नवी दिल्ली: दिल्ली एअरपोर्ट चं छत कोसळलं; 1 ठार 5 जखमी.आज सकाळी मुसळधार पावसात दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या छताचा काही भाग गाड्यांवर कोसळल्याने किमान एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. टर्मिनल 1 वरून सर्व निर्गमन तात्पुरते निलंबित केले गेले आहेत, आणि “सुरक्षेचा उपाय” म्हणून चेक-इन काउंटर बंद केले, असे दिल्ली विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले. टर्मिनल-१ मध्ये फक्त देशांतर्गत उड्डाण चालते.कोसळलेल्या छताच्या लोखंडी अवशेषांच्या खालून सर्वांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र अजूनही काही गाड्या छताखाली अडकल्या असल्याचे समजते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनलच्या पिक-अप आणि ड्रॉप एरियामध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचे छताचे पत्रे आणि सपोर्ट बीम (खांब) कोसळून ही दुर्घटना घडली आहे.अंगावर काटा आणणाऱ्या व्हिडीओवरुन अपघाताची दाहकता सहज लक्षात येऊ शकते.मोठमोठ्या लोखंडी खांबांच्या खाली दबून कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या वेगवेगळ्या कारमध्ये अडकलेल्या चौघांना सुखरुप बाहेर काढून उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली अग्निशामन दलाने दिली आहे.मात्र या अपघातात एकजण मृत्यू पावल्याचे समजते आहे.
दिल्ली एअरपोर्ट चं छत कोसळलं; 1 ठार 5 जखमी
इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, “जे प्रवासी आधीच टर्मिनलच्या आत आहेत ते त्यांच्या नियोजित फ्लाइटमध्ये चढू शकतील,
परंतु ज्यांची उड्डाणे दिवसा उशिरा असतील त्यांना पर्याय उपलब्ध करून दिला जाईल,” असे इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले.
“या अनपेक्षित परिस्थितीमुळे, नेटवर्कवरील सर्व कामकाजावर परिणाम झाला आहे.
ग्राहकांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा आणि पुष्टी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
अपघाताच्या संदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू म्हणाले
दिल्ली विमानतळावरील छत कोसळण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की,
ते “वैयक्तिकरित्या निरीक्षण” करत असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.“
कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली तसेच दिल्ली एनसीआर भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असल्याने दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळालं. बऱ्याच ठिकाणी रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक दिवसांपासूनच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी बाकी मनस्ताप दिल्लीकरांना सहन करावा लागत आहे.गुरुवारी दिल्लीतील पावसाने तापमान ३५.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ५.२ मिमी पाऊस झाला.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 28,2024 | 09:36 AM
WebTitle – Delhi Airport Terminal 1 Stops Ops After Roof Collapses, 1 Dead, 5 Injured