मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या जानेवारी हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरेंनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या अगोदरपासून मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
तटकरे म्हणाल्या, “डिसेंबर महिन्याचा हप्ता 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केला गेला होता. आता नवीन वर्षातील पहिला हप्ता म्हणजे जानेवारीचा डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) लाभ 26 जानेवारीच्या अगोदर सुरू करण्यात येईल. याबाबत आर्थिक नियोजन अर्थ विभागाकडून प्राप्त झालं आहे. लाडक्या बहिणींना तीन ते चार दिवसांत हप्ता मिळेल.”
फेब्रुवारीच्या हप्त्याबाबतही महत्त्वाचे अपडेट
आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या जानेवारी हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठीही नियोजन सुरू आहे. नवीन अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या योजनेत अधिक व्यापक विचार केला जाईल. महिला लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात कोणत्याही अडचणीशिवाय लाभ मिळावा यासाठी आम्ही सतत काम करत आहोत.”
योजनेतून आतापर्यंत महिलांना मिळालेली मदत
महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तेव्हापासून महिलांना 6 हप्त्यांमध्ये 9,000 रुपये मिळाले आहेत. डिसेंबर महिन्यात एकूण 2 कोटी 47 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. याच महिन्यात लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची संख्या जवळपास स्थिर राहील. मात्र, काही तक्रारींच्या अनुषंगाने एक लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे, असे तटकरे म्हणाल्या.
लाभार्थ्यांच्या संख्येत झालेले बदल
तटकरे यांनी स्पष्ट केलं की काही महिलांनी या योजनेचा लाभ स्वतःहून सोडला आहे.
तसेच दुबार नाव नोंदणी, इतर योजनांचा लाभ घेतलेला असणे किंवा काही महिलांचे उत्पन्न वाढणे यांसारख्या कारणांमुळे काही नावं वगळली गेली आहेत.
यामुळे योजनेतील लाभार्थ्यांच्या आकड्यात थोडासा बदल होऊ शकतो.
निधी आणि योजनेंतर्गत पुढील पावलं
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या जानेवारी महिन्याचा लाभ वितरित करण्यासाठी अर्थ विभागाकडून
3,690 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सरकारच्या या पुढाकारामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 17,2024 | 11:30 AM
WebTitle – aditi-tatkare-majhi-ladki-bahin-yojana-january-2025-update