03 फेब्रुवारी 2025,उत्तर प्रदेश | अयोध्या:दलित तरुणीची क्रूर हत्या, डोळे फोडले,हाडे मोडली निर्वस्त्र केले : उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात 22 वर्षीय दलित तरुणीची तथाकथित सैतानाला लाजवेल अशा अमानुष पद्धतीने हत्या केल्याचा आरोप असलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची ओळख हरी राम कोरी, विजय साहू आणि दिग्विजय सिंह अशी आहे. एसएसपी राज करण नैय्यर यांनी सांगितले की, नशेत असताना आरोपींनी गावातील एका शाळेत युवतीची हत्या केली आणि नंतर तिचे शव नाल्याजवळ फेकले. पोलिस आता तिघांना रिमांडवर घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
अयोध्या:दलित तरुणीची क्रूर हत्या , शवाची स्थिती अमानुष, आघात देणारी
या प्रकरणातील भीषणता उघड करताना पोलिसांनी सांगितले की, युवतीचे शव निर्वस्त्र अवस्थेत सापडले होते. तिचे हात-पाय बांधलेले होते, डोळे फोडले गेले होते आणि शरीरावर अनेक जखमा होत्या. कुटुंबियांनी आरोप केला आहे की, तरुणीला सामूहिक दुष्कर्मानंतर तिला मारले गेले. तिच्या शवाची ओळख तिच्या जावयाने केली, गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या छोट्या नाल्यात पिडीत तरुणीची शव सापडून आले.
राजकीय प्रतिक्रिया आणि पीडित कुटुंबाची तक्रार
प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. समाजवादी पक्षाचे सांसद अवधेश प्रसाद यांनी या घटनेवर ढसाढसा रडत प्रतिक्रिया दिली.
अयोध्या में दलित बेटी के साथ हुई अमानवता और उसकी नृशंस हत्या हृदयविदारक और बहुत शर्मनाक है। pic.twitter.com/HOOa2zRTEl
— Jitendr_Yogi (@Jitendrkumar98) February 2, 2025
भाजप नेते आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्य प्रियंका मौर्यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन लवकर न्याय मिळण्याची हमी दिली. तसेच, कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी रात्री पिडीत तरुणी धार्मिक कार्यक्रमात जाण्यासाठी घरातून निघाली, पण परत आली नाही. त्यानंतर पोलिसांनी तीचा शोध घेण्यात कसूर केली,निष्काळजीपणा केला,तीन दिवस पोलिस फक्त टोलवाटोलवी करत राहिले.असा आरोप पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले की,अयोध्येतील दलित मुलीची अमानुष आणि निर्घृण हत्या हृदयद्रावक आणि अत्यंत लज्जास्पद आहे.
तीन दिवसांपासून गुंजत असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मदतीच्या हाकेकडे प्रशासनाने लक्ष दिले असते, तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते.
या अमानवीय अपराधामुळे आणखी एका मुलीचे आयुष्य संपले. किती दिवस आणि किती कुटुंबांना असंच रडावं लागेल?
बहुजन विरोधी भाजपच्या राजवटीत विशेषतः उत्तर प्रदेशात दलितांवरील घृणास्पद अत्याचार, अन्याय आणि हत्या बेलगाम वाढत आहेत.उत्तरप्रदेश सरकारने या गुन्ह्याची तातडीनं चौकशी करत दोषींच्या विरोधात कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करावी. आणि कृपया नेहमीप्रमाणे पीडित कुटुंबाला त्रास देऊ नका. देशातील मुली आणि संपूर्ण दलित समाज तुमच्याकडे न्यायासाठी पाहतो आहे.
अयोध्या में दलित बेटी के साथ हुई अमानवता और उसकी नृशंस हत्या हृदयविदारक और बहुत शर्मनाक है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 2, 2025
तीन दिनों से गूंजती बच्ची के परिवार के मदद की पुकार पर अगर प्रशासन ने ध्यान दिया होता तो शायद उसके जीवन की रक्षा हो सकती थी। एक और बेटी के जीवन का इस घिनौने अपराध से अंत हो गया। आखिर कब… pic.twitter.com/25SRfkA3a2
36 तासानंतर आरोपीना गजाआड केले
पोलिसांनी या प्रकरणाची चार विशेष तपास पथकांनी चौकशी केली आणि 36 तासानंतर आरोपींना बेड्या ठोकल्या. एसएसपी नैय्यर यांनी सांगितले, “आरोपीनी नशेत असताना गुन्हा केल्याचे प्राथमिक चौकशीत नोंद करण्यात आली आहे. त्यांनी शाळेत हा गुन्हा केला आणि शव लपवण्याचा प्रयत्न केला.” पोलिस पिडीत तरुणीच्या मृत्यूचे कारण आणि दुष्कर्माच्या आरोपांची स्पष्टता करण्यासाठी पोस्टमॉर्टम अहवालाची वाट पाहत आहेत.
कुटुंबाची पीडा आणि समाजाची प्रतिक्रिया
पिडीत तरुणीच्या कुटुंबियांनी म्हटले आहे की, तिच्या शरीरावरच्या जखमा आणि डोळे फोडल्याची स्थिती पाहून त्यांना अत्यंत धक्का बसला आहे. गावातील लोकांनीही या अमानुष घटनेवर नाराजी व्यक्त करत हळहळ व्यक्त केली आहे. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात अतिरिक्त पथक तैनात केले आहे. हा प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सोशल मीडियावर पिडीत तरुणीला न्याय देण्याची मागणी करणाऱ्या आवाजांना ताकद मिळाली आहे.
चौकशी सुरू, आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
पोलिस आता आरोपींच्या मागच्या इतिहासाची तपासणी करत आहेत.
त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यात हत्या, सामूहिक अत्याचार आणि पुरावे नष्ट करणे समाविष्ट आहे.
पीडित कुटुंब आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणात कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, चौकशी पारदर्शक पद्धतीने केली जाईल आणि योग्य कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जाईल.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 03,2024 | 13:23 PM
WebTitle – Brutal Murder of Dalit Girl in Ayodhya: 3 Arrested, Suspected Gang Rape