26 जानेवारी हिंसा – केंद्राच्या शेतकरी विरोधी तीन नव्या कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यादरम्यान लाल किल्ल्यातील घटनेप्रकरणी दीप सिद्धू ( Deep Sidhu) यास अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
26 जानेवारी हिंसा
पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड होत आहे.दीप सिद्धू पंजाब मधून बिहार ला फरार होण्याच्या तयारीत होता.त्याने आपला फोन बंद करून ठेवला होता,पंधरा दिवस तो पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती समोर आली आहे,तसेच या दरम्यान तो व्हिडिओ अपलोड करत होता,आणि हे व्हिडिओ तो मित्रांच्याकरवी कॅलिफोर्निया येथील एका मैत्रिणीला पाठवून तिकडून अपलोड करत होता,जेणेकरून त्याचे लोकेशन ट्रेस होऊ नये,अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे.
(26 जनवरी को लाल क़िले पर हिंसा करने वाला (deep siddhu) दीप सिद्धू गिरफ्तार, पटियाला हाउस कोर्ट लेकर जा रही है पुलिस .)
किसान बिल: महूआ मोईत्रा यांचे संसदेतील व्हायरल भाषण
सन्माननीय अध्यक्षमहोदय
महामहीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या धन्यवादप्रस्तावाच्या विरोधात आणि माझ्या पक्षाने या प्रस्तावाला सुचवलेल्या दुरुस्त्यांना पाठींबा देण्यासाठी मी येथे उभी आहे.
केवळ या सरकारला जाब विचारला किंवा आपल्या देशात जे काही चालले आहे त्यासंबंधी आवाज उठवला
या एकाच गुन्ह्यासाठी आमचे कितीतरी देशबांधव या घडीला तुरुंगात खितपत पडले आहेत
किंवा न्यायव्यवस्थेकडून किंवा पोलिसांकडून होणारी छळणूक सोसत आहेत.
आणि म्हणून एक सांसद या नात्याने मला मिळणाऱ्या सांसदीय संरक्षणाचे कवच वापरत जनतेने मला बहाल केलेले हे व्यासपीठ जनतेच्या मनातील प्रश्न आणि जनतेच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मी वापरू इच्छिते.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)