मुंबई प्रतिनिधी : 21 व्या शतकातही देशात जातीयवाद वाढतानाच दिसतो,एकीकडे देशाने चंद्रावर यान उतरवले,यावेळी महिलांचा सहभाग देखील मोठा होता,मात्र दुसरीकडे मनुवादी विचारसणी सुद्धा वाढत असल्याचे दिसते.यस बँक सारख्या प्रतिष्ठित बँकेतील कर्मचारी सुद्धा जातीयभेद करताना दिसून येत असल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मुलुंड येथे घडली असून यामुळे आंबेडकरी समाजातून आता त्याचे तीव्र अन संतप्त पडसाद उमटायला लागले आहेत.यस बँक मुलुंड शाखेत जातीयवादी दिलीप पांडे ने आपल्या सहकारी महिलेस जातीवाचक शब्द वापरत अपमान केला,इतकच नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली,आणि कहर म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतही अत्यंत वाईट शब्द वापरत अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप आहे.पोलिसांनी मात्र गुन्हा नोंद करण्यास नेहमीप्रमाणे टाळाटाळ केल्याची माहिती समोर आली.पीडित महिलेने वकिलांच्या मार्फत नंतर तक्रार दाखल केली.
यस बँक मुलुंड शाखेत निळ्या रंगावरून नेमकं प्रकरण काय घडलं ?
जागल्याभारत शी बोलताना सदर केस हाताळणारे वकिल स्वप्नील जगताप यांनी सविस्तर माहिती दिली,त्याप्रमाणे पिडीत व्यक्ती ह्या Yes Bank, Mulund Branch येथे Assistant Manager म्हणुन कार्यरत आहेत. दि.11/10/2023 रोजी त्या सकाळी 09 वाजता बँक मध्ये कर्तव्यावर आल्या असता त्यांचा सहकारी Colleague दिलिप पांडे, Assistant Manager हा पर्सनल Department ला काम करत असलेली व्यक्ती रोहन शेगुनसी ह्याने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला असल्याकारणाने त्याला म्हणाला की,
ब्लु कलर जय भीम वालोंका कलर है इसलिए मुझे पंद नहीं है
“क्या रे आज तु ब्लु कलर का शर्ट क्यु पहनकर आया है? ये तो जय भीम वालों का कलर है,
ये ब्लु कलर जय भीम वालोंका कलर है इसलिए मुझे पंद नहीं है,”
त्यावेळी तिथे काम करत असलेले नितिन साखरे हे हा त्याला म्हणाले की,“कलर के उपर से मत बोल,कलर तो सबके होते है.”
त्यावेळेस नितिन साखरे यांनी त्यांची पाण्याची बॉटल,नॅपकीन व बँक चा आयकार्ड जे की निळ्या रंगाचे होते ते दाखवत म्हटलं की,
“हे सगळेच ब्लु रंगाचे आहे.”
त्यावर दिलीप पांडे हा व्यक्ती त्याना म्हणाला की,
“इसलिए मैं आयडी कार्ड भी नहीं पहनता हुं, मुझे ये जयभीम वाले कलर से नफरत है.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा व बौद्ध समाजाचा सहेतुक जाणिवपुर्वक अपमान
त्यादरम्यान पिडीत व्यक्ती ह्या दिलिप पांडे ह्याच्या शेजारी बसल्या होत्या,
दिलिप पांडे ह्या व्यक्ती ला पिडीत व्यक्ती ही बौद्ध जातीची आहे हे माहित असुन सुद्धा दिलिप पांडे वारंवार पिडीत व्यक्तीचा,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा व बौद्ध समाजाचा सहेतुक जाणिवपुर्वक अपमान करत होता.
दिलिप पांडे जोरजोरात बोलत होता की,“मै ब्राम्हण हुं, उँची जात का हुं, मुझे नीची जात वाले पसंद नहीं है.”
त्यानंतर दिलिप पांडे असेही म्हणाला की, “मुझे जय भीम वाले ब्लु कलर से नफरत है”
तेव्हा पिडीत व्यक्ती ही त्याला म्हणाली की , “ऐसा मत बोल किसी के भी कास्ट के उपर बोलना गलत है,
तु आंबेडकरजी के बारे मैं जानता है क्या? उनके बारे में थोडा पढ ले फिर पता चलेगा के वो कितने महान थे.”
यावर दिलिप पांडे हा पिडित व्यक्ती ला म्हणाला की,“मुझे सब पता है वो कैसा है, मैं अच्छे से जानता हुं,चुxx आदमी था वो,”
तेव्हा पिडीत व्यक्ती दिलिप पांडे ला म्हणाली की,“तेरी बातों से लगता नहीं है कि तु पढा लिखा है”
त्यावर दिलिप पांडे पिडीत व्यक्तीला म्हणाला की,“वो चुxx भीमटे से तो मैं जादा पढा लिखा हुं,वो कोन है आंबेडकर, वो तो कुछ भी नहीं हैं”
तेव्हा पिडीत व्यक्ती दिलिप पांडे ला म्हणाली की, “आंबेडकरजी बहोत पिढे लिखे थे, बहोत सारी डिग्रीयां उनके पास है,
तु कितना पढा लिखा है, उनको पुरा वर्ल्ड जानता है,तुझे कोन जानता है?”
तेव्हा दिलिप पांडे, पीडित व्यक्ती ला म्हणाला की, “मुझे भी बहोत लोग जानते है और मैं वो आंबेडकर से ज्यादा पढा लिखा हुं”
पीडित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी
ह्या सर्व संवादानंतर पीडित व्यक्ती ही बँक मॅनेजर अजय चव्हाण ह्यांना तक्रार करायला जात असताना
दिलिप पांडे ने पीडित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देत म्हटलं की, “तु निकल जा यहां से, वरना में तुझे मार दुंगा.”
त्यानंतर पीडित व्यक्तीने HR दिव्यदर्शन तिवारी ह्यांना तक्रार देण्यासाठी खुप फोन केले पण त्यांनी पीडित व्यक्तीचा एकदाही फोन उचलला नाही,त्यांनंतर पीडित व्यक्तीने बँक मॅनेजर अजय चव्हाण ह्यांना तक्रार दिली पण ते म्हणाले की मी बघतो त्याच्याकडे पण कोणत्याही प्रकारची तक्रारीची दखल घेतली नाही.
त्यामुळे पिडीत व्यक्तीने सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुलुंड पोलिस स्टेशन गाठले पण पोलिस देखील कोणती ही कारवाई करत नव्हते त्यामुळे पीडित व्यक्तीचे ओळखीचे वकिल स्वप्निल जगताप ह्यांना फोन करुन सर्व हकिगत सांगितली.एड.स्वप्नील चव्हाण मुलुंड पोलिस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी ACP एसीपींची भेट घेतली व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेण्यास मदत केली.Adv. Swapnil Govind Jagtap, (Advocate High Court of Bambay) 8369412682 /9702935239
जम्मू-काश्मीर: अग्निवीर सैनिकाचा पूंछमध्ये गोळी लागल्याने मृत्यू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 13,2023 | 11:06 AM
WebTitle – Caste Discrimination in Yes Bank Mulund Branch on Blue Color, Threatened to kill the woman