मुंबई: १४ जुलै रोजी, मुंबई मधिल उपनगरीय रेल्वे लोकल ट्रेनवर स्टंट करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडिओवर सोशल मिडियात बरीच टीका केली गेली. त्यानंतर, मुंबई मुख्यालय असलेल्या मध्य रेल्वेने (CR) अशा स्टंट्सविरोधात कारवाईचा कठोर इशारा दिला, असे स्टंट केवळ स्वतःचेच नव्हे तर इतरांचेही जीव धोक्यात आणतात.वडाळा रोडवरील रेल्वे संरक्षण बलाने (RPF) फुटेजमध्ये दिसणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र नंतर जे सत्य समोर आले ते हादरवणारे होते.
सोशल मिडियावर लाइक मिळवण्यासाठी, आणि प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण अनेक प्रकारचे स्टंट करत असतात, यातून कधी कधी प्रसिद्धी मिळते,लाईक्स मिळतात,मात्र कधी कधी असे स्टंट जिवावर बेतू शकतात,नव्हे अशा स्टंट मुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेतच,तरीदेखील सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्याची लाइक मिळवण्याची ही हौस फिटत नाही. यासाठी जागरूकता गरजेची झाली आहे.असेच प्रकरण समोर आले आहे.ज्यामुळे या तरुणाला आयुष्यभराचा धडा मिळाला.पण आता त्याचं आयुष्य मात्र यात उद्ध्वस्त झालंय.होत्याचं नव्हतं झालं,केवळ काही लाईक्स साठी प्रसिद्ध होण्यासाठी उचललेले हे पाऊल किती महागात पडू शकते याची प्रचिती या तरुणाला आली असेल.यातून इतरांनी देखिल बोध घेत आपल्या अशा वागण्यावर संयम बाळगण्याची गरज आहे.
स्टंट करताना डावा हात व पाय गमावला
नुकताच रेल्वे संरक्षण बलाकडून संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
शेवटी, RPF ने त्या व्यक्तीचा त्याच्या घरी शोध घेण्यात यश मिळवले.
आणि त्याची ओळख फरहत आझम शेख, वडाळा येथील अँटॉप हिलचा रहिवासी म्हणून करण्यात आली.
व्हिडिओतील घटनेबाबत चौकशी केली असता त्याने ७ मार्च रोजी सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनवर शिवडी स्टेशनवर स्टंट केल्याचे कबूल केले.
शिवाय, त्याने सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी या अवैध कृत्याचा व्हिडिओ त्याच्या मित्राकडून रेकॉर्ड करून घेतला होता.
१४ एप्रिल रोजी फरहतला मस्जिद स्टेशनवर आणखी एक स्टंट करताना जीवघेणा अपघात झाला आणि त्याचा डावा हात व पाय गमावला.
रेल्वे प्रशासनाने त्याला तातडीने सेंट जॉर्ज हॉस्पिटल, सीएसएमटी येथे उपचारासाठी दाखल केले.
हात पाय गमावल्यामुळे “त्याला दररोजच्या कामकाजात अत्यंत अडचणी येत आहेत आणि त्याने सर्व प्रवाशांना अशा धोकादायक कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे, जे केवळ अवैधच नाहीत तर जीवघेणेही आहेत,” असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. “प्रवाशांची सुरक्षा हे भारतीय रेल्वेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आणि रेल्वे प्रशासन सुरक्षित प्रवासाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत राहतील,” असे अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
१४ जुलै रोजी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशी सुरू झाली.
त्यानंतर वडाळा RPF ने रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांनुसार खटला नोंदवून तपास सुरू केला.
तपासादरम्यान, अलीकडेच आरोपीने आणखी एक स्टंट करताना डावा हात व पाय गमावल्याचे आढळले.
रेल्वेचे नागरिकांना आवाहन
या प्रकरणानंतर आता रेल्वेने एक आवाहन केले आहे. “रेल्वेकडून सर्व नागरिकांना आणि प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, कोणीही ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर स्टंट करत असल्याचे आढळल्यास कृपया ९००४४१०७३५ किंवा १३९ वर तात्काळ संपर्क साधावा. एकत्र काम करून, आपण सुरक्षित प्रवासाच्या अटी निर्माण करू शकतो आणि मृत्यू कमी करू शकतो,” असे सांगत, प्रवाशांची सुरक्षा हे भारतीय रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आणि प्रशासन सुरक्षित प्रवासाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत राहील.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 27,2024 | 18:23 PM
WebTitle – Video of Mumbai youth doing stunt at railway station goes viral, loses arm and leg in accident