मुंबई, दि. २ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर – उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई शहर – उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेवून व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी,१२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती ’ करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे.
कागदपत्रे
जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, २ फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा
अर्ज कुठे कराल?
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), मुंबई- गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रूम नं. ३३. बांद्रा (पू), मुंबई ४०००५१
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख
१५ ऑगस्ट २०२१

हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 02, 2021 20:10 PM
WebTitle – Appeal to apply for Annabhau Sathe Scholarship