वॉरेन, मिशिगन – रविवार, १६ जून, २०२४ रोजी फिट्झगेराल्ड हायस्कूलच्या सामुदायिक सभागृहात आंतरराष्ट्रीय वेसाक दिवस आणि ३री जागतिक शांतता परिषद आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ५ वाजता संपला.

अमेरिकेत आंतरराष्ट्रीय वेसाक दिवस आणि 3 री जागतिक शांतता परिषद मिशिगन येथे संपन्न

वेसाक दिवस हा एक वार्षिक कार्यक्रम आहे जो जगभर तथागत भगवान बुद्धांच्या जन्म, त्यांच्या ज्ञानप्राप्ती आणि त्यांच्या निर्वाणाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी, बौद्ध उपासक बुद्धांच्या शिकवणींचा सन्मान करण्यासाठी एकत्र येतात, भगवान बुद्धांच्या अहिंसावादी शिकवण कार्यांसाठी मार्गदर्शन आणि जागतिक शांततेकडे वाटचाल करण्याचे महत्व पटवून दिले जाते.संयुक्त राष्ट्रांनी १५ मे १९९९ रोजी प्रथम मान्यता दिलेला हा दिवस मिशिगनमधील सर्वात मोठ्या वार्षिक बौद्ध उत्सवांपैकी एक आहे.
सोहळ्याला जगभरातील मान्यवरांची उपस्थिती

दक्षिण आशियाई समुदायातील सदस्य आणि अनेक अमेरिकन बौद्ध समुदायांचे नेते, जसे की वरिष्ठ उपाध्यक्ष वेन थिच त्रि थुओंग, उपाध्यक्ष वेन पिमोल कामक्रुंग, उपाध्यक्ष वेन भंते संकीचक, अध्यक्ष वेन धर्मनंद महाप्रभु बरुआ आणि महासचिव श्री महेश वासनिक या कार्यक्रमाचे समन्वयक होते.

विविध सांस्कृतिक समूहांनी वियतनाम, थायलंड, भारत, बांगलादेश, लाओस, कंबोडिया, श्रीलंका, कोरिया आणि जपान यांच्या पारंपारिक नृत्य आणि गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाची सुरुवात वॉरेनच्या रस्त्यांवर परेडने झाली आणि त्यानंतर स्वागत समारंभ झाला.

प्रतिष्ठित समुदायाच्या भिक्षूंकडून प्रार्थना आणि ध्यान सत्र, तसेच बुद्धांच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी विविध सांस्कृतिक समूहांकडून गाणी आणि नृत्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाने जवळपास आणि दूरवरून आलेल्या बौद्ध उपासकांना आणि समुदाय सदस्यांना मंत्रमुग्ध केले,

या सोहळ्यासाठी जगभरातील निमंत्रित पाहुणे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आला,
ज्यात वियेतनामी, लाओ, थाई, जपानी, श्रीलंकन, भारतीय, बांगलादेशी, कंबोडियन आणि अमेरिकन अन्नाचा समावेश होता.
समारंभात विशेष अतिथींनी अमेरिकन राष्ट्रगीताचे विशेष युगल गायन सादर केले.

प्रमुख अतिथींमध्ये मिशिगनच्या ३ऱ्या जिल्ह्याच्या सिनेटर स्टीफनी ग्रे चांग आणि इतर स्थानिक मान्यवरांचा समावेश होता.
ज्यांनी बहुसांस्कृतिवाद, अंतरधार्मिक सहिष्णुता, अंतर्गत शांतता आणि समुदायात बौद्ध शिकवणींचे महत्त्व यावर प्रतिपादन केले.
तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 18,2024 | 09:00 AM
WebTitle – International Vesak Day & 3rd Global Peace Conference 2024 in Michigan, USA























































