असून, पुढच्या लेखपासून परत तांत्रिक संकल्पना समजून घेऊया.. Link: https://www.loksatta.com/…/article-on-blockchain…/
15. आजच्या पंधराव्या लेखात आपण वापस तंत्रिकी संकल्पना समजून घेणं सुरू ठेवत, ‘डिजिटल स्वाक्षरी’ या संकल्पनेवर लक्ष दिलं आहे.. Link: https://www.loksatta.com/…/article-on-digital…/
16. ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजून घेतांना आपण आजच्या सोळाव्या लेखात अजून एक मूलभूत तांत्रिकी संकल्पना समजून घेऊया, की गणिताच्या अवाढव्य आकड्यांमधून माहितीसाठी सुरक्षकवच कसे निर्माण केले जाते.. ‘SHA-२५६’ कार्यप्रणाली जी बिटकोईनचा पाया आहे, ती कशी मोठ्या आकड्यांची मदत घेऊन एक जवळपास अभेद्य भिंत निर्माण करते.. लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-blockchain…/
बिटकॉइन समजून घेऊया
17. आजच्या लेखात एक राजा आणि दोन सेनापतींची एक मजेदार गोष्ट वा कोडे पाहू. याचा संबंध ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाशी, इंटरनेटशी किंवा त्याही आधी लॅण्डलाइन टेलिफोनशी कसा आहे, ते नंतर कळेल. पण या सतराव्या लेखात, ज्याला तुम्ही स्वतंत्रपणे सुद्धा वाचू शकता, आपण फक्त एक कोडे समजून घेऊ… त्याचे उत्तर पुढील लेखात.. Link: https://www.loksatta.com/…/article-on-rise-of-the…/
18. आजच्या स्वतंत्र (व अठराव्या) लेखात आपण तांत्रिकी जगतात बहुमत कसे मिळवावे व सिद्ध करावे यासाठी एक कोडे पाहूया… लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-how-does-this…/
19. फेसबुकवर आपल्यासमोर हे उदाहरण मी २०१७ मध्येच मांडलं होतं, त्याला इथे विस्ताराने लिहीत आहे. आजच्या स्वतंत्र (आणि एकोणिसाव्या) लेखात आपण सायमन देदेओ यांच्या एका आलिशान हॉटेलमध्ये बंदिस्त केलेल्या कैद्यांच्या उदाहरणावरून हे समजून घेऊ की ब्लॉकचेन तंत्रज्ञान नक्की कसं काम करतं.. Link for reading: https://www.loksatta.com/…/article-on-what-is-the…/भाग ६: चला बिटकॉइन समजून घेऊया
सायफरपंक चळवळ
२०. आजच्या विसाव्या लेखात मागील विषयांचा आढावा घेतला आहे. सुरुवातीला पाहिलेला पैश्याचा इतिहास, त्यामधून हे समजून घेणं की हे फक्त एक प्रकारची “नोंदवहीच” आहे, तिथून मग बँकांचं “विश्वास” द्यायचं काम, ज्याच्याशी लागून सुरू झालेली सायफरपंक चळवळ, आणि शेवटी काही स्वतंत्र मूलभूत तंत्रिकी संकल्पना कोणकोणत्या आहेत, यावर एक नजर आहे टाकली आहे. पुढील काही लेख फक्त आणि फक्त बिटकॉईनवर केंद्रित असतील, त्यामुळे असं कुठे नको वाटायला की बिटकॉईन आणि ब्लॉकचेन एकच आहेत, आणि आज यावर लिहिलं आहे. एकदा बिटकॉईन समजून बाजूला ठेवला की ब्लॉकचेनचे प्रकार, आणि इतर क्षेत्रातील प्रयोग वा उपयोग बघायला आपण मोकळे. Link: https://www.loksatta.com/…/article-on-blockchain…/
२१. आजच्या एकविसाव्या लेखात आपण बिटकॉईन समजून घ्यायला एक सौम्य सुरुवात करतोय. या आणि पुढील लेखांमध्ये फक्त तांत्रिक अनुषंगाने बिटकॉईन समजून घेऊया, म्हणजे की नंतर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे प्रयोग आणि उपयोग बघायला आपण मोकळे. लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-bitcoins…/
२२. बाकी काही वाचलं नसेल तरी चालेल, पण हा आणि पुढचा लेख नक्की वाचाच. बिटकॉईनची कार्यप्रणाली, ब्लॉकचेनचा वापर, हे सर्व ग्रॅंट सॅनडर्सनच्या उदाहरणांवरून स्पष्ट करायचा प्रयत्न केला आहे. लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-bitcoins…/
२३. बिटकोईनला मुळापासून समजून घ्यायच्या आपल्या या प्रयत्नात लिहिलेला हा लेख मागील लेखसोबतच वाचावा, स्वतंत्र नाही. बिटकॉईनचे चलन म्हणजे नेमके काय, बिटकॉईनचे मूळ स्वरूप काय आहे, हे आजच्या लेखात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या लेखाची लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-blockchain…/
बिटकॉईन मायनिंग
२४. बिटकॉईनचा उगम कधी होतो, “मायनिंग” म्हणजे नक्की काय, २००९ पासून आजपर्यंत जगभर हजारो लोकं कोणतं कोडं सोडवून बिटकॉईन मिळवत आहेत, हे आजच्या महत्वपुर्ण लेखात नक्की वाचा. हे कळालं म्हणजे बिटकोईनच्या मागील यंत्रणा कळाली. लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-puzzle-solving…/
२५. आजच्या लेखात आपण सरळसरळ एक साधारण ब्लॉक कसा दिसतो, कसा बनतो, त्यात काय-काय माहिती असते, आणि अनेक ब्लॉक मिळून एक ब्लॉक”चेन” कशी बनते आणि दिसते हे पाहूया. मागील लेखांचा आधार घेतला आहे. लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-block-to…/
२६. आजच्या लेखात आपण बिटकोईनच्या दुनियेत तंत्रिकी अनुषंगाने अजून खोलवर जाऊन गोष्टी समजून घेऊयात. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे हे पहिले यशस्वी प्रयोग असल्यामुळे याला विशेषकरून समजून घेणे गरजेचे आहे. नंतरच्या लेखात आपण या तंत्रज्ञानाचे इतर प्रयोग वा उपयोग बघूच. लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-bitcoin-rewards…/
बिटकॉईन
२७. विश्वात फक्त २.१ कोटी बिटकोईनच का असतील? सन २१४० मध्ये सगळे बिटकॉईन “खणून” होतील असं का म्हणतात? या आणि इतर प्रश्नांकडे आपण आजच्या २७व्या लेखात एक नजर टाकूया. लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-bitcoin-number…/
२८. बिटकॉईनची कार्यप्रणाली आज कोणाच्या हातात आहे? त्यात कोणी बदल करू शकतं का? तुम्हाला स्वतःला ती बदलायची असेल तर? आणि याचा अकबर आणि बिरबलच्या गोष्टीसोबत काय संबंध? हे आपण आज या २८व्या लेखात पाहूया: https://www.loksatta.com/…/article-on-rules-on-bitcoin…/
29. बहुमताचा आग्रह धरणाऱ्या बिटकॉइन प्रणालीमध्ये अल्पसंख्येत असणाऱ्या मतांना वगळलेच जाणार का? बिटकॉइन प्रणालीत दोन परस्परविरुद्ध मतांचे गट असतील आणि त्यांच्यात समन्वयही साधला जात नसेल, तर काय घडते? आजच्या २९व्या लेखात आपण हे पाहुयात link: https://www.loksatta.com/…/article-on-bitcoin-cash-and…/
ब्लॉकचेनचे विविध प्रकार
30. आजच्या ३०व्या लेखात आपण बिटकोईनमध्ये ‘फाटे फुटून’ किंवा ‘हार्ड फोर्क’ झालेले काही उदाहरण आणि पर्यायी कुटचलनांकडे (क्रीपटो-करन्सी/ अल्ट-कॉईन) यांच्यावर एक छोटी नजर टाकूया. https://www.loksatta.com/…/article-on-alternatives-to…/
31. आजच्या ३१व्या लेखात आपण पाहत आलेल्या तंत्रिकी माहिती पासून थोडं दूर होऊन बिटकोईनवर होत असलेल्या काही आक्षेपांवर एक नजर टाकूया. लिंक: https://www.loksatta.com/…/bitcoins-objections-article…/भाग ७: ब्लॉकचेनचे विविध प्रकार आणि उदाहरण
32. या ३२व्या लेखांत आपण विविध प्रकारचे ब्लॉकचेन समजून घेऊया. https://www.loksatta.com/…/article-on-blockchains…/
क्रीप्टोकरन्सी
33. आजच्या ३३व्या वा बऱ्याच अर्थाने स्वतंत्र लेखात आपण हे पाहूया की कुटचालनांपलिकडे (क्रीप्टोकरन्सी) ब्लॉकचेन कुठेकुठे वापरले जाऊ शकते आणि असे करतांना कोणत्या मापदंडांचा विचार करू शकतो https://www.loksatta.com/…/article-on-blockchain-is…/
34. आजच्या लेखात आपण वयाच्या १९व्या वर्षी ईथिरियम नामक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मची क्रांतिकारी संकल्पना जगासमोर मांडणाऱ्या व्हिटॅलिक ब्युटेरिनबद्दल थोडं पाहूया (लेख क्र ३४) https://www.loksatta.com/…/bitcoin-article-on…/
35. आजच्या लेखात आपण ईथिरियम या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आणि त्या मागील विचाराबद्दल थोडं जाणून घेऊयात. (लेख क्र ३५) https://www.loksatta.com/…/article-on-etherium-and…/
36. या आठवड्याच्या लेखात आपण ईथिरियाम या तंत्रव्यासपीठावर अजून लक्ष देऊया. (लेख क्र ३६) लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-bitcoin-non…/
37. ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ ही नेमकी काय भानगड आहे ते आपण आजच्या ३७व्या लेखांत समजून घेऊया… लिंक: https://www.loksatta.com/…/bitcoin-article-on…
श्रोडिंगरची मांजर
38. आजच्या लेखात आपण पहिले ईथिरियाम या ब्लॉकचेन तंत्रव्यसपीठावर झालेल्या डिजिटल हल्ल्याबद्दल वाचूया ज्याने अनेक प्रकारे माणसांची आणि तंत्रज्ञानाची कसोटी घेतली. या हल्ल्याचे उत्तर कसे देण्यात आले ते आपण पुढच्या आठवड्यात बघुयात. (लेख क्र. ३८) https://www.loksatta.com/…/article-on-story-of-the…/
39. मागील आठवड्यात पाहिलेल्या सायबर हल्ल्यावर कसा मार्ग काढला गेला ते आपण आज बघूया. (लेख क्र ३९) या आठवड्याचा लेख: https://www.loksatta.com/…/article-on-blockchain-based…/ मागील आठवड्याचा लेख: https://www.loksatta.com/…/article-on-story-of-the…/ “उदाहरणार्थ, अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ ह्य़ीव एव्हरेट यांनी मांडलेले ‘मेनी-वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन’! या अन्वयार्थसूत्रानुसार, निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपले विश्व हे तितक्या स्वतंत्र भागांमध्ये विभागले जाते आणि प्रत्येक पर्यायाचे एक स्वतंत्र असे विश्व बनते. या विश्वात ‘श्रोडिंगरची मांजर’ जिवंत आहे की मेली आहे, याचे उत्तर असे असते : विश्वाचे आता दोन भाग झाले आहेत. एकामध्ये ती मांजर जिवंत आहे आणि एकात ती मेली आहे. तुम्हाला जर ती मांजर मेलेली दिसली, तर दुसऱ्या विश्वात वावरणाऱ्या तुमच्या दुसऱ्या रूपाला तीच मांजर जिवंत दिसेल!” भाग ८: विकेंद्रित, विश्वासार्ह, आणि पारदर्शक जगाकडे घेऊन जाणारे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे होणारे वापर वा प्रयोग
इंटरनेट ऑफ थिंग्स
40. आजच्या लेखात आपण ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ या नवतंत्रज्ञानांशी समन्वय साधल्याने कोणत्या अभूतपूर्व शक्यता निर्माण होऊ शकतात, ते पाहूया. (लेख क्र ४०) https://www.loksatta.com/…/article-on-combining…/
41. आजच्या लेखात आपण “बिटकॉईन मुळे मी श्रीमंत होईल का” यापासून दूर जाऊन, अॅण्ड्रीज अॅण्टोनोपोलस ( Andreas M. Antonopoulos ) सारख्यांच्या “आंतरराष्ट्रीय बँकांची आणि बलाढ्य संस्थांची मक्तेदारी संपवून देण्यात बिटकॉईन काही करू शकेल का? आणि याने पैशाचा एक नियंत्रणाचे साधन म्हणून होणारा वापर थांबवून प्रत्येकाला आर्थिक सुविधा पुरवू शकू का?” या विचारावर थोडं बोलू. (लेख क्र. ४१) https://www.loksatta.com/…/andreas-antonopoulos…/
सुस्पष्ट धोरण आखणे गरजेचे
42. शासन वा प्रशासन ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून नागरिक सुखसुविधा प्रदान करण्याकरिता काय करू शकतं? एस्टोनिया या लहानशा देशाकडून इतरांनी काय शिकायला हवं? हे आजच्या लेखात जाणून घेऊयात. (लेख क्र. ४२) वाचायला लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-estonia-digital…/
43. इतर देशातील सरकार ब्लॉकचेन तंत्रज्ञान कसं राबवत आहेत? भारतातील इतर राज्य? ब्लॉकचेन सारखे विस्तारशील तंत्रज्ञान राज्यस्तरावर राबवायचे असेल तर त्यासाठी सुस्पष्ट धोरण आखणे गरजेचे असते, अन्यथा कोणताही प्रकल्प हा निव्वळ प्रयोगापल्याड जाणे अत्यंत अवघड ठरते. हे जाणून घेऊया आजच्या लेखात (लेख क्र. ४३) https://www.loksatta.com/…/article-on-blockchain…/
44. आजचा लेख जरा महत्त्वाचाच म्हणावा लागेल.. “स्वत:च्या अस्तित्वाची, स्वत:च्या व्यवसायाची, जमिनीची किंवा मालमत्तेची अधिकृत नोंदणी होणे आर्थिक वा सामाजिक समृद्धीसाठी गरजेचे आहे. उदाहरणार्थ, आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धत रद्द करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्क मिळवून दिला, तेव्हा त्यामागेही हाच विचार होता. जे पेरूमध्ये खरे ठरले, ते जागतिक पातळीवर राबवायचे असेल तर त्यासाठी एक जागतिक तंत्रव्यासपीठ लागेल, हे डी सोटो यांनी जाणले….” (लेख क्र. ४४) https://www.loksatta.com/…/article-on-economist…/
बिटलँड
45. आजचा लेख जरा जवळचा आहे. क्रिस बेट्सची “बिटलँड” याला टाईम साप्ताहिकाने ‘जगातील सर्वात विलक्षण ५० कंपन्या’ अश्या यादीत नामांकित केलं होतं ज्यामध्ये अमेझॉन, डिजनी, एपल सगळी होत. असं होतं असतांना क्रिस सोबत एकदम घट्ट मैत्री बनून एक मजेदार आव्हान म्हणून छत्तीसगडमध्ये काम सुरू केलं होतं. ऑफिस करून घरी आलो की जवळपास रोज रात्री १२ ला अमेरिकेत बसलेल्या क्रिस सोबत चर्चा रंगायच्या. वर्षभर असंच काम केलं, हे कोणी करायला सांगितलं नाही आणि याचे कोणी वेगळे पैसे दिले नाहीत, पण अगोदर कोणी केलं नाही म्हणून करूयात अशी जिद्द होती. “बिटलँड'”च्या कामाकडे आज बघुयात. लिंक: https://www.loksatta.com/…/blockchain-article-on…/
46. आजच्या लेखात आपण आफ्रिकेतील रक्तहिरे नक्की काय आहेत, त्यांच्या उगमाला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, आणि ते थांबवण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान काय हातभार लावू शकतं ते बघूया. (लेख क्र. ४६) लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-use-of…/
सह्य़ाद्री फाम्र्स
47. पण माहिती फक्त ग्राहकोपयोगी असावी का? अन्नपुरवठा ज्यांच्यामुळे शक्य होतो त्या शेतकऱ्यांचे काय? अन्नविक्री करताना ग्राहकांना हे दाखवू शकलो की त्यांनी दिलेल्या एकूण रकमेपैकी शेतकऱ्यांपर्यंत किती रक्कम पोहोचत आहे, तर याचा फायदा पुढे शेतकऱ्यांना होईलच. असाच प्रकल्प भारतातील सर्वात मोठय़ा फळभाज्या शेतकरी उत्पादक कंपनीत- ‘सह्य़ाद्री फाम्र्स’- राबविण्याचा प्रयोग सुरू आहे. अशी पारदर्शकता फक्त अन्नपुरवठय़ापुरती सीमित राहत नाही. आपण परिधान करत असलेल्या कपडय़ांसाठी वापरण्यात आलेला कापूस वा रेशीम आले कुठून, त्यामध्ये किती कापूस शेतकरी बांधवांच्या मालाचा वापर करण्यात आला आहे, त्यांना योग्य मोबदला मिळाला की नाही, हे सारे कपडय़ांवरील क्यूआर कोडवरून जाणून घेता येईल. आणखी एक उदाहरण द्यायचे तर बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तूवरील क्यूआर कोडद्वारे- हा बांबू कोणाच्या शेतातून आला, यावर काम करणारे कारागीर कोण आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळतोय की नाही, ही माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. मुख्य म्हणजे ही सारी माहिती ब्लॉकचेनवर साठवली जाणार असल्यामुळे त्यास विश्वासार्हतेची जोड असेलच. https://www.loksatta.com/…/blockchain-technology-in…/
शेतकरी उत्पादक कंपनी
48. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्यांची यशस्विता वाढवण्यात ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ कसे साहाय्यक ठरेल? भारतातील सर्वात मोठय़ा फळभाज्या शेतकरी उत्पादक कंपनीचे (सह्य़ाद्री फार्म्स) संचालक विलास शिंदे सांगतात, ‘‘महाराष्ट्रात सद्य:स्थितीत एक कोटी ३६ लाख शेतकरी कुटुंबे आहेत. राज्यातील पीकपद्धती पाहता, १३ ते १४ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये प्रत्येकी सुमारे हजार शेतकरी असतील. एका भागात समान उद्देशाने कार्यरत असलेल्या कंपन्यांची मिळून एक पीकनिहाय मूल्यसाखळी तयार होऊ शकते, ज्यात जवळपास २० हजार शेतकरी असतील. महाराष्ट्रात पीकनिहाय ६८० ते ७९९ मूल्यसाखळ्या तयार होऊ शकतील.’’ लिंक: https://www.loksatta.com/…/article-on-how-can…/
49. आजचा ४९वा लेख हा तुमची डिजिटल ओळख, त्यासंबंधित माहिती, आणि आजच्या घडीला हे सगळं दुसऱ्याच्या नियंत्रणात कसे आहे वा यास ब्लॉकचेन कसे उलटवू शकते ते पाहूया.. https://www.loksatta.com/…/bitcoin-article-on-digital…/
५०वा लेख! ‘…..आता तर, फक्त ज्या कंपन्यांची मक्तेदारी आहे त्यांचीच वाढ होते असे दिसते. याला अर्थशास्त्रात ‘मॅथ्यू तत्त्व’ म्हणतात; अगदी ढोबळपणे सांगायचे तर- पैसा हा पैसेवाल्याकडे जातो आणि गरिबाकडून तोच दूर जातो. हे पाहता, जिथे पैसा हा माहितीपासून उत्पन्न होतो, तिथे अगोदरच डिजिटल माहितीवर मक्तेदारी असलेल्यांकडेच अधिक डिजिटल माहिती साठवली जाईल आणि तेल व्यापाराप्रमाणेच त्यांचा संघ (कार्टेल) निर्माण होईल. यात ‘ब्लॉकचेन’ने प्रवेश केला तर संभाव्य चित्र कसे असू शकेल?’ https://www.loksatta.com/…/bitcoin-article-on-breaking…/
फक्त ‘ब्लॉकचेन’ पुरेसे नाही,
51. आजच्या ५१व्या लेखात निरनिराळ्या चित्तवेधक उदाहरणांच्या मदतीने ब्लॉकचेनचे आपल्या दैनंदिन जीवनात कसे आगमन होत आहे याचा आढावा घेतला आहे. लिंक: https://www.loksatta.com/…/bitcoin-article-on…/ 52..
५२ आठवडे..५२ लेख..एक पूर्ण वर्ष! स्वतःलाच खूप काही शिकवून जाणारा हा प्रवास आज थांबतो… आजचा शेवटचा लेख… “अशक्य वाटणाऱ्या किंवा कधी ध्यानीमनीही नसणाऱ्या शक्यतांचा प्रत्यय ‘ब्लॉकचेन’मुळे आपल्याला येऊ लागला आहे. केंद्रीकरणामुळे निर्माण होणारी मक्तेदारी थांबणे, त्यामुळे विकेंद्रीकरणाचे वाढणारे महत्त्व, योग्य व्यक्तींना योग्य मोबदला मिळवून देण्याचे स्वप्न, पारदर्शकता, माहितीचा योग्य मोबदला, एकाधिकारशाही किंवा संघशाहीपासून सुटका करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व अशा विचारांचे पुनरुत्थान झाले.
‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाकडे एखादी तांत्रिक भपकेदार जादूगिरी म्हणून न पाहता, या विचारांचे द्योतक म्हणून पाहिले तर या तंत्रज्ञानाचा विकास वा वापरदेखील त्या दिशेने होईल. कारण हे विचार अमलात आणण्यासाठी फक्त ‘ब्लॉकचेन’ पुरेसे नाही, त्यास इच्छाशक्ती, नेतृत्व, जनसामान्यांचा आधार वा योग्य दबाव, हे सारे आवश्यक आहे. कोणतीही महत्त्वाची गोष्ट ‘किचकट, गुंतागुंतीची’ आहे किंवा हा ‘फक्त तज्ज्ञ मंडळींचा विषय’ आहे असे दर्शवून तीपासून जनसामान्यांना दूर ठेवले जाते. ही नीती आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय वा वित्तीय क्षेत्रांमध्ये सर्रास वापरली जाते. मग फक्त नावापुरते, मर्यादित पद्धतीने ‘ब्लॉकचेन’चा वापर करून मिरवता येते. पण त्याने नेमके कोणते उद्देश साध्य झाले- जे आधी शक्य नव्हते, याचे उत्तर देता येणे गरजेचे आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान फक्त नवलाईच्या किंवा किचकटतेच्या कचाटय़ात न अडकता; ते ज्या विचारांचे द्योतक बनले आहे त्यांना अमलात आणण्यासाठी मदत करेल, अशी आशा बाळगू या आणि येत्या दशकात सर्वानी मिळून त्या दृष्टीने प्रयत्न करू या.. ” link: https://www.loksatta.com/…/blockchain-articles-truth…/
5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत,अंधश्रद्धेतून नुकसान नको
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)