सांगली: मी हिंदू चांभार, हिंदूराष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाही – भाजप नेते सुरेश खाडे यांचे वादग्रस्त व्यक्तव्य : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांनी सांगलीतील हिंदू गर्जना सभेत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. “मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून आलो आहे,” असे विधान करून त्यांनी आपल्या मतदारांचा जाहीर अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच हिंदूराष्ट्राच्या दिशेने देश वाटचाल करत असल्याचे विधान करून त्यांनी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला दुजोरा दिला.यामुळे आता समाज माध्यमात जोरदार उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
हिंदू गर्जना सभेचे आयोजन
सांगली शहरात हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, माजी मंत्री सुरेश खाडे आणि शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत बोलताना सुरेश खाडे यांनी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला आणि केंद्र सरकारच्या धोरणांचे कौतुक केले.
“हिंदूराष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाही”
“मी हिंदू चांभार आहे. दलित असलो तरी हिंदू आहे. हिंदूराष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाही. नरेंद्र मोदी सरकार हिंदूराष्ट्राच्या दिशेने ठाम पावले उचलत आहे. यासाठी आम्हाला सर्व हिंदूंचे पाठबळ हवे आहे,” असे सुरेश खाडे यांनी म्हटले.
मिरज मतदारसंघाला ‘मिनी पाकिस्तान’ची उपमा
मिरज मतदारसंघाला ‘मिनी पाकिस्तान’ संबोधून खाडे यांनी आपल्या भाषणात मतदारांचा अपमान केला आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. “या भागातून मी चार वेळा निवडून आलो आहे,” असे विधान त्यांनी यावेळी केले.
विरोधकांवर निशाणा
“लोकसभेत निसटता पराभव झाला, पण विधानसभेत हिंदू समाजाच्या एकतेने चांगले यश मिळाले आहे. आज विधानसभेत विरोधकांचे फारसे अस्तित्व राहिलेले नाही. ते आता किरकोळ जागांवर दिसत आहेत,” असे म्हणत खाडे यांनी विरोधकांवर टीका केली.
नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान
याच सभेत मंत्री नितेश राणे यांनीही आपल्या भाषणात हिंदू राष्ट्राच्या मागणीचा पुनरुच्चार केला. “आमचे विरोधक ईव्हीएमविरोधात बोलत असतात, पण ‘ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला,’” असे वादग्रस्त विधान करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
खाडे आणि राणे यांच्या विधानांवर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
विरोधकांनी या विधानांवर टीका करत भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेवर भाष्य केले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 11,2024 | 16:16 PM
WebTitle – bjp-leader-suresh-khade-hindu-rashtra-controversy
#BJP #HinduRashtra #SureshKhade #MirajConstituency #SangliNews