एका धक्कादायक घटनेत एका न्यायाधीशाचे अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. jitendra mishra judge video न्यायाधीश जितेंद्र मिश्रा आपल्या कार्यालयात एका महिलेचे लैंगिक शोषण करत होते. पीडित महिला या न्यायाधीशाची असिस्टंट असल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तसेच लोक यावर उलटसुलट चर्चा करत आहेत.तर काहींनी न्यायव्यवस्थेतील या धक्कादायक प्रकाराने चिंता व्यक्त केली आहे.
आपण अनेकदा चित्रपटात असे बघतो की न्यायाचं प्रतिक असलेल्या शिल्पाच्या डोळ्यावर पट्टी असते आणि हातात तराजू असतो. समान न्याय आणि भेदभाव किंवा झुकते माप असले प्रकार घडू नयेत म्हणून हे न्यायाचं प्रतिक स्विकारलं गेलं आहे.मात्र न्यायमूर्ती जितेंद्र मिश्रा यांनी केलेल्या कृत्याने न्यायाचं प्रतिक असलेलं प्रतिक शिल्प देखील लाजेने डोळ्यावर आणखी पट्ट्या बांधून घेईल की काय इतपत परिस्थिती निर्माण झाली आहे.
जितेंद्र मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओ मागील एक खुलासा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये jitendra mishra judge video न्यायाधीश जितेंद्र कुमार मिश्रा त्यांच्या कोर्टरूममध्ये शारीरिक जवळीक करताना दिसत होते, अनेकांनी आरोप केला आहे की त्यांच्या विरुद्ध बाजूची महिला कोर्टात कनिष्ठ आहे आणि तिच्या कोर्टरूममध्ये कोर्ट रिपोर्टर म्हणून काम करत आहे, न्यायाधीश जितेंद्र यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
हा व्हिडिओ 9 मार्च 2022 चा आहे आणि तो कालपासून सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की भारतीय प्रसारमाध्यमांत ही बातमी कुठेच नाही. प्रस्थापित माध्यमांनी यावर मौन धारण केलं आहे.
तसेच महिला आयोगाकडूनही काही हालचाल दिसली नाही,जो महिला आयोग विरोधी पक्षातील लोकांच्या केवळ शाब्दिक वक्तव्यावर तत्परतेने कारवाई करायला पुढे असतो. जर सोशल मिडिया नसता तर,आणि अर्थातच जागल्याभारत,तर ही बातमी जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचलीच नसती.
सर्वोच्च न्यायालय यावर काय पाऊल उचलते हे बघणे आता महत्वाचे अन औत्सुक्याचे ठरणार आहे.
ताजी अपडेट्स
कर्मचारी महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या
न्यायाधीश जितेंद्र कुमार मिश्रा ला दिल्ली उच्च न्यायालयाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
मिडियारिपोर्टनुसार, राऊस एव्हेन्यूमध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव जितेंद्र मिश्रा आहे.
त्याच्या कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचे वाईट वर्तन रेकॉर्ड झाले आहे.
यावर्षी मार्च महिन्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बुधवारी, 30 नोव्हेंबर रोजी उशिरा हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले. व्हिडिओ व्हायरल झाल्याने तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन होत असल्याचे पीडित महिलेने न्यायालयात सांगितले. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने तो व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने सोशल मीडिया कंपन्यांना व्हिडिओ पोस्ट, शेअर किंवा फॉरवर्ड केला जाणार नाही याची खात्री करण्यास सांगितले होते.न्यायालयाने आदेश दिल्याने आम्ही सुद्धा संबंधित व्हिडिओ काढून घेत आहोत,जरी आम्ही महिलेची ओळख लपवली होती,आणि कोणत्याही प्रकारे ओळख उघड केली नव्हती तरीही आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असे वाटते.
जगदीश गायकवाड पोलिसांच्या ताब्यात,पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे बहुजनांचे मरण!- कॉ. धनाजी गुरव
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on DEC 01,2022, 16:20 PM
Updated by Team Jaaglya Bharat on DEC 01,2022, 21:54 PM
WebTitle – a-truth-behind-justice-jitendra-mishra-viral-video