नागपूर : दीक्षाभूमी : जातीय द्वेषातून आंबेडकरी अनुयायांच्या विरोधात कोर्टात याचिका,समाजातून संतप्त प्रतिक्रिया : दीक्षाभूमी ला भारतात अनन्यसाधारण महत्व आहे.याच दीक्षाभूमीवर 1956 साली रक्ताचा एक थेंबही न सांडता मानवी इतिहासातील जगातील सर्वात मोठी क्रांती झाली.लाखों लोक गुलामगिरीतून मुक्त झाले.या दिवसापासून ते आजतागायत या दीक्षाभूमी ला भेट देण्यासाठी देशातून आणि जगभरातून देखील अनुयायी अभ्यासक भेट देण्यासाठी येत असतात.भारतात अनेक धार्मिक सामाजिक राजकीय कार्यक्रम होत असतात,अनेक ठिकाणी गैरप्रकार झालेले,अपघात घडलेले पाहायला मिळतात,भारतात केवळ दोन महत्वाची ठिकाणे आहेत,एक दीक्षाभूमी आणि एक चैत्यभूमी या ठिकाणी दरवर्षी लाखोंची गर्दी होते,मात्र ही केवळ भक्तीत लीन झालेली गर्दी नसते तर विचारी विवेकी समाजातील लोकांचे वैचारिक अभिसरण घडून येते,इथं येणारी गर्दी ही लाखों करोडो रुपयांची पुस्तके खरेदी करून ज्ञान वर्धन करत असते.
गेल्या 67-68 वर्षात एकही अप्रिय घटना,गैरप्रकार झाल्याचे समोर आलेले नाही,या पार्श्वभूमीवर नागपूरमधून अविनाश काळे नामक व्यक्तीने जातीय द्वेषातून आंबेडकरी अनुयायांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप दिल्ली उच्चन्यायालयाच्या वकिल ॲड.पायल गायकवाड यांनी केला आहे.यावर आता मध्यस्थी अर्ज intervention application दाखल करण्यात आले असून सदर व्यक्तीवर कारवाई करण्याच्या दृष्टीने पुढील पाऊले उचलली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
काय आहे प्रकरण
नागपूर येथील ॲड.अविनाश विष्णुपंत काळे यांनी एक याचिका दाखल करून आरोप केला आहे की,
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरला येणारे बौद्ध अनुयायी हे देशातील विविध भागातून रेल्वेतुन येतात
यामुळे रेल्वेतील सामान्य प्रवांशांना त्रास होतो.अशाप्रकाचे आक्षेप काळे यांनी नोंदवले आहेत.
यासंदर्भात उच्चन्यायालयाने यावर रेल्वेप्रशासनाला १८ ऑक्टोबरपर्यंत यावर उत्तर देण्यास सांगितले होते.
मात्र,आता ॲड. काळे यांची ही याचिका वादात अडकली आहे.
राज्यभरातील विविध संघटनांच्या वतीने उच्चन्यायालयात मध्यस्थी याचिका intervention application दाखल केल्या गेल्या आहेत.
यासोबतच दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य सुरई ससाई यांच्यावतीने देखील एक मध्यस्थी याचिका दाखल करण्यात आली आहे.
जातीय द्वेषातून आंबेडकरी अनुयायांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करून समाजाच्या भावना दुखावल्या
यासंदर्भात अधिक माहिती देताना,दिल्ली उच्चन्यायालयाच्या वकिल ॲड.पायल गायकवाड यांनी जागल्याभारत शी बोलताना म्हटले की, आंबेडकरी अनुयायांच्या विरोधात जातीय द्वेषतून द्वेषातून याचिका दाखल करण्यात आली असून,ही जनहित याचिका नसून वैयक्तिक पातळीवरील याचिका आहे,तसेच यामुळे अशा पद्धतीने कोर्टात याचिका दाखल करून याचिकाकर्ते ॲड.अविनाश विष्णुपंत काळे यांनी देशभरातील आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
या याचिकेच्या विरोधात विदर्भातल्या तीन जिल्ह्यातून सुमारे २० लोकांकडून Intervention Application मध्यस्थी याचिका १७/१०/२०२३ रोजी दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यातर्फे ॲड.पायल गायकवाड व त्यांचे एक सहकारी ॲड.राहुल तेलंग हे कोर्टात आपले म्हणने मांडणार आहेत.जर याचिका कोर्टाने रद्द केली तर हा प्रश्न निकालात निघेल असेही त्यांनी म्हटले,आहे.तसेच जास्त शक्यता हीच असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
एकीकडे अनेक वर्तमान पत्रातून रेल्वेच्या माध्यामातून लाखों करोडो रुपयांचा महसूल गोळा होऊन रेल्वेला नफा झाला,
कोटींची पुस्तक विक्री झाली अशा प्रकारच्या बातम्या दरवर्षी येत असताना,धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर
अशाप्रकारे याचिका दाखल करून समाजात असंतोष आणि संताप निर्माण करण्याचे काम सुरू असल्याची चर्चा सोशल मिडियात सुरू झाली आहे.या केस संदर्भात पुढे काय होते याची माहिती जागल्याभारत वर आम्ही देणार आहोत.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 19,2023 | 14:23 PM
WebTitle – Dikshabhumi: Petition in court against Ambedkari followers due to caste hatred.