नवी मुंबईत दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि केरळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत यश सिंह या २० वर्षीय युवकाला अटक केली आहे. परदेशी हँडलर्सच्या सांगण्यावरून मुंबईतील संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या ठिकाणांमध्ये कुलाबा येथील चाबाद हाऊस (नरीमन हाऊस) याचाही समावेश आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान हे ठिकाण दहशतवाद्यांच्या प्रमुख लक्ष्यांपैकी एक होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क
यश सिंह नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहत असल्याची माहिती आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याची गुप्त माहिती ATS ला मिळाली होती. तपासादरम्यान त्याचे धागेदोरे केरळमधील त्रिशूर येथे UAPA अंतर्गत दाखल असलेल्या एका प्रकरणाशी जोडले गेले.
नवी मुंबई ATS कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केरळ पोलिसांचे विशेष पथक नवी मुंबईत दाखल झाले. संयुक्त तपासानंतर शनिवारी यश सिंहला अटक करण्यात आली.
परदेशी नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, यश सिंह ला मुंबईतील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कुलाबा येथील ज्यू धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या चाबाद हाऊसवर विशेष नजर ठेवण्यास सांगण्यात आले होते.
मुंबईत राहणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या ज्यू तसेच अन्य परदेशी नागरिकांची छायाचित्रे, त्यांच्या वाहनांचे क्रमांक, इतर वैयक्तिक माहिती आणि अचूक भौगोलिक लोकेशन गोळा करून परदेशी हँडलर्सना पाठवण्याच्या सूचना त्याला देण्यात आल्याचा आरोप आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न
नवी मुंबई ATS ने या प्रकरणाच्या निमित्ताने तरुणांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी नेटवर्कबाबतही इशारा दिला आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीसारखे नेटवर्क बेरोजगार
आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या तरुणांना लक्ष्य करत आहेत.
टेलिग्राम, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तरुणांशी संपर्क साधला जातो.
सुरुवातीला छोट्या कामांच्या बदल्यात मोठ्या रकमेचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर संवेदनशील ठिकाणांची रेकी करणे, गोपनीय माहिती गोळा करणे आणि दहशतवादी कारवायांसाठी मदत घेणे अशा कामांमध्ये त्यांचा वापर केला जात असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
२६/११ च्या हल्ल्यात नरीमन हाऊसवर कब्जा
२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता.
त्यापैकी दोघांनी कुलाबा येथील नरीमन हाऊसवर कब्जा करून तेथील नागरिकांना ओलीस ठेवले होते.
तीन दिवस चाललेल्या या दहशतवादी हल्ल्यात एकूण १६६ जणांचा मृत्यू झाला होता.
नरीमन हाऊसमधील चाबाद-लुबाविच ज्यू केंद्राचे प्रमुख रब्बी गॅब्रिएल होल्ट्झबर्ग, त्यांची गर्भवती पत्नी रिवका
आणि इतर भारतीय व परदेशी नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
या हल्ल्यात रब्बी दाम्पत्याचा दोन वर्षांचा मुलगा मोशे मात्र बचावला.
त्याची भारतीय आया सॅन्ड्रा सॅम्युअल्स हिने प्रसंगावधान राखत त्याला सुरक्षित बाहेर काढले होते.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 15,2026 | 20:00 PM
WebTitle — navi-mumbai-youth-yash singh arrested-nariman-house-reconnaissance-26-11























































