बेडग (ता. मिरज) येथे उभारलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असलेली कमान विरोध करत पाडल्यानंतर आंबेडकरी अनुयायी गावकऱ्यांनी गाव सोडत पायी मंत्रालय मार्च काढला होता. त्यांची प्रशासन अधिकारी राजकीय नेत्यांनी समजूत काढून गावात परत आणले,मात्र काल ग्रामसभेत झालेल्या बैठकीत पुन्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असलेल्या कमानीच्या विरोधात ठराव करून तो पास करण्यात आला.यावेळी बेडग गावच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते.विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती मोठी होती.आजही जातीयवादी मानसिकता लोकांच्या मनातून जात नसल्याचे हे उदाहरण आहे.
नावाला आजही विरोध
पंचायत समितीने दिलेल्या पत्रानुसार बेडग गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामसभेसाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सर्वांना आधारकार्ड आणि मतदानकार्ड तपासणी करून ग्रामसभेस उपस्थित राहण्याची अट पार पाडावी लागली,यावेळी कमानीच्या विरोधात ठराव पास करताना सर्वांनी हात उंचावून डॉ. आंबेडकर यांचं नाव असणाऱ्या कामानीला आपला विरोध दर्शविला.गावात यापुढे कोणतीही कमान (Dr. Babasaheb Ambedkar Arch Dispute) न उभारण्याचा बहुमताने ठराव संमत करण्यात आला.हा ठराव पास झाल्यानंतर आंबेडकरी समाजातील जनतेने ग्रामसभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत ते तिथून निघून गेले.
महिलांची उपस्थिती लक्षणीय
दैनिक सकाळ ने दिलेल्या वृत्तानुसार,ग्रामसभेसाठी गावामधिल २२२९ नागरिक उपस्थित असल्याची माहिती समोर आलीय
यात महिलांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे कळते.
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच उमेश पाटील यांच्याकडे होते.
सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांनी मागच्या सभेचे इतिवृत्त वाचन केले.
तसेच जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आलेल्या पत्राचं वाचन केलं.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख असणाऱ्या स्वागत कमानीबद्दल ठराव घेण्यात आला. यावेळी बहुसंख्य गावकऱ्यांनी गावात कोणत्याही महापुरुषांची कमान नको, मुलांसाठी वाचनालय करा असा ठराव बहुमताने ग्रामसभेत मंजूर केला. यावेळी इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. गावात स्वागत कमान बांधण्याच्याऐवजी गावात अत्याधुनिक असं सुसज्ज वाचनालय उभं करण्याचा ठराव यावेळी बहुमतानं मंजूर करण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
निवृत्त व्हा,आता वय झालं…भारताला कोरोना लस देणाऱ्या सायरस पूनावाला यांचा मित्र शरद पवार ना सल्ला
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 31,2023 | 12:30 PM
WebTitle – Bedag Village Resolution Passed in Gram Sabha to Oppose Dr. Ambedkar Arch